महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
१. पनीरचे मोदक : पनीरमध्ये साखर, काजू, किसमिस, वेलची पावडर भरून हे सारण रवा, मैद्याच्या पोळीमध्ये भरून तळून काढावे. हा मोदकाचा प्रकार मला दिल्लीला एका ठिकाणी खायला मिळाला.
२. खव्याचे मोदक : हा प्रकार तसा सगळीकडे दिसतो. यामध्ये खव्यात साखर, केशर घालून, भाजून साच्यात घालून मोदक करतात.
३. बेक केलेले मोदक : खोबरं, किसमिस, खव्याचे सारण मैद्याच्या सप्तपारीमध्ये भरून बेक करावे.
४. गूळ कोहळ्याचे मोदक : हा प्रकार विदर्भातील आतल्या गावातला. गूळ, लाल कोहळा व तेवढीच कणिक घेऊन एकत्र मळावे. मोदकाचा आकार देऊन मंद आचेवर तळावे.
५. पुरणाचे मोदक : पुरणाचे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मोदक तळून घेतात किंवा वाफवूनसुद्धा घेतात.
६. फ्रुट मोदक : वेगवेगळया प्रकारची फळे मिक्स फ्रुट जॅममध्ये मिसळून हे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळून घ्यावे.
७. संदेश मोदक : पनीर, खवा, साखर, केशर, वेलची एकत्र मिक्सरमध्ये वाटून याचे मोदक साच्यामध्ये बनवून वाफवून घ्यावे.
८. मनुकांचे मोदक : मनुका, काजू एकत्र करून त्यात थोडी दूध पावडर घालून त्याचे मोदक वळावे.
९. तीळगुळाचे मोदक : गुळाचा पाक तयार करून त्यात भाजलेले तीळ घालावे व हे सारण कणकेच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळावे. किंवा तीळ व गुळाचे जे सारण आहे ते थोडे गरम असतानाच साचामध्ये घालून त्याचे मोदक करावे. हा प्रकार यवतमाळ भागात करतात व तिळी चतुर्थीला याचा नैवेद्य दाखवतात.
१०. खोबरं मैद्याचे मोदक : हा मोदक प्रकार सर्व ठिकाणी आढळून येतो. रवा, खोबरं, खवा, साखर एकत्र करून हे सारण मैद्याच्या वाटीत भरून मंद आचेवर तळावेत.
११. मैद्याचे उकडीचे मोदक : मैद्याची पारी लाटून मध्ये कुठलेही गोड सारण भरून त्याचे वेगळ्या आकाराचे मोदक करावे व वाफवून घ्यावे. थोडक्यात मोमोज म्हणजेच मोदकासारखा एक प्रकार. ते ज्याप्रकारे करतात तसाच हा प्रकार करावा.
१२. कॅरामलचे मोदक : पनीर, खवा, काजू, किसमिस, साखर एकत्र करून त्याला मोदकाचा आकार द्यावा. हा मोदक साखरेच्या कॅरामलमध्ये बुडवून थंड करून सव्र्ह करावा.
१३. काजूचे मोदक : काजू कतलीचे सारण घेऊन या मध्ये खवा, खडीसाखर भरून याला मोदकाचा आकार द्यावा.
१४. फुटाण्यांचे मोदक : फुटाणे बारीक करून त्यात साखर व तूप घालून चांगले मळावे या पिठाला मोदकाचा आकार द्यावा. हा प्रकार गरम न करता चटकन होणारा प्रकार आहे.
१५. तांदळाचे गुलकंदी मोदक : तांदळाच्या उकडीमध्ये गुलकंदाचे सारण भरून हे मोदक मंद आचेवर तळा किंवा वाफवून घ्या.
१६. पोह्यांचे मोदक : पोहे चांगले भिजवून त्याचा गोळा मळावा. त्यामध्ये आपल्याला हवे ते सारण भरून मंद आचेवर तळावे.
१७. चॉकलेटचे मोदक : खवा, खोबरं, दाणे बारीक करून मळून घ्या. त्यानंतर याला मोदकाचा आकार द्यावा. व एकेका मोदकाला हॉट चॉकलेट सॉसमध्ये बुडवून थंड करून सव्र्ह करा.
१८. शेंगदाण्यांचे मोदक : गूळ आणि शेंगदाणे एकत्र करून त्यात काजू, किसमिस घालावे व उकडलेला बटाटा व साबुदाण्याच्या पिठाच्या पारीमध्ये भरून तळून घ्यावे.
१९. बटाटयांचे मोदक : बटाट्यामध्ये खवा, साखर, काजू, किसमिस घालून त्याचा हलवा बनवावा व साच्यामध्ये घालून मोदक करावे. वरून दुधाची पावडर लावावी.
२०. पंचखाद्याचे मोदक : पंचखाद्य एकत्र करून हे सारण मैद्याच्या पारीत भरून डीप फ्राय करा.
२१. बेसनाचे मोदक : बेसनाच्या लाडवाच्या सारणाला साच्यात घालून मोदकाचा आकार द्यावा व मधे एक एक काजू भरावा.
२२. डिंकाचे मोदक : डिंक तळून डिंकाच्या लाडवाचे मिश्रण करावे. हे मिश्रण कणकेच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळून घ्यावे.
२३. उकडीचे मोदक : तांदळाची उकड तयार करून त्यात ओलं खोबरं व गूळ याचे सारण भरून मोदकाचा छान आकार देऊन वाफवावे. हा प्रकार कोकणात चाखायला मिळतो.
September 18, 2018
साहित्य: ३ ताज्या काकड्या, १ टीस्पून अमूल बटर किंवा लोणी, २ कप ताक (आंबट नसावे), अर्धा टीस्पून कॉर्नफ्लोअर, पाव टीस्पून साखर, थोडा पुदीना, मीठ, मिरेपूड चवीपुरते.
कृती: वेळ: २० मिनिटे काकडी सोलून किसून घ्या. एका पातेल्यात लोणी गरम करून त्यावर हा कीस परतून घ्या. परतत असताना मीठ, मिरेपूड घाला, परतून झाल्यावर त्यात दोन कप पाणी घालून सर्व उकळवा. थोड्या ताकात कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट वरील मिश्रणात घालून पुन्हा उकळवा. त्यांत पुदीन्याची पाने चिरून घाला. त्याचप्रमाणे साखर व उरलेले ताक घालून मिश्रण चमच्याने ढवळत रहा. थोडे दाटसर झाले की गॅस बंद करा. सूप बाऊलमध्ये वाढल्यावर त्यावर चीज किसून घाला.
September 10, 2026
मैद्यात बेकिंग पावडर घालून तीन वेळा चाळावं. सुक्या मेव्याचे तुकडे, प्लमचे तुकडे आणि टुटी-फ्रुटी केक करण्याच्या दोन ते तीन तास आधी ब्रॅण्डी किंवा रममध्ये भिजत घालावेत. मैद्यात रवा घालून चांगलं मिसळावं. लोणी फेसून त्यात साखर घालावी आणि पुन्हा फेसावं. अंडी फेसून ती लोण्याच्या मिश्रणात घालून पुन्हा फेसावीत.
December 26, 2016
ब्रेडची कड कापून घ्या. टोस्टारमध्ये ब्रेडचा टोस्ट करुन घ्या. आपल्याला आवडतील त्या फ्रेश भाज्या बारीक चिरून घ्या. त्यामध्ये फ्लॉवर, ढोबळी मिरची, कांदा, आवडत असल्यास बारीक चिरलेला पालक, बारीक चिरुन कांदा, कांदा पात आदी भाज्या चिरुन घ्या.
March 6, 2017
शेपू या भाजीस “आहारीय केरसुणी’ म्हणतात. पोटात अडथळा निर्माण करणाऱ्या वायूचे नि:सरण उत्तम प्रकारे ही भाजी करते. पोटात गॅस होणे, अजीर्ण, क्षुधामांद्य, कृमी अशा अनेक पचनाच्या तक्रारींवर शेपू गुणकारी समजली जाते.
December 6, 2016
अर्धी वाटी गूळ, पाऊण वाटी पाण्यात कुस्करून विरघळवून घ्यावा. मग ते पाणी गाळून घ्यावे.
त्यात थोडे तेल टाकून, नाचणीचे किंवा बाजरीचे पिठ भिजवावे.
November 9, 2016
बासमती तांदूळ अर्धा तास भिजत ठेवावा. गॅसवर पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे. पाणी गरम झाले कि त्यामध्ये एक लहान चमचा मीठ व भिजवलेला बासमती तांदूळ शिजवण्याकरीता टाकावा. तांदूळ शिजला की, जास्तीचे पाणी जाण्याकरिता जाळीमध्ये निथळत ठेवावा. मटार, कापलेले गाजर, श्रावण घेवडा, फ्लाँवर शिजवून घ्यावे. कांदे-टॉमेटो बारीक चिरावेत. गॅसवर फ्रायींग पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकावे, तेल तापले की त्यामध्ये राई फोडून घ्यावी. आलं-लसूण पेस्ट टाकावी आणि दोन मिनीटे हलवावे व त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो सोनेरी रंग येईपर्यंत परतावा. मग त्यामध्ये टॉमेटो घालून दहा मिनीटे पुन्हा परतवून घ्यावे.
February 26, 2017
सुरुवातीला पक्व फळे पाण्याने स्वच्छ धुवून चाकूने कापून बी वेगळे करावे. फळाची साल बाजूला काढून गर व्यवस्थित मिक्सरमध्ये एकजीव करावा व त्यामध्ये साखर व सायट्रीक अॅसिड घालून मंद अग्नीवर १०३ डी. सें. तापमानापर्यंत गरम करावे.
March 14, 2017
साहित्य - दोन वाट्या मैदा, अर्धी वाटी तूप, दोन वाट्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, लाल तिखट, पिठी साखर, आमचूर पावडर, तेल, मोहरी, हिंग, हळद, धने-जिरे पावडर, बडिशेप, गरम मसाला आणि मीठ.
कृती - मैद्यात अर्धी वाटी तूप आणि चवीप्रमाणे मीठ घालून मैदा पाण्याने घट्ट भिजवावा. सारणासाठी कढईत तेल गरम करून मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात डाळीचं पीठ घालून पीठ चांगलं भाजून घ्यावं. नंतर त्यात एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा पिठी साखर, अर्धा चमचा जिरे, धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, एक चमचा अर्धवट कुटलेली बडीशेप घालून मिश्रण जरा परतावं. नंतर त्यावर पाण्याचा हपका मारून मऊसर वाफवावं. सारण गार झाल्यावर त्याच्या लहान पेढ्याप्रमाणे गोळ्या कराव्या. भिजवलेला मैदा चांगला कुटून मळून घ्यावा. त्याच्यादेखील सारणाप्रमाणे गोळ्या कराव्या. त्या हातावर थापून मध्ये खोलगट आकार द्यावा. त्यात सारणाची गोळी ठेवून मैद्याची पारी सर्व बाजूने बंद करावी. हाताने दाबून गोळा चपटा करावा. कढईत तेल घेऊन मध्यम आचेवर गुलाबी रंगावर तळाव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
February 3, 2017
छोले भटुरे हा पंजाबमधील लोकप्रिय पदार्थ……
February 2, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti