नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
ही कथा शास्त्याने जेतवनात राहत असताना लालुदायी येराळा, ज्याला मठ्ठ असे म्हणत असत, त्याला उद्देशून सांगितली.
December 25, 2024
मराठी व हिंदी फिल्मजगतातील ज्येष्ठ व श्रेष्ठ पुरुष/स्त्री कलाकारंच्या परिचयातून त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्य दाखविण्याचा लेखकाचा प्रयत्न सफल झाला आहे. मोठे आर्टिस्ट असले तरी ते त्यांच्या सहवासातील छोट्या लोकांशी कसे मोठेपणा झुगारुन वागत याची खूप उदाहरणे पुस्तकात मिळतील.
फिल्मी चक्कर
लेखक : रमेश उदारे
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १३०/- रुपये
पाने : ११२
October 18, 2016
तेव्हा ग्रेगरी पेकच्या घोड्यावरती सोनं भरलेल्या पिशव्या असतात व ओमर शरीफच्या पिशव्यांत असतात फक्त दगडं.. या चित्रपटात ओमर शरीफनं ‘बदमाश’ खलनायक रंगवला होता…
July 27, 2021
तोच तो भाग्यवान कागदाचा तुकडा, ज्यावर त्या महान संशोधकाचे हस्तलिखीत उतरले होते. सोनेरी तस्वीरीमधला ग्राफ, वैद्यकीय इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवीत होता.
January 2, 2019
इथे दंतकथांच्या वदंता होतात. हे पुढच्या पिढ्यांना सप्रमाण सांगायची जबाबदारी आता आपली ! “इरफान ” नांवाची दंतकथा प्रत्यक्ष पाहिली याबद्दल स्वतःची पाठ थोपटून मी आता त्याचे न बघितलेले चित्रपट पाहणार आहे – तेवढंच माझ्या हाती आहे.
May 11, 2021
मित्रानो ‘समस्या नाही असा माणूस नाही, आणि समाधान नाही अशी समस्या, या जगात नाही!’ हे सत्यच आहे. फक्त ‘समस्या!’ नक्की काय आहे, हे कळले पाहिजे. नसता पैसे, वेळ वाया जातोच, पण त्याही पेक्षा ‘गाढवपणा’ पदरी पडतो! पण वाईटातहि काही तरी चांगले असतेच. कालांतराने हाच ‘गाढवपणा’ ‘अनुभव’ म्हणून, अभिमानाने चार लोकांना सांगता येतो.
December 19, 2020
“ अरे ,पोलिस आला रे पोलीस, पळा पळा पळा” दामूआण्णानं गल्लीत गोट्या खेळत असलेल्या पोरांना जेच आरोळी दिली तशी पोरं चिंगाट ज्याच्या त्याच्या घरी पळू लागली. खाक्या कपडेवाला सायकलला काठी अडकवून आलेला पोलीस पोरं भिंतीच्या आडून पाहू लागली. रामला या गोष्टीचा खूप नवल लागलं. तो त्याच्या मित्रांबरोबर तिथेच दबा धरून आडोशाला उभा होता. दामू अण्णानं दिलेली आरोळी खूपच घाबरून सोडणारी होती म्हणून पोरं हातातली दप्तरं तशीच पारावर सोडून पळाली!
February 27, 2024
दोन दिवसांनी आम्ही जमलो. सगळ्याजणी माझी योजना ऐकण्यास अगदी आतूर झाल्या होत्या. त्यांची उत्सुकता अगदी शिगेलाच पोहचली होती म्हणाना.
मी फार न ताणता सुरुवात केली. “आपल्यापैकी बऱ्याचजणी नाट्यविभागात जातात. तिथेच या सर्व प्रकाराचे मूळ आहे अशी माझी पक्की खात्री आहे. आता फक्त आपला संशय पक्का करायचा की झाले. त्यासाठी मी एक युक्ती करायची ठरवली आहे. वासंती, तू आर्ट स्कूलमधे कॅलीग्राफी शिकतेस. तू एक काम करायचं. अरूच्या हस्ताक्षरासारखे हस्ताक्षर काढून एक चार ओळीचं पत्र तयार करायचं. त्यासाठी जाडा भरडा ड्रॉइंग पेपर वापर.
July 1, 2022
संवाद लेखन
हरिप्रिया
१)
प्रियकर:-तुला आठवते का?आपली पहिली भेट.
१)
प्रेयसी:-हो तर,का नाही आठवणार?
२)
प्रियकर:-मी तुला नेहमीच झाडाआडून बघायचो.
२)
प्रेयसी:- मला ते ठाऊक होतं रे
३)
प्रियकर:-अन् तो दिवस उगवला .
३)
प्रेयसी:-१५ऑगस्टचा
४)
प्रियकर:-हो.तुझी तारखही लक्षात आहे ना!!!!
४)
प्रेयसी:-मी कधीच विसणार नाही तो दिवस.
५)
प्रियकर:- मी घाबरतच गुलाब दिला होता तुला.
५)
प्रेयसी:-अरे,अजूनही जपून ठेवलाय मी माझ्या डायरीत.
६)
प्रियकर:-मी तर पाकळ्या सुद्धा मोजल्या होत्या त्याच्या.
६)
प्रेयसी:-तब्बल १६ होत्या,गंमत म्हणजे माझं वयही १६च होतं
७)
प्रियकर:-म्हणूनच मी ते फुल निवडलं होतं.
७)
प्रेयसी:- किती बारीक सारिक गोष्टींचा विचार करायचो नं आपण.
८)
प्रियकर:-तुला आठवतं,आपण एकाच ताटात जेवलो होतो.
८)
प्रेयसी:-आणि तो एकमेकांना भरवलेला घास.
९)
प्रियकर:-मी एफ.वाय ला होतो.
९)
प्रेयसी:- हो ना,आणि मी अकरावीला.
१०)
प्रियकर:-लास्ट इयरला मी कॉलेज सोडलं .
१०)
प्रेयसी:-आणि आपल्या भेटी-गाठी कमी झाल्या.
११)
प्रियकर:-नोकरी निमित्त मी परगावी गेलो.
११)
प्रेयसी:-आणि ,आणि फक्त विरह विरह आणि विरह...
१२)
प्रियकर:-अशातच तुझ्या बाबांनी तुझं लग्न लावून दिलं.
१२)
प्रेयसी:-हो!!!!!
त्या दिवशी माझं कशातच लक्ष नव्हतं.
१३)
प्रियकर:-तु तर एका पुतळ्यावत सगळ्या विधिंना पार पाडलस.
१३)
प्रेयसी:-पण तुला हे कसं काय कळलं
१४)
प्रियकर:-आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो,हे सागण्यासाठी मी आलो होतो.
१४)
प्रेयसी:-पण,तुला उशीर झाला यायला असंच ना.
१५)
प्रियकर:-हो .हे खरच आहे.मी उशीरा पोचलो.
१५)
प्रेयसि:-आणि मी कायमची दुसऱ्याची झाले.
१६)
प्रियकर:-तुला आठवतं ,मी तुला एक पत्र पाठवलं होतं.
१६)
प्रेयसी:-जपून ठेवलं आहे मी ते पत्र.
१७)
प्रियकर:-मी तुला वचन दिलं होतं,ते आजतागायत पाळतोय.
१७)
प्रेयसी:-असं नको होतं तू करायला.
१८)
प्रियकर:-मी केलं ते बरोबरच.
१८)
प्रेयसी:-कसं काय?
१९)
प्रियकर:-कारण तुझं माझ्यावरचं प्रेम अजूनही तितकच अतूट आहे ,याची खात्री आहे मला.
१९)
प्रेयसी:-पण शरीराने मी तुझी कधीच नाही होऊ शकणार रे मी.
२०)
प्रियकर:- नाही तर नाही.
२०)
प्रेयसी:-असं का करतोस? तुही लग्न कर. तुझा संसार बघून मला बरं वाटेल.
२१)
प्रियकर:-नाही अगं!आता ते शक्य नाही.
२१)
प्रेयसी:-पण का?
२२)
प्रियकर:-कारण तुझ्या पतीला मी वचन दिलय.
२२)
प्रेयसी:-काय सांगतोस?आणि ते वचन तरी कोणतं
२३)
प्रियकर:-ते आजारी पडल्यानंतर त्यांनी मला एक दिवस भेटायला बोलवलं.आपलं प्रेम त्यांना ठाऊक होतं.अशातच ते आजारी झाले.आपल्या जगण्याची शाश्वती नाही ,हे बघून तु व तुझी मुलं ,ही जबाबदारी माझ्यावर सोपवली.
२३)
प्रेयसी:-आणि हे सगळं तू मला आज सांगतोय.
२४)
प्रियकर:-हो,कारण मी वचनबद्ध होतो
२४)
प्रेयसी:- किती मोठा हा त्याग. किती मोठं समर्पण.
२५)
प्रियकर:-तुझ्या सुखातच माझं सुख मी बघितलं प्रिये.
२५)
प्रेयसी:- निघते मी,घरी जायलाच हवं.मुलं वाट बघत असतील.
पण हे दिलवरा मी तुला वचन देते ,की ही प्रिया पुढील जन्मी निश्चितच
*हरिप्रिया* झाल्याविना रहायची नाही.ह्या प्रियेला हरी पासून साक्षात परमेश्वरही दूर करू शकणार नाही.
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
January 11, 2020
कौन बनेगा करोडपती ? हा प्रश्न विचारला जाताच करोडपती नसलेल्या जवळ – जवळ सर्वच लोकांचे हात वर जातात. याचा अर्थ करोडपती होण हे प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाच स्वप्न असत. त्या स्वनाच्याच मागे काही लोक आयुष्यभर धावत असतात त्यातील काही हार मानून गप्प् बसतात तर काही आपल्या शेवटच्या श्वासापर्यत त्या स्वप्नाचा पाटलाग करीत राहतात.
July 17, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti