(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे

    “काल “ची असा शब्द वापरण्याऐवजी या शब्दसमूहात “पूर्वाश्रमीची” असा शब्द वापरलाय, बहुधा “महत्वाची” असावीत म्हणून ! महत्व लोप पावल्याने/ निरुपयोगी असल्याने हळूहळू गृहीत धरली जाणारी, काळाच्या ओघात विसरली जाणारी, एका कोपऱ्यात ढकलली गेलेली माणसे यांच्या संदर्भात नुकतेच काही वाचनात आले.

      September 30, 2022


  • प्रिय…

    प्रिय… २ दिवसांनी तुझा वाढदिवस आहे. तुझ्यासाठी अगदी नकोसा वाटणारा दिवस. कारण; सगळ्यांना तू हवा असतो तुझ्या वाढदिवसाला. गेल्या वर्षी पर्यंत माझही जरास असंच होत. नाही का? पण तुझ्या गेल्या वर्षीच्या वाढदिवसामध्ये आणि या वर्षीच्या वाढदिवसामध्ये खूप फरक आहे. हो ना? अगदी गेल्या वर्षापर्यंत आपण एकमेकांचे अगदी जवळचे मैत्र होतो. यावर्षी आपण एकमेकांचे कुणीही नाही. आपण एकमेकांसाठी कुणीही नाही. अगदी अनभिज्ञ आहोत आता एकमेकांसाठी.

      March 18, 2019


  • प्रेम कविता/ प्रेमदिन स्पेशल

    प्रेमाच्या दिनी

    गुलाब भेट दिली.

    प्रेमाची ‘राजधानी’

    हृदयी धडधडली.??????

      February 18, 2012


  • “ग्रेस “म्हणजेच अभिजातता !

    ग्रेस यांच्या कवितावाचनाची एक CD मी काही वर्षांपूर्वी विकत आणली आणि हे व्यक्तिमत्व माझ्यावर प्रभाव टाकून गेले. सो कॉल्ड “दुर्बोधतेचा “शिक्का त्यांच्यावर मारून मराठीजन मोकळे झाले असले तरी ही व्यक्ती मराठी शब्दांना ज्या अलौकिक उंचीवर नेऊन ठेवते त्याचे विस्मयकारक अनुभव मी अनेकवेळा घेतले.

      January 18, 2022


  • कोलीडोस्कोप

    नातवाच्या खेळणीमधील एक खेळणी हाती लागली. एक गोल पुंगळी दोन्हीकडे पारदर्शक काचा.एका बाजूने बघीतले तर दुसऱ्या बाजूला अनेक लहान लहान रंगीत काचांचे तुकडे. त्यामधून अनेक कलापूर्ण डिझाईन दिसायचे. अतीशय मनोहर व मनास आनंदीत करणारे प्रक्षेपण असे. मात्र गमतीचा भाग असा की आतील रंगीत तुकड्याची हालचाल झाली की दिसणाऱ्या डीझाईनमध्ये त्वरीत बदल होत असे. प्रत्येक डिझाईन तसेच मनोहर व आकर्षक. फक्त एक गोष्ट प्रखरतेने लक्षांत आली की "दृष्य " सतत बदलत, मनोहर असे परंतु एकदा बघीतलेले दृष्य पून्हा तेच व तसेच म्हणून केव्हांच दिसले नाही. दिसू शकणार नव्हते. रंग संगतीची सतत उधळण होत असे. विविधते मधला तो आनंद टिपला जाई. ज्यांत केव्हांच नव्हती स्थिरता. तोच तोपणा. अस म्हणतात की "आनंद " हेच फक्त ईश्वरी सत्य आहे. आनंद म्हणजेच ईश्वरी दर्शन. आनंद हा भावनेचा सर्वात उच्य असा अविष्कार असतो. त्यांत इतर भावने प्रमाणे कोणताही विरोधाभास नसतो. आनंद हा चेतना स्वरुपांत व्यक्त होतो. कोणत्याही सभोवतालच्या दृष्य अदृष्य वस्तूमधून जाणीव देणाऱ्या, मन उल्हासीत करणाऱ्या चेतनेमध्ये आनंद असतो. कोलीडोस्कोप मधून क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या परंतु प्रत्येक प्रक्षेपित दृष्यामध्ये आनंद समावलेला आहे. बदलते स्वरुप ही चिंतेची बाब वाटते. कारण ज्याच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित होते. आनंदाचा ठेवा हाती लागतो. ज्याच्यात आनंद अर्थात ईश्वरी रुप बघीतले जाते. तो ढगांच्या हालचालीप्रमाणे स्वरुप बदलत जातो. मग स्थिरता समोर नसेल तर एकग्रता कशी होणार. ह्यातच त्याला समजले पाहीजे. कारण "आनंद " याचे स्वरुप लहरी, लाटा, छटा ह्यानी अनुभवण्याचा, जाणण्याचा प्रकार आहे. ज्यांत बदलणारी संकल्पना आहे. परमेश्वरला जेव्हां निर्गुण रुपांत समजले जाते. त्याच वेळी कोणतेही रुप, कोणताही आकार, कोणते ही मोजमाप, कोणतेही वर्णन त्याला लागु पडत नाही. ज्या ठीकाणी असा प्रयत्न होतो तो निर्णय केलेला विचार असतो. असत्यात तो जाऊन बसतो. म्हणूनच असे मान्य झालेले आहे की परमेश्वर अनुभव येणे, जाणीव होणे हे शक्य आहे. परंतु प्रत्यक्ष बघणे कदापीही, केव्हांही सत्य असून शकत नाही. कारण तो फक्त आनंदमय आहे. सतत बदलणाऱ्या छटांत, गुणधर्मांत, एक उर्जा शक्तीच्या रुपांत

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 8, 2017


  • चंद्रलेखा नाट्यसंस्थेचा वर्धापनदिन

    चंद्रलेखा हे खरे तर नाटककार वसंत कानेटकरांच्या मुलीचे नाव.त्यांनीच हे नाव वाघांना सुचवले आणि ही नाट्यसंस्था जन्माला आली. पुढच्याच महिन्यात ७ डिसेंबर १९६७ रोजी ‘गारंबीचा बापू’ ह्या नाटकाने ‘चंद्रलेखा’ची सुरुवात झाली.

      November 23, 2021


  • रेशीमगाठी – भाग ४

    पाच-दहा मिनिटांतच एक उंचीपुरी, गौरवर्णी, तरतरीत मुलगी आत आली. वेळेवर पोचतो की नाही यामुळे येणारा एक प्रकारचा अस्वस्थ भाव तिच्या चेहऱ्यावर उमटला होता. ती घाईने क्लार्ककडे आली आणि तिने विचारलं, “का हो, कुणी केदार देशपांडे आले आहेत का?”

      March 10, 2022


  • हजार तोंडांचा रावण

    विश्वनाथ शिरढोणकर हे मध्यप्रदेशात स्थायिक असलेले ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि कवी आहेत. हिंदी भाषेतदेखील त्यांच्या अनेक साहित्यकृती प्रसिद्ध आहेत. त्यांच्या हजार तोंडांचा रावण या लघुकथासंग्रहाची ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवणी यांनी लिहिलेली प्रस्तावना.

      August 14, 2023


  • स्त्री ईश्वराची एक अप्रतिम कलाकृती

    जन्मताच स्त्रीची सर्वांगीण ताकत जास्त असते. जीवनाच्या प्रत्येक पाऊलावर हे सिद्ध झालेले आहे की तिच्यात प्रचंड क्षमता व उरक शक्ती असते. बौद्धीक, शारीरिक, मानसिक शक्तीमध्ये तिचा वरचढपणा स्पष्ट झालेला आहे.ज्या वेळी संधी मिळाली, तिने आपली योग्यता सिद्ध केली आहे.

      December 6, 2017


  • माझे शाळेचे दिवस

    मित्र हो , एकच एक गाव आणि एकच एक शाळा , अशी दीर्घ आणि  घट्ट मैत्री “असे मी अनुभवले नाहीये .पण अनेक गावं ,अनेक शाळा , अनेक मित्र .आणि मैत्रीची विविध रूपे मी अनुभवली ,या अनुभावंनी मला घडवले .

      January 13, 2019