नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
लहानपणी शाळेत. पुढे कॉलेज मध्ये. गावातील पारावर. आणि काही ठराविक ठिकाणी गप्पा खूपच रंगतात. आणि नंतर नावच पडून जाते त्याचे. आमच्या गप्पांचे नाव होते आज्जीच्या पायऱ्या. अगदी असेच होते आमच्या गावी घरासमोर एका घराच्या चार पायऱ्या होत्या.
February 2, 2022
November 26, 2022
त्या वेळी जागतिकीकरणाचे वारे एवढ्या वेगाने वाहत नव्हते. भारतीय अर्थव्यवस्थाही खुली व्हायची होती. मी जपानला गेलेलो होतो. तिथलं जीवन, सुबत्ता, सांस्कृतिक आणि सामाजिक बदल पाहत होतो. अनेकांना भेटत होतो. जपानी माणसांची घरं लहान; पण ते अशी सजवितात की ती मोठी वाटावीत. अर्थात, तिथं पाहुण्यांना घरी बोलावून मेजवानी करावी, अशी पद्धत नाही. स्वतचं खासगीपण अत्यंत निष्ठेनं जपणारी ही माणसं. जपानच्या या दौर्यात घरचं जेवण मिळायला हवं असं वाटत होतं अन् त्यासाठी आम्ही गळ घालीत होतो ती आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी नेमलेल्या मुलीला. खूप प्रयत्न केल्यानंतर अखेर ती आम्हाला निमंत्रित करायला राजी झाली. तिचं घरही छोटसंच होतं. दोन खोल्या, बाल्कनी आणि स्वच्छतागृह. घरात येतानाच तिनं प्रत्येकाला सपाता दिल्या. घरात वापरण्यासाठी. प्रत्येक घरात असतातच त्या. घराच्या सजावटीत एक निसर्गचित्र असं लावलं होतं, की घरालाच एखाद्या बगिचाचं स्वरूप यावं. तिनं आमच्यासाठी `सुशी' केली होती. सुशी हा जपानमधला खास लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ. वेगवेगळ्या प्रकारचे मासे कच्च्या स्वरूपात खायचे असतात, हे सारं आता आठवावं, याला कारणही तसंच आहे. कालच एक बातमी वाचली... आता भारतीय आंबा जपानला निर्यात होण्याची शक्यता वाढलीय. भारतीय आंब्यांच्या उत्पादन पद्धतीपासून घटक नियंत्रणापर्यंतची तपासणी केल्यानंतर या हंगामात काही प्रमाणात आंबे जपानला जाऊ शकतील, अशी ती बातमी होती. तर, त्या वेळच्या आमच्या जेवणाच्या टेबलावर सुशी होत्या, ब्रेडचे वेगवेगळे प्रकार होते आणि एक मद्याची बाटली. सहज पाहायची म्हणून ती बाटली पाहिली. `इंडियन हनी' असा ठळक उल्लेख त्यावर होता. स्वाभाविकपणे चर्चा सुरू झाली ती भारतीय पदार्थांवर. जपानच्या छोट्या-मोठ्या उत्पादनावर आणि दोन्ही देशांच्या संबंधावर. सहजी विषय निघाला आंब्याचा. मी म्हटलं,`तू हापूसचा आंबा खाल्लायस?' उत्तर नकारार्थीच होतं. आंबा हा काही वर्णन करून सांगायचा प्रकार नाही. तो अनुभवायचा असतो. त्याचा स्वाद सांगायचा नसतो, घ्यायचा असतो. आंबा खाल्ल्यानंतर हाताला दरवळणारा गंध साठवायचा असतो; पण त्या दिवशी आंबा हा आस्वादाचा नव्हे, तर गप्पांचा विषय होता. त्या वेळी लक्षात आलं, की बोलण्यासारखं खूप आहे, आंब्याबद्दल. जगात फळांचा राजा म्हणून त्याचं असलेलं निर्विवाद स्थान आम्हाला आंब्याविषयी बोलताना अभिमानाचा विषय वाटत होता. आमच्या चौघामध्ये मी मराठी, तर मालविका संघवी ही मुंबईत राहिलेली पत्रकार होती. आमच्या या गप्पात आमच्या यजमानबाईच्या मनात आंब्याविषयी कौतुकमिश्रित उत्सुकता निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो होतो. कारण आता आंब्याविषयीचे प्रश्न पलीकडून येत होते. आंबा न खाताही आणि सुशी खाऊन दात आणि दाढांची कसोटी लागलेली असतानाही आम्ही तो आस्वाद घेतला होता. ज्या वेळी समारोपाचं बोलणं सुरू झालं तेव्हा आमच्यापैकी एक जण म्हणाला, `तुझा पत्ता आहे माझ्याकडे. भारतात गेल्यानंतर आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी काही पाठवून देऊ. म्हणजे आंबा आणि त्यातही हापूसचा आंबा काय असतो, ते कळेल.' आता यजमानबाई पुढे आल्या. धन्यवाद म्हणाल्या; पण तेवढ्यावरच थांबलं नाही. त्या म्हणाल्या, `कृपा करा आणि आंबा काही पाठवू नकात. मी त्याचा स्वीकार नाही करू शकणार.' काही तांत्रिक अडचण असेल तर दूर करता येईल, असं कोणी म्हणालं; पण त्यावर त्या म्हणाल्या, `तसं नाहीये. मीच नव्हे पण अनेकांनी हापूस आंब्याविषयी ऐकलं आहे. काहींनी भारतात तो खाल्लाही आहे; पण आम्ही तो भेट म्हणूनही नाकारतो. कारण तो जर इतका छान असेल तर त्याचा मोह नाही टाळता येणार. आणि एकदा आवड आणि मोह वाढला की भारतातून तो आयात करावा लागेल. आम्हाला तसं काही व्हावं, असं वाटत नाही.' आता अवाक् होण्याची वेळ आमच्यावर आली होती. जपानमधील एक महिला. सुशिक्षित महिला आपल्या देशाच्या अर्थकारणाचा, त्याच्या हितसंबंधांचा इतक्या व्यक्तिगत पातळीवरही विचार करीत होती.
-- किशोर कुलकर्णी
March 29, 2006
पावले तुंगनाथची वाट चालू लागतात. साधारण १ कि.मी. अंतर चालल्यावर वृक्षवल्ली आपल्याला एका सुरेख हिरव्या कुरणावर आणून सोडतात व आपला निरोप घेतात. अशा कुरणाला ‘बुग्याल’ असे म्हणतात. या पुढच्या प्रवासात मात्र कुठेही झाडे दिसत नाहीत. वातावरणात होणारा सुखद बदल स्पष्ट जाणवत असतो. समोर सोनेरी तेजाने झळकणारी पर्वतशिखरे उभी असतात.
August 12, 2022
२००६ हे वर्ष माझ्यासाठी नवीन आव्हाने घेऊन आले. डॉ. बेडेकर विद्या मंदिर ही माझी शाळा, तर बी.एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स हे माझे बारावीपर्यंतचे कॉलेज! ही शाळा आणि कॉलेज ‘विद्या प्रसारक मंडळ' या शैक्षणिक संस्थेतर्फे चालवण्यात येते. या व्यतिरिक्त कॉमर्स आणि आर्टस् कॉलेज, पॉलिटेक्निक, लॉ कॉलेज, इंग्रजी माध्यमाची शाळा तसेच मॅनेजमेंट कॉलेज असे या संस्थेचे खूपच मोठे कार्यक्षेत्र आहे. डॉ. विजय बेडेकर हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. विद्या प्रसारक मंडळाच्या सभेमध्ये डॉक्टरांनी मॅनेजमेंट कमिटीचा सदस्य (संचालक) म्हणून माझे नाव सुचवले. सभेत ते मान्यही झाले आणि मी या संस्थेच्या मॅनेजमेंट कमिटीचा सदस्य (संचालक) झालो. डॉक्टरांनी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. मी आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. माझ्यासाठी हा भावनिक क्षण होता. ज्या शाळेत आणि कॉलेजात मी शिकलो त्याच शाळेच्या आणि कॉलेजच्या मॅनेजमेंट कमिटीचा आता मी सभासद होतो, माझ्या शाळेशी आणि कॉलेजशी मी पुन्हा एकदा जोडला गेलो. असे काही घडले की मी स्तंभित होतो आणि विचार करायला लागतो की आयुष्याची ही निराळी, काहीशी अनपेक्षित वळणे काही आपण नियोजित केलेली नसतात. मग या घटना घडतात कशा? या सर्वांचे नियोजन नक्कीच कोणीतरी वेगळी शक्ती करत असते. आपण त्याला देव म्हणतो, आपला योग आहे असे म्हणतो, नशीब म्हणतो, काहीही म्हणतो. पण त्याचे उगमस्थान अजूनही अज्ञातच आहे. घटना चांगली घडली तर आपण आनंदित होतो. वाईट घडली तर आपण दुःखी होतो. पण हेसुद्धा फार काळ टिकत नाही. कारण आयुष्य काही काळाने वेगळे वळण घेते आणि आधीचे आपण हळूहळू विसरत जातो.
मुंबई महानगरपालिकेच्या संगीत स्पर्धेचे मी परीक्षण केले. माझ्याबरोबर संगीतकार अच्युत ठाकूर आणि प्राची देवस्थळी होत्या. हिंडाल्को स्टाफ फेडरेशनसाठी सिल्व्हासा येथे गझलचा कार्यक्रम केला. मराठी सुगम संगीताचे विविध प्रकार दाखवणारा 'मराठी सुगम संगीत एक सुरेल लेणे' हा नवीन कार्यक्रम मी तयार केला. 'संस्कार भारती' या संस्थेने गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम आयोजित केला. समीरा गुजर आणि श्रीराम केळकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. नंतर इंडस्ट्रियल इंजिनीयरिंगच्या ऑल इंडिया कॉन्फरन्समध्ये हॉटेल फरियाज, लोणावळा येथे गझल नाईट सादर केली. कोमल करंदीकर आणि दर्शना घळसासी या माझ्या विद्यार्थिनी या कार्यक्रमात गायल्या. लायन्स क्लबच्या सुगम संगीत स्पर्धेचा परीक्षक म्हणून मी अहमदनगरला गेलो. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण माझे संगीतकार प्रभाकर पंडित यांच्या हस्ते झाले. पंडित सर आता पुण्याला राहायला गेल्यामुळे नेहमी त्यांची भेट घडत नसे. "अरे, तुला भेटण्यासाठी मुद्दाम पुण्याहून या कार्यक्रमासाठी आलो.” पंडित सर म्हणाले. ते माझ्याच हॉटेलात उतरल्यामुळे आमच्या भरपूर गप्पा झाल्या. त्यांनी सुगम संगीतावर एक पुस्तक लिहिले होते. त्याची प्रत सही करून मला देतांना ते म्हणाले, "या पुस्तकात तुझा उल्लेख केलाय. तुझ्याबद्दल लिहिले आहे. ते वाच आणि पुस्तक कसे वाटले याचा अभिप्राय द्यायला पुण्याला घरी ये." "नक्की येतो." मी म्हणालो. पण तो योग येणार नव्हता. पंडित सरांशी माझी ही अखेरचीच भेट ठरली. काही दिवसांनीच हा प्रेमळ संगीतकार रसिकांसाठी त्याच्या सर्व रचना मागे ठेऊन निघून गेला. माझ्या पहिल्या कार्यक्रमाचे, पहिल्या कॅसेटचे, पहिल्या रेकॉर्डिंगचे ते संगीतकार होते. ५००व्या कार्यक्रमालाही त्यांची उपस्थिती होती. मात्र या पुढील कार्यक्रमांसाठी माझ्याबरोबर त्यांची गाणी असणार होती.
-अनिरुद्ध जोशी
August 5, 2022
खासदार म्हणून दिल्लीत आल्यानंतर लोकप्रतिनिधीपदाच्या वाढत्या जबाबदारीचे ओझे जाणवत होतेच, शिवाय या नवख्या वातावरणात तसेच अनेक अनुभवी आणि अभ्यासू लोकप्रतिनिधींचा सहवास लाभणार याची हरहूरही होती. तशी इथली जीवनशैली बरीच वेगळी आहे. त्याच्याशी जुळवून घ्यावे लागणार होते.
April 22, 2024
शांतता हा ईश्वरी गुणधर्म आहे. ईश्वरी देण आहे. जसे चैत्यन्य तशीच शांतता. ही मुळ शक्ती समजली जाते. प्रथम निर्माण झाली ती शांतता. नंतर आला तो आवाज (Sound). ह्याचा अर्थ आवाजाच्या निर्मीतीआधी शांतता होती. आवाजाच्या वा ध्वनीच्या नष्ट होण्यानंतर असेल ती पून्हा शांतता. दोन आवाजामधली विश्रांती भरुन काढते ती शांतता. आवाज ऐकण्यासाठी देखील हवी असते शांतता. शांत असाल तरच आवाज ऐकू शकाल. ध्यान धारणा ह्या प्रक्रियेमध्ये शांततेला अनन्यसाधारण महत्व असते. शांतता म्हणजे केवळ वातावरणातील शांतता नव्हे. ती लागते मनाच्या स्थरावर देखील. शांतता म्हणजे केवळ आवाज नसणे, हे अभिप्रेत नाही. त्या वातावरणात देखील खऱ्या शांततेचा मागोवा घ्यावा लागतो. शोध घ्यावा लागतो. तीलाच खरी मनाची शांतता म्हणता येईल. अर्थात " एक सत्य" " शांत मन " हेच ईश्वरी तत्व असेल. त्यालाच म्हणता येईल कr " स्वला " जाणणे. तेच असेल परिपूर्ण.
शांतता सदैव तुमच्या सभोवती अंतरबाह्य अंगाने असते. तीची साथ तुमच्या अस्तित्वामधून निर्माण होत असते. तीला फक्त जाणावे लागते. आवाज कमी करणे वा नष्ट करणे ह्याच क्रिया तुमच्या सान्नीध्यात असलेल्या शांततेला शांततेच्या अस्तीत्वाची जाणीव करुन देतात. ध्यान धरणा करणाऱ्याना हे अनुभवते की एक विचार उत्पन्न झाला, तो छलांग मारुन येतो व त्याच झेपेने जातो. त्याच्या येण्या व जाण्यामधली वेळ अर्थात Stop gap किंवा एक विचार जाऊन दुसरा विचार उत्पन्न होतो. त्या दोन्ही विचारांमधली वेळ ही अत्यंत महत्वाची असते. भले ती फारच क्षणीक मोजमाप करण्याच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत कठीण असेल. परंतु त्या " मध्यंतराचे " वा दोन विचारामधले " विश्रांती स्थान " जीवन तत्वासाठी सर्वोच्य असे समजले गेले आहे. हीच " खरी शांततेची " वेळ. हीच खरी "स्व ला" जाणण्याची वेळ. हीच खरी ईश्वरी अस्तित्वाला समजण्याची वेळ. श्वासाची क्रिया ही नैसर्गिक असते. ती जशी नित्य, तशीच Involuntary असते. तुमच्या इच्छेची मात्रा तेथे लागु पडत नसते. ती एक स्वयंस्फूर्त सततची क्रिया निसर्गाने योजलेली आहे. जीवंत असे पर्यंत शरीराच्या कोणत्याही अवस्थेत ती अविरत चालू असते. म्हणूनच तीला जीवंतपणाचे लक्षण समजले गेले आहे. हां तुमच्या इच्छाशक्ती नुसार तुम्ही त्याच्या प्रक्रियेमध्ये क्षणीक तात्पुरता बदल करु शकता. ही क्षमता तुम्हाला दिलेली आहे. जसे श्वास दिर्घ करणे, लांबवणे, आखूड करणे, वा कांही क्षणासाठी थांबवणे. कांही वेगळ्या परिस्थितीमध्ये " प्राणायाम " अर्थात श्वासाच्या व्यायामाने, ह्याच तत्वाने बुद्धीच्या वैचारीक चक्राला प्रयत्न्याने वेगळेपणा निर्माण करता येतो. एक विचार उत्पन्न होतो, पसरतो, आणि लय पावतो. लगेच त्याच्यामागे दुसरा वेगळाच विचार उत्पन्न होतो. ही सततची क्रिया नैसर्गिक Involuntary बुद्धीमनाच्या जीवंतपणाचे लक्षण समजले जाते. विचार भरकटणारे व एक समान नसतात. एखाद्या विषयावर चिंतन करणे, हा भाग वेगळा. तो Voluntary ह्या सदरांत मोडतो. परंतु विविध विचार उत्पत्ती ही नित्याची व नैसर्गिक असते. दोन भिन्न विचारामध्यें क्षणीक विश्रांतीची वेळ टिपली जाते. हीच निर्विचार वा मनाच्या शांततेची वेळ.
तुम्ही योगीक प्रयत्न्याने, संकल्पना चिंतन शक्तीने, भावनीक स्थिरतेने, दिर्घ करु शकतात. कांही क्षणाचे, सेकंदाचे वा मिनीटाचे रुपांतर थोड्याश्या वाढीव वेळेमध्ये करु शकतात.
खऱ्या शांततेचा अनुभव केवळ त्याच क्षणी तुम्हास मिळू शकतो. ह्यालाच म्हणतात ' परम आनंदाचा क्षण ' (Ecstasy of Joy) ह्याचे वर्णन करणे केवळ अशक्य असेल. तो फक्त एक जीवंत सर्वोच्य अनुभव समजता येईल. गरज असते ती प्रयत्न्याची. ह्याचे कुणीही मार्गदर्शन करु शकत नाही. अध्यात्मिक बैठकी विषयी मात्र अनुभवसंपन्न आनंद मिळवायचा असतो. तो प्रत्येकाला स्वतःचें प्रयत्न करुन केवळ दोन विचारामधला शांततेचा काळ प्रयत्न्याने वाढवून. येणाऱ्या वा ऊत्पन्न होणाऱ्या विचाराला थोडेसे थोपवून. जो विचार आलेला आहे त्याला नाहीसा करण्याचा प्रयत्न करुन. ह्यात जबरदस्त ईच्छा शक्तीचा भाग असतो. अंतरमनाची शांतता प्रस्थापीत करणे ह्यालाच म्हणतात.
शांतता निर्माण करता येत नाही. जी सदैव असते, तीलाच फक्त अनुभवता येते. मनाला शिकवून मनाची ठेवण करुन आवाजा विरहीत अथवा आवाजाच्या सान्निध्यांत देखील खऱ्या शांततेचा अनुभव घेता येतो. खऱ्या योगाचे हेच लक्षण असेल.
विचारांची ऊत्पत्ती व लय ह्याप्रक्रियेची सतत जाणीव Awareness असावी. मात्र लक्ष्य केंद्रित विचारावर Thoughts वर न ठेवता त्याच्या प्रक्रियेच्या जाणीवेवर Awareness वर असण्याचा संकल्प असावा. हेच तुम्हास खऱ्या शांततेची जाणीव देत राहील. ह्यातच मनाला जे विचार विचलीत करीत असतात, त्यावर मात करणे, शक्य होते. विचारावर लक्ष्य असण्यापेक्षा लक्ष्य असणाऱ्या जाणीवेवर अर्थात स्व वर केंद्रित होणे, ह्यामध्ये डूबून जाणे, खऱ्या शांततेशी एकरुप होण्यासारखे असेल.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 19, 2016
त्या बुटक्याचे काय झाले असेल? युद्धात बुटक्याचा एक डोळा फुटला आणि एक पाय तुटला…..
July 12, 2012
विस्मरणातला मोहरा.. युध्दातील छोटे प्रसंग हे कुणाला ठाऊक नसतात. यासाठी माझे लेखन
March 14, 2017
हल्ली फक्त भांडी आणि घरातील लादी पुसण्यासाठीच बाई कामाला लावतात. पण पूर्वी घरात लेकीसुना ही कामे करत असत. आणि काही प्रमाणात भांडी घासायला बाई यायची. भांडी घासणे ही सुद्धा एक कलाच आहे. याचे वर्गीकरण असे व्हायचे.मला वाटते की ही भांडी घासताना मनाचे चित्रण त्यात दिसून येते कदाचित यात काही तरी संबंध असावेत. ….
June 5, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti