नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
दान हे सत्पात्री करावं असं म्हणतात. दान हे निरपेक्ष असतं! त्या दान देण्याच्या प्रवृत्तीत कधी अभिलाषा नसते किंवा मीत्व, अहंकार नसतो. दिलेलं दान हे या हाताच त्या हातालाही कळू नये त्यात सात्विक गोपनियता असावी असं म्हटलं जात.
March 31, 2022
एक कुंभार होता. त्याला तीन मुली होत्या. मुलगा नव्हता. त्याला आता पुन्हा चौथी मुलगी नको होती. कुंभार बायकोला म्हणाला, “आता तुला पुन्हा मुलगी झाली तर मी तुला घरात घेणार नाही.” कुंभाराची बायको माहेरी गेली. दुर्दैवाने तिला चौथी मुलगीच झाली. तिच्या अंगाचा थरकाप झाला. आता नवऱ्याला कसे तोंड दाखवायचे याची तिला काळजी लागली. तो आपल्याला घरात घेणार नाही, याची तिला खात्री होती. तिच्या आईने पुढे काय होईल याचा अंदाज घेऊन त्या बाळाला कपड्यात गुंडाळले, टोपलीत घातले आणि टोपली नदीत सोडून दिली. तरंगत तरंगत टोपली पाण्याच्या प्रवाहाबरोबर वहात गेली.
October 5, 2025

गुस्टॉव्ह फ्लॉबर्ट ह्या प्रथितयश साहित्यिकाने त्याला आपल्या छत्रछायेखाली घेतला. फ्लॉबर्टच्या घरी त्याची एमिल झोला व रशियन कादंबरीवर आयव्हॅन तुर्गानेव्ह यांच्याबरोबर भेट झाली. ते दोघेही वास्तववादी लिखाणाचे पुरस्कर्ते होते. १८७५मधे फ्लॉबर्टच्या उत्तेजनाने त्याने एक विनोदी नाटक लिहिले व त्यांत कामही केले.
१८७८मधे त्याची बदली माहिती मंत्रालयाकडे करण्यात आली व तिथे वृत्तपत्रांसाठी लिहिण्याची जबाबदारी त्याच्यावर आली. ते काम करून त्याला खूप फावला वेळ मिळे. त्या वेळांत त्याने कथा व कादंबऱ्या लिहायला सुरूवात केली. १८८०मधे त्याने बौल द सीफ ह्या नांवाने त्याच्या मते त्याचा “मास्टरपीस” प्रसिध्द केला.
ती छोटी कादंबरीच होती. त्याचे वाचकांनी स्वागत केले. फ्लॉबर्टनेही त्याची स्तुती केली. लागलीच त्याने दोन कथा लिहिल्या व त्याही खूप गाजल्या.
July 18, 2022
एकदा देव आणि दैत्य दोघांनी मिळून समुद्रमंथन करून चौदा रत्ने मिळवली. वाटणी करता करता सुधा (अमृत) कोणी घ्यावे याबाबत वाद निर्माण झाला. या वादात दैत्यांनी सुधेचा कुंभ जबरदस्तीने देवांपासून हिसकून घेतला. तेव्हा विष्णूने मोहिनीचे रूप घेतले. मोहिनीरूप विष्णूने दैत्यांना अमृत वाटण्याचे काम मी करतो असे सांगितले.
November 15, 2025
चंद्रपूरच्या जंगलात वृक्षतोडीची मशिनरी व अज्ञात माणसांचे मृतदेह आढळले. मशिनरी पोलिसांकडून जप्त, तर मृतांच्या नातेवाइकांचा शोध सुरू. हळूहळू त्यांच्या नातेवाइकांचा शोध लागला. “तो कोणा अज्ञात माणसाकडे रात्रपाळीचं काम करायचा व सकाळी येताना पैसे घेऊन यायचा, ” एवढेच त्यांना सांगता आले. पुढे पोलिसांना एका विजय मोरे नावाच्या माणसाच्या मृतदेहाजवळ मोबाइल सापडला. त्या मोबाइलवरून त्यांनी दुर्गेशचा ठावठिकाणा मिळवला.
February 3, 2024
गर्दीचा महासागर उसळला होता. लाटांवर लाटा येऊन आदळत होत्या. गर्दी बेभान होती. गर्दी दिशाहीन होत होती. गर्दी पुढं सरकण्याचा प्रयत्न करीत होती. पण कुणाचंही पाऊल पुढं पडत नव्हतं.
February 4, 2026
संध्याकाळी यामिनी ऑफिसमधून लवकर घरी आली तेंव्हा विजय घरी आलेला नव्हताच ! यामिनी घरी आल्या आल्या फ्रेश होऊन हॉलमध्ये टी.व्ही. पाहत बसलेली असताना दारावरची बेल वाचली चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेऊन ती दरवाजा उघडायला उठली , दरवाज्यात प्रतिभा उभी होती तिला आत घेताच...
प्रतिभा : मॅडम आज लवकर आलात का ?
यामिनी : हो ! आज जरा लवकर सुटका झाली ! प्रतिभा ! मी चहा बनविला आहे तो तू घे ! आणि कामाला सुरुवात कर !
प्रतिभा : ठीक आहे मॅडम !
यामिनी : बर ! आज रात्रीसाठी पनीरची भाजी कर ! मी पनीर आणून ठेवलाय फ्रिजमध्ये ! यापूढे काही आणायचे असेल तर तूच येताना घेऊन येत जा... मी पैसे देऊन ठेवत जाईन तुला, मी विसरले तर साहेबांकडून घेत जा..
प्रतिभा : ठीक आहे ...
म्हणत प्रतिभा स्वयंपाक घरात निघून जाते... यामिनी तेथेच पुन्हां टी. व्ही. पाहण्यात गुंग होते, यामिनी इतकी शिकलेली तरी तिला सास - बहूच्या सीरिअल खूप आवडत असतात... कामाच्या व्यापामुळे तिला फार टी.व्ही. पाहायला मिळत नाही पण जेंव्हा कधी वेळ मिळतो तेंव्हा ती टी.व्ही. पाहते. इतक्यात पुन्हा दारावरची बेल वाजते यामिनी दरवाजा उघडते तर दरवाज्यात विजय उभा असतो ! तो आत येताच सोफ्यावर बसतो आणि...
विजय : प्रतिभा माझ्यासाठी जरा चहा घेऊन येतेस का ?
प्रतिभा : स्वयंपाकघरातूनच हो ! हो ! आले
विजय : यामिनी ! तू आज लवकर घरी आलीस ?
यामिनी : का ! मी लवकर आले याच तुला वाईट वाटते आहे का ?
विजय : मला का वाईट वाटेल ?
यामिनी :वाटणारच ना ! कारण मी लवकर आले कि तुला तुझी आवडती मालिका पाहायला मिळणार नाही ना ! मालिका कसल्या पाहतोस ! त्यातील नायिका पाहत असतोस डोळे फाडून...
विजय : विनोदाने .. हे बाकी बरोबर बोललीस, " या मालिकेतील अभिनेत्रींनसमोर मला चित्रपटातील अभिनेत्री फिक्या वाटतात.. त्यात प्रत्येक नवीन मालिकेत नवीन अभिनेत्री येतच असते एकीच्या प्रेमात पडतो न पडतो तो दुसरी हजर ! त्यात व्हिलनच काम करणाऱ्या अभिनेत्री तर नायिकेपेक्षाही दिसायला सुंदर असतात..
यामिनी : बस ! आता त्याच्या सौंदर्याची स्तुती, मला सांग तू कोठे गेला होतास ?
विजय : मी ना ! बाहेर जरा पाय मोकळे करायला गेलो होतो... ढेरी थोडी कमी करावी म्हणतो...
यामिनी : ती आता कमी करून कोठे जायचंय ?
विजय : कोठे जयला कशाला पाहिजे ! पण वजन नियंत्रात ठेवलेले उत्तम , तुला सांगतो मी लहान असताना मला सर्वजण सुकड्या म्हणायचे, तेंव्हा त्याचा मला खूप राग यायचा पण आता लोक सुकड्याना सुकड्या नाही तर झिरो फिगर म्हणतात... आता मी झिरो फिगर राहिलो नाही याचे वाईट वाटते... पूर्वी कसा मी दहा फुटावरूनही उडी मारायचो पण आता चार फुटावरूनही मारता येणार नाही...
प्रतिभा : इतक्यात चहा नाश्ता घेऊन येते दोघांसाठीही... घ्या साहेब - मॅडम चहा आणि नाश्ता, नाश्त्यात कांदे - पोहे केले आहेत.
विजय : थँक यु ! प्रतिभा ! खरंच मला खूप भूक लागली होती..
यामिनी : पोहे खाता खाता .. विजय ह्या प्रतिभाला काहीच सांगावे लागत नाही, ती सारे अगदी घरच्या माणसांसाठी करतात तसेच करते...
विजय : आपल्यालाही ती घरच्यांसारखीच आहे... पोहे छान केले आहेत हा !
यामिनी : बरं ! हा घे रिमोट आणि तू तुझ्या नायिका बघत बस ! मी आत जाऊन प्रतिभाला स्वयंपाकात थोडी मदत करते.. आज लवकर आले आहे तर..
यामिनी प्रतिभाला मदत करायला स्वयंपाक घरात निघून जाते विजय तेथेच सोफ्यावर बसून चॅनेल बदलत राहतो.... त्याला एक चॅनेल दहा मिनिटापेक्षा जास्त वेळ पाहवत नाही ! तिकडे स्वयंपाक घरात... यामिनी प्रतिभाला स्वयंपाकात मदत असते.. स्वयंपाक करता करता जश्या कोणत्याही दोन बायकांच्या गप्पा रंगतात तश्या त्यांच्याही गप्पा रंगलया...
यामिनी : प्रतिभा ! तू मूळची कुठली ?
प्रतिभा : मी लहानाची मोठी रायगडला झाले
यामिनी : मग ! तू रायगड किल्ला पाहिलास कि नाही ?
प्रतिभा : नाही पहिला मॅडम !
यामिनी : रायगडला राहून तू रायगड किल्ला पाहिला नाहीस ! अगं ! मी रायगडावर चार पाच वेळा गेले आहे ... तुझ्या गावच्या घरापासून किती वेळ लागेल रायगडावर जायला ?
प्रतिभा : एकदा तास लागत असेल..
यामिनी : आपण काढू एकदा पिकनिक रायगडावर ! आता मी घेऊन जाईन तुला...
यामिनी : बरं तुझ्या घरी कोण कोण असतं ?
प्रतिभा : मी , माझ्या नवरा आणि दोन मुलं, मोठी मुलगी आणि छोटा मुलगा, मोठी मुलगी आता तिसरीला आहे आणि मुलगा पहिलीला...माझं लग्न लवकर झालं ना !
यामिनी : तुझा नवरा काय काम करतो ?
प्रतिभा : आहे एका कंपनीत कामाला...
यामिनी : बाकीचे नातेवाईक ?
प्रतिभा : सासू सासरे असतात गावाला , दोन दीर आहेत त्याची लग्ने झालेली आहेत ते पाहतात त्याचं त्यांचं !
यामिनी : तुमचं घर स्वतःच आहे ना ?
प्रतिभा : नशीब छोटस का होईना आमचं घर स्वतःच आहे नाहीतर या वाढत्या महागाईत मुंबईत राहणं मुश्किल झालं असत.
मॅडम तुमचं आणि साहेबांचं लग्न कधी झालं ?
यामिनी : आमच्या लग्नाला पाच वर्षे झाली ...
प्रतिभा : मग ! अजून मुलबाळ का झालं नाही ?
यामिनी : ते आम्हालाच नको !
प्रतिभा : का ?
यामिनी : आहेत आमची आमची काही करणे , सांगेन नंतर कधी तरी तुला सविस्तर... बरं ! तू विजयला कशी काय ओळखतेस ?
प्रतिभा : साहेब पूर्वी ज्या चाळीत राहायचे त्या बाजूच्या चाळीत साहेबांचा मित्र राहतो, तो माझ्या मावशीचा मुलगा ! मी मुंबईला घर काम करू लागल्यावर सुट्टीत त्याच्या घरी जायचे ! साहेब माझ्या मावस भावाला भेटायला यायचे अधून मधून तेंव्हाच आमची ओळख झाली होती.
यामिनी : विजयच्या जवळ - जवळ सर्व मित्रांना मी ओळखते काय नाव काय त्या मित्राचे ...
प्रतिभा : अजय !
यामिनी : तू अजय भावोजींची ! मावस बहीण आहेस म्हणजे आमच्या घरातीलच आहेस कि ! अजय भावोजी खूप हुशार आहेत हा ! ते येतात वर्षातून एक दोनदा विजयला भेटायला आमच्या घरी... मी आणि विजय गेलो आहोत त्याच्या नव्या घरात...तुझी वाहिनीही माझी छान मैत्रीण आहे ... आमच्यात होत असतात गप्पा अधून मधून...
प्रतिभा : आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला शिकता आले नाही ... त्याचा आज पश्चाताप होतोय ! मी ही शिकलेले असते तर आज मी स्वतःच्या पायावर उभी असते !
यामिनी : तू फार शिकली नाहीस म्हणून काय झाले ? तू आजही स्वतःच्याच पायावर उभी आहेस ! तू जे काम करतेस ते काही हलके काम नाही ! ते तर सर्वच बायकांना कधी ना कधी करावेच लागते ! पण तुमचे विशेष कौतुक करायला हवे कारण तुम्ही तुमच्या घरातील कामे करून आमच्या घरातील कामे करता . जर तुम्ही आमच्या घरातील कामे केली नाहीत तर आम्हाला बाहेरच्या जगात कर्तृत्व गाजवता येणार नाही ! विजय ! मला म्हणाला कि तू त्याच्या ओळखीची आहेस पण तो मला हे म्हणाला नाही कि तू अजय भावोजींची बहीण आहेस ! प्रतिभा ! तू यापुढे मला मॅडम नको म्हणू ! तू मला ताईच म्हणत जा !
प्रतिभा : बरं ताई ! ... ती गालात गॉड हसली ..
यामिनी : बरं ! आता तुझं आवरलं कि तू घरी जा ! आणि मला जरा चहा गरम करून दे ! साहेबांना घेऊन जाते... साहेबांना एक वेळ जेवायला नसेल तरी चालेल पण सारखा चहा लागतो.
यामिनी चहाचा कप घेऊन बाहेर हॉलमध्ये आली आणि तो चहाचा कप विजयच्या हातात देत ..
यामिनी : तू मला सांगितले नाहीस कि प्रतिभा अजय भावोजींची मावस बहीण आहे म्हणून ?
विजय : सॉरी ! सॉरी !! तुला सांगेन सांगेन म्हणालो आणि विसरून गेलो, म्हणूनच तुला मी म्हणालो होतो ,'' ती आपल्या घरातल्या सारखीच आहे..
यामिनी : मला एक मोलकरीण हवी होती पण प्रतिभाच्या रूपात बहीणच मिळाली...
प्रतिभा : बाहेर येऊन ! ताई सर्व कामे झाली आहेत , मी आता निघते ! उद्या सकाळी येते...
यामिनी : चालेल ! तू ये आता, जरा उशिरा आलीस तरी चालेल ! तसाही मी काही ऑफिसमध्ये डबा वगैरे घेऊन जात नाही ..
प्रतिभा : बरं !
प्रतिभा निघून गेल्यावर यामिनी सोफयावर विजयच्या बाजूला बसते आणि ...
यामिनी : विजय ! प्रतिभा मला विचारत होती कि तुमच्या लग्नाला पाच वर्षे झाली तरी मुलबाळ का नाही ?
विजय : तू काही सांगितले नाहीस ना ?
यामिनी : नाही ! मी काहीही सांगितले नाही...
विजय : सांगूंही नकोस ! तिला ते पचणार नाही...
यामिनी : हा मुलाबाळांचा प्रश्न हल्ली मला आपल्या बाबतीत जवळ जवळ सर्वांच्याच नजरेत दिसतो...
विजय : पण या सगळ्या गोष्टी आपण गृहीत धरूनच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता ना ?
यामिनी : विजय तू बोलतोस ते बरोबर आहे ! पण हे असे प्रश्न पुरुषांना नाही तर फक्त स्त्रियांना विचारले जातात !
विजय : त्याची मला कल्पना आहे... या विषयावर आपण नंतर चर्चा करू !
यामिनी : बर ! मी जरा आत जाऊन पडते... जेवणाची वेळ झाली की मला हाक मार ... मग आपण जेवायला बसू ..
विजय : बरं बाई ...
-- निलेश बामणे
January 15, 2023
पूर्वीच्या काळी गावागावात, चोपेवर, देवळाच्या पारावर, किंवा एखाद्या मोठ्या वृक्षाच्या सावलीत चौथऱ्यावर त्याचप्रमाणे शहरातील मुख्य चौकात, एखाद्या पानठेल्यावर किंवा नाक्यावर लोक समूहाने एकत्र यायचे. उशिरापर्यंत त्यांचे रात्री गप्पांचे फड बसायचे. त्याच पद्धतीने हल्ली इंटरनेटच्या माध्यमातून, व्हाट्सअप किंवा फेसबुक यांच्या ओट्यावर बसून म्हणू या हवं तर आपण. तर समूहानेच एकत्र येऊन गप्पांचे फड रात्री उशिरापर्यंत भरलेले दिसून येतात.
January 7, 2019
युरोपातील सर्व शहरात सायकलींचे प्रमाण खूपच आहे यापूर्वी असा उल्लेखही आलाय. नेदरलँडमध्ये मध्ये तर,तीन मजली लांबच लांब सायकल स्टॅंड बघून आश्चर्य वाटले. तेथे सायकलींसाठी, फोर व्हीलर साठी आणि पायी चालण्याऱ्यांसाठी एकाच रस्त्यावर स्वतंत्र समांतर ट्रॅक्स आहेत .रहदारी एवढी शिस्तीची की,कोणीही ट्रॅक सोडून चुकूनही जाणार नाही.
सिग्नल तोडणे हा प्रकार औषधाला सुद्धा सापडणार नाही. कोणतेही वाहन नसेल, रस्ता निर्मनुष्य असेल तरीही सिग्नल तोडून जाणारा ईसम तुम्हाला अजिबात दिसणार नाही. ग्रीन लाईट येईस्तोवर तो नक्कीच थांबतो.मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे, पादचाऱ्यांना तेथे चालताना खूपच सुरक्षित वाटते. झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता क्रॉस करताना सिग्नल नसेल तरीही दोन्ही बाजूची वाहतूक अक्षरशः थांबते.पादचाऱ्यांसाठी एवढा रिस्पेक्ट येथेच बघावयास मिळाला.शिवाय पायी चालणारांना घाई असेल तर सिग्नल पोलवर असणारे विशिष्ट बटण प्रेस करुन वाहनांना थांबवण्याची विनंतीही करता येते. एकाच रस्त्यावर एवढे सारे ट्रॅक्स म्हणजे विचार करा किती छान असतील हे रस्ते!
रस्त्यांवर अतिक्रमण, फेरीवाले,मोठे मोठे बॅनर वगैरे गोष्टी तर बादच आहेत तिकडे. वाहतुकीच्या वेळी दोन वाहनांमधील ठराविक आंतर ठेवण्याची पद्धत खूपच कौतुकास्पद. इंचभरही कमी जास्त अंतर दिसणार नाही. पार्किंग काय सुंदर व्यवस्था आहे म्हणून सांगू !कोणतीही गाडी काढावयास कोंडी होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेत मोठ्या मोठ्या मोकळ्या जागांवर शिस्तीत गाड्या पार्क केलेल्या दिसतात.जणू काही गाड्यांची शेतंच असावीत ती!
अशी सगळी वाहतूक व्यवस्था आहे म्हणूनच की काय, युरोपात छोट्या छोट्या बाळांना त्यांचे आई-बाबा कडेवर घेऊन फिरताना दिसलेच नाहीत कधी. छान छान बाबा गाड्यांमध्ये बसत ही गुबगुबीत गुलाबी बाळं डोळे किलकिले करत टुकूटुकू बघत बाहेर फिरण्याचा आनंद लुटत असतात.
जर्मनीच्या कोलोन शहरातील कॅथॅड्रल ची भेट संपवून आम्ही आता निघालो होतो ते आल्प्स पर्वतांच्या रांगांमधून सफर करत, करत थेट स्विझरलँड या स्वप्न भूमीवर पाऊल ठेवण्यासाठी. प्रचंड दाट अशा उंच उंच झाडांनी व्यापलेल्या ब्लॅक फॉरेस्ट मधून वळणावळणाच्या वाटेने चालू असणारा हा प्रवास, खूपच मोहरून टाकणारा ठरला. या पर्वतांवर जंगलांमध्ये असणारी झाडी एवढी दाट आहे, की झाडाच्या वरच्या शेंट्यांना सुद्धा सूर्यप्रकाश दिसत नाही.म्हणून झाडाच्या पानांचा रंग काळपट हिरवा दिसतो.दुरुन तर तो आपल्याला काळाच वाटतो.म्हणूनच हे ब्लॅक फॉरेस्ट.
जंगलाचे सौंदर्य बघत बघत रस्त्यात द्रुबा या ठिकाणी आम्ही थांबलो. अगदी जुने वाटणारे, पावसाच्या पाण्याच्या माऱ्याला सतत तोंड देत, खंबीरपणे उभे असणारे,जमिनीपासून थोडे उंच असे संपूर्णपणे लाकडात बनवलेले एक घर आम्ही बघितले. हे लाकडीच पण मजबूत घर म्हणजे, स्वित्झर्लंडमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध 'कूकु क्लॉक्स 'ची फॅक्टरी होती ती. लाकडातच बनवलेली पण वेगवेगळ्या आकारांची घड्याळं होती ती. या सर्व घडाळ्यांमध्ये समान असणारा धागा म्हणजे छोटा चिमणीवजा पक्षी.दर तासाला घरट्यातूनतून तोंड बाहेर काढावा तसा बाहेर आपला "कुकू"असा आवाज काढतो.म्हणूनच ही 'कुकू क्लॉक्स'.अगदी एक करोड पर्यंत किंमती असणारी ही पारंपारिक घड्याळं जगभर निर्यात होतात.
कालानुरूप यांच्या रचनेत बदल ही होत गेलाय पण बनवली जातात आजही लाकडातच.
निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य डोळ्यांनी पित पित, मधूनच सोबतीला पावसाची संगत.पर्वत राजीं वरून वाट काढणारे धवल पाण्याबरोबर मंजुळ नाद करणारे असंख्य झरे. हा प्रवास अव्याहत असाच चालूच रहावा संपूच नये कधी असे वाटणारे हे सौंदर्य मन आणि शरीर दोन्ही हलकं हलकं बनवत अंगावर रोमांच उभे करत होता. कुठेही नजर टाकली तरीही ते दृश्य कॅमेरात बंदिस्त करावयास हवेच. असे वाटणारा हा वेड लावणारा निसर्ग.
थोडीशी जरी सपाट जमीन दिसली तरीही, तेथे असणारे झोपडीवजा एखादं दोनच घरं, त्या घरांमधील माणसं कधीच दिसले नाहीत बाहेर तो भाग निराळा.पण अगदी एखादेच घर असेल तरीही पहाडांवर त्या घरात पर्यंत पोचण्यासाठी व्यवस्थित बांधलेला डांबरी रस्ता खूपच कौतुक वाटले या सर्वांचे. कायम अशा संपन्न निसर्गाच्या संगतीने राहणाऱ्या तेथील लोकांचा हेवा वाटला क्षणभर. स्वित्झर्लंडच्या माउंट टिटलिस कडे नेणाऱ्या या प्रवासामध्ये जाताना हृराईन वॉटरफॉल आहे. हा जर्मनी मधूनही आपल्याला बघता येतो आणि स्विझर्लंड मधूनही. अर्थातच दोन्हींची रुपं वेगवेगळी.नेउह्यूनसेन मधून दिसणारा या वॉटर फॉलचा नजारा, म्हणजे खरोखर वर्णन करावयास शब्द अक्षरश: थिटे पाडणारा....
निसर्गाच्या नानाविध आविष्कारांचा आस्वाद घेत घेत हृराईन नदीवर असणारा हा धबधबा म्हणजे निसर्ग सौंदर्याचा रुद्राविष्कार. तरीही हे दृश्य तेथेच खिळवून ठेवत होते हेही तेवढेच खरे.
धबधब्यापर्यंत पोहचण्यासाठी हिरवट निळसर पाण्याने खळखळून वाहणाऱ्या नदीतून आम्ही दहा-पंधरा मिनिटं बोटीतून प्रवास केला असे म्हणण्यापेक्षा, या नदीच्या विशाल पात्रातून नदीची अनेकानेक रूपं निरखत निरखत धबधब्याच्या पायथ्याशी जाऊन पोहोंचलो. अतिशय उत्कंठा वाढवणारा हा क्षण. आपल्या मनात एकाच वेळी असंख्य भावनांची मांदियाळी निर्माण करणारा ठरतो.एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि बऱ्याच मार्गांवरून पण अतिशय उंचावरून पडतानाचे हे फेसाळलेले शुभ्र असे पाणी खोल खाली पडत असताना त्याच्या भेसूर आवाजामुळे उरात धडकी भरवते.सुरुवातीला निसर्गाच्या या अतिसुंदर रुपाला आपण अगदी जवळून बघत आहोत, या जाणिवेने होणारा आनंद तर रोमांच उठवणारा. त्याच वेळी पाण्याच्या प्रचंड वेगामुळे संपूर्ण वातावरणात सर्व दूरपर्यंत पसरणाऱ्या दवांमुळे अतिशुभ्र रंगाच्या धुक्यातून आपण जात आहोत, हा होणारा भास रोमहर्षकच!या दवांमध्ये न्हाऊन निघण्याचा अनुभव अविस्मरणीय.
धबधब्याच्या रौद्र रूपाचे दर्शन आपण विविध पातळ्यांवरून घेतो ना,तेव्हा आपला हात जर निसटला तर.... या जाणिवेने जीवाचेच पाणी पाणी होते मात्र. अगदी उंच असणाऱ्या सुळक्याच्या एका टोकावरुन ज्यावेळी हा धबधबा आम्ही डोळ्यात साठवत होतो, त्या वेळी खरोखर निसर्गाला साष्टांग दंडवत घालावा असेच वाटले होते. किती अप्रतिम सौंदर्य होते ते!या निसर्गापुढे आपण माणूस म्हणजे अगदीच क:पदार्थ याची प्रचिती आली. नि क्षणभरात मनाला चिकटून बसलेला हा मी गळून गेला.....
निसर्गाचा हा अद्भुत आविष्कार, आमच्या डोळ्यात,मनात, आणि स्पर्शातही शक्य तेवढा साठवून घेत आम्ही बोटीने पुन्हा नदीच्या काठावर येऊन पोहोंचलो. आमच्या गाडी बरोबर अतिसुंदर असा झ्यूरिच लेक संथपणे वाहता वाहता गर्द हिरव्या झाडांची हिरवाई, आकाशाची निळाई ,ढगांची धवलाई नि हवेची लहराई सोबत घेऊन वाहात होता.आजुबाजूच्या घरांचे प्रतिबिंब सुद्धा स्वतःमध्ये सामावून घेणाऱ्या या लेकच्या कडेकडेने आम्ही सायंकाळपर्यंत पोहोंचलो ते ल्यूझर्न या स्वर्गलोकीच्या उंबरठ्यापर्यंत !
भाग ५ समाप्त
क्रमश:
© नंदिनी म. देशपांडे
January 2, 2019
मला खूप बरे वाटले. सकाळपासून मी जाम वैतागलो होता. त्यांचे चांगले शब्द ऐकून वाटले, चला, आज पहिलाच दिवस होता, रोज काही असे होणार नाही. हळूहळू होईल दोस्ती. पण हा माझा विचार किती भ्रामक होता याची चुणूक मला लगेचच दिसून आली.
थोड्या वेळाने गोपाळ आला आणि रजिस्टर घेऊन गोरेसाहेबांना नेऊन दिली. माझे काम पाहून गोरेसाहेब आणि मॅनेजर खूश होणार याची मला शंभर टक्के खात्री होती. त्यामुळे मनातून मी खूप आंनदलो होता.
June 25, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti