नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
आनंदवनाच्या निर्मितीत बाबा आमटे यांना त्यांच्या पत्नीची साधनाताईंची फार मोलाची साथ लाभली होती. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांनी केलेल्या 'साधने'त कोठेही खंड पडला नाही. साधनाताईंनीही अगदी मनापासून बाबांच्याप्रमाणेच या कार्यात स्वतःला वाहून घेतले. साधनाताई आमटे म्हणजे पूर्वाश्रमीच्या इंदू घुले. आमटे व घुले परिवाराचे मित्रत्वाचे संबंध होते. बाबा आमटे यांच्या कलंदर वृत्तीची साधनाताईंना प्रथमपासूनच कल्पना होती. परंतु चाकोरीबाहेर जीवन जगणाऱ्या व काही तरी वेगळे करून दाखविण्यासाठी जिद्द असलेल्या या तरुणाबद्दल त्यांना आकर्षण होतेच. प्रत्यक्ष विवाहाच्या वेळीं बाबांनी त्यांना 'तुझे एका वादळाशी लग्न झाले आहे' असे स्पष्टपणे सांगितले होते. परंतु साधनाताईंनीही पूर्ण विचारांनीच त्यांच्यासारखा जोडीदार स्वीकारला होता. त्यामुळे पुढे बाबांच्या प्रत्येक कार्यात त्यांनी त्यांना मनापासून साथ केली. कुष्ठरोग्यांची मुले जेव्हा स्वतःच्या घरात ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा साधनाताईंनी त्या मुलांना स्वतःच्या मुलासारखी वागणूक दिली. एक दिवस रड्याच्या कडेला टाकून दिलेल्या एका ताज्या मुलीला घेऊन कोणीतरी आश्रमात आले व साधनाताईंनी त्या मुलीला स्वतःच्या फरात घेतले. तिचे नाव ' धरती' असेच ठेवले व तिला मायेची ऊब दिली. दुर्देवाने ती मुलगी फार काळ जगली नाही; मात्र अनाथ मुलांसाठी 'गोकुळ प्रकल्प सुरू करण्याचे ती प्रेरणास्थान ठरली. 'गोकुळमधील अशा अनेक अनाथ मुलांना साधनाताईंनी आईचे प्रेम दिले. अशा मुलांबरोबर शिकून माझी मुले मोठी झाली व बाबांचे समाजकार्य त्यांनी नेटाने पुढे चालविले आहे, असे साधनाताई मोठ्या अभिमानाने सांगत.
February 9, 2017
पन्नास वर्षांपूर्वी सदाशिव पेठेत असताना घरात ‘इस्त्री’ हा प्रकार नव्हता. फक्त वडिलांचेच कपडे अधूनमधून जवळच्या लाॅन्ड्रीतून इस्त्री करुन आणावे लागत. मी सर्वात लहान असल्याने ते काम माझ्याकडेच असायचे. ती ‘लक्ष्मी लाॅन्ड्री’ होती राऊत नावाच्या माणसाची. त्याचा मुलगा माझ्या वडिलांचा विद्यार्थी.
July 3, 2021
आता गजराचं ते पारंपारिक घड्याळ जरी आपण वापरत नसलो तरी त्याचे वंशज असलेले alarm tones मात्र रोज गजर करतातंच..हा प्रेरणादायी सवंगडी असलेला ‘गजर’, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या आयुष्यात कायम राहो व असा ‘गजर’ करत राहण्याची प्रेरणा आपल्याला सर्वांना पुनः पुनः मिळत राहो..
January 23, 2021

“कैक चॅनलवाले रोज इथं येत आहेत. आमच्यातल्या कुणाला तरी धरून, रडायला भाग पाडून शूटिंग करताहेत. बाईट घेताहेत आणि न्यूज चॅनलवर दाखवून टीआरपी वाढवत आहेत. आमचा बाजार मांडलाय तुम्ही.”
गावकरी संतापले. तो बावरला.
November 13, 2020

विजयने मांसाहार बंद केल्यानंतर पूर्वी त्याला होणारे पोटाचे त्रास बऱ्याच अंशी कमी झाले. सर्वात म्हणजे विजय रागावर विजय मिळविण्यात यशस्वी झाला. आता तर त्याच्या स्वभावात प्रचंड साधेपणा आलेला आहे इतका की एकेकाळी तो साक्षात जमदग्नीचा अवतार होता हे कोणाला सांगूनही खरं वाटत नाही.
January 25, 2022

विजयच्या वाचण्यात एक सर्वेक्षण आले हल्ली जास्त पैसे कमावणारे जास्त आंनदी असतात.आणि विजयला त्याच्या दुःखी असण्याचे कारण उमगले.चांगुलपणा म्हणून विजय केलेल्या कामाच्या पैशाचा फार विचार करत नसे.त्यामुळेच तो आयुष्यात आर्थिक दृष्ट्या यशस्वी होऊ शकला नाही. त्याने केलेल्या प्रत्येक कामाचा जर त्याने योग्य मोबदला घेतला असता तर आज तो आनंदी असता. आज त्याला स्वतःच्या सर्व आर्थिक गरजा भागवताना नाके नऊ आले नसते.
March 14, 2022

शेरलॉक होम्स ह्या खाजगी गुप्त हेराच नांव ऐकलं नाही असा वाचक नसेल. तो इतका प्रसिध्द झाला की लंडनमधे बेकर स्ट्रीटवर त्याचा पुतळा उभारण्यात आला आहे. खरं तर शेरलॉक होम्स हे ॲार्थर कॉनन डायल ह्या लेखकाने निर्माण केलेलं एक पात्र आहे, जे लेखकापेक्षा प्रसिध्द झालं. आजची कथा ही ॲार्थर कॉनन डायल यांनीच सुरूवातीला लिहिलेली कथा आहे. संपूर्ण कथा हे एका आरोपीने ज्यूरीला केलेलं बचावाचं निवेदन आहे. कृपया वाचकांनी स्वत:ला ज्यूरीचा सदस्य समजून कथा वाचावी व निर्णय द्यावा.
July 27, 2022
मराठी ब्लॉगची पध्दत, संगणाकावर नुकतीच सुरु झाली होती. थोडक्यांत वर्णन करायाचे म्हणजे हे एक प्रकारे आपल्या नावाचे एक खाते काढणे असते. ह्य़ाला करआकारणी वा फी नव्हती. आपल्या नावाचा ई-मेल काढून ब्लॉग काढणे. एक प्रकारे वेबसाईट काढण्यासारखेच आहे. ह्य़ा खात्यावर तूम्ही लेख, कविता, माहिती, फोटो इत्यादी देऊ शकतात. वाचक वर्ग ती वाचतात. जर कुणी प्रतिक्रीया दिल्या तर त्या तुम्हास कळतात. कोणता लेख, वा साहित्य किती जणानी वाचले, ह्य़ाची जाणीव येते. मी हे सर्व जाणल्या नंतर आपणही आपल्या नावाने एक ब्लॉग काढवा ही ईच्छा प्रदर्षीत केली. वाचन लेखन ह्य़ांची आवड मनाच्या विरंगुळ्या बरोबर उतारवयांत वेळ घालविणे व ते कारणी लागणे हा हेतू.
" आता वय सत्तरीच्यापुढे गेलेले, तेव्हां ह्या गोष्टींत कशाला अडकवून घेता, मनाला अशांत कराल. " मुलानी माझ्या हलचाली बघून टोकले.
ईश्वरी चिंतन व वाचण्याचा मार्ग सुचविला.
कोणत्या वयामध्ये कोणते काम करावे ह्य़ाचे नियम नसले तरी शारीरिक क्षमता न मानसिक संतूलन हे त्या कार्यावर मर्यादा टाकतात. हे एक सत्य असते. त्या सर्वांचा विचार होवूनच कोणतेही कार्य हाती घ्यावे. मी माझ्या जीवन आराखड्यातील अनेक छोट्या मोठ्या कर्याचा आढावा घेवू लगलो. तरुणपणी कोणतीही गोष्ट मनांत येतांच ती केली जात असे. तीची योजना, कारवाई, व परिणाम ह्याचा कोणताच गंभीरतेने विचार केला नव्हता. तडफ होती, धडपड होती. प्रौढत्व आले, तेव्हां कोणतीही गोष्ट करायची म्हणजे प्रथम त्या विचारावरच खूप विचार केला जायी. योजना आखल्या जात होत्या. सर्व अंगानी म्हणजे शारीरिक,मानसिक,आर्थिक, कौटुंबीक आणि सामाजीक, तो होइ. केव्हां यश केव्हां अपयश येत होते. मात्र हे सत्य होते की काम, प्रयत्न आणि यश ह्य़ाविषयी एक जिद्द मनात होती. त्या धडपडीत त्या कामाचे अपेक्षीत परिणाम मिळवीण्याचीच चेतना होती. त्यामुळे समाधान व निराशा ह्याना सामोरे जावेच लागत असे. एक कथा वाचली होती. कुण्या एका नव्वदीच्या माणसाने झाडाचे बी शेतांत लावले होते. हे महीत असून की तो स्वतःचे वय व आयुष्य मर्यादा जाणून त्याचे फळ उपभोगणार नाही. स्वतःसाठी नाही तर इतरासाठी, हीच त्याची प्रेरणा होती. फळाची अपेक्षा नसल्यामूळे फक्त आनंद होता.
सत्तरीच्या पुढे गेलेल्या वयांत संगणकावर ब्लॉग काढणे, लिखाण करणे, त्यासाठी वाचन करणे, हे सारे सर्व साधारण अपेक्षित नसले तरी ते गैर वाटत नव्हते. येथे कोणतीही गोष्ट, वा यश मिळवण्याची धडपड नव्हती, अपेक्षा नव्हती. आगदी फळाची इच्छा न बाळगता केले जाणारे काम. ह्य़ात मला मिळणार होता फक्त एक आनंद, समाधान आणि व्यस्त राहण्याची कला वा सवय. शरीर ज्येष्ठत्वाकडे झुकताना त्याच्या गुणधर्मा प्रमाणे ते व्याधींचे शिकार बनणारच. वेळ पुढे ढकलता येते, परंतु काळाला कुणीच रोखू शकत नाही. हे सत्य आहे.
जे कराचचे होते, ज्याची क्षमता होती, ते पुर्ण झाले ही भावना ज्येष्ठ म्हणून पक्की करावी. जे होवू शकले नाही, त्या बद्दल आपण कमी पडलो कां ? हे समजले पाहीजे.
ज्याना काळ-वेळेचे भान, स्वताः च्या क्षमतेची आणि वयाच्या मर्यादाची जाण, हे सारे समजते, तोच जीवनांत खूपसे साध्य करतो. गरीबाना पैशाची किम्मत कळते, असे म्हणतात. त्याच प्रमाणे ज्येष्ठांना वेळेच महत्व कळलेले असते. ते आपल्या उर्वरीत आयुष्याचे अंदाज वर्षे, हाताच्या बोटावरुन हेरतात. दिनदर्शीकेकडे त्यांचे लक्ष नसते. जे राहून गेले त्याबद्दल खंत न करता, उरलेल्या आयुषांचा काळ कोणत्याही चांगल्या योजनेत व्यतीत करण्याचा प्रयत्न व्हावा. नामस्मरण, ईश्वरी चिंतन, ध्यान धारणा, चांगले वाचन, लेखन, अहार, निद्रा (विश्रांति ), आणि बौद्धिक चर्चा, व्यायाम ह्य़ा अपेक्षित कार्यक्रमा शिवाय एखादा छंद जोपावा. जो मनास आनंद, समाधान, व शांतता देणारा असेल. त्यांत कोणतेही ध्येय वा फलाशा नसावी. मराठी ब्लॉग, त्यावरचे लिखाण, चर्चा, आणि रसगृहण हे मजसाठी असेच असणार नाही कां ? तो फक्त व्यस्त राहण्याचा मार्ग असावा.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 17, 2016
मी अजून शाळेत जावयास लागलो नव्हतो. त्या वेळी आम्ही वर्ध्याला केळकर वाडीत खळदकर यांचे घरात भाड्याने राहत होतो. नानांनी म्हणजे माझ्या वडिलांनी तेथेच माझ्या हातून पाटीवर …..
October 21, 2014
सकाळी सव्वा सात वाजता एजंट सैफुल हॉटेलच्या लॉबी मध्ये येऊन थांबला होता. अर्ध्या तासात हॉस्पिटल असलेल्या भागात पोचलो, पण माझे मेडिकल चेक अप नेहमीच्या हॉस्पिटल मध्ये नसल्याने सैफुल ला थोडं शोधावं लागलं. जकार्ता मधील लिप्पो व्हिलेज या पॉश एरिया मध्ये सिलोम हॉस्पिटल ची मोठी शाखा होती.
August 10, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti