(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ओल्या नारळाच्या करंज्या

    ओल्या नारळाच्या करंज्या

    काही काही पदार्थ एव्हरग्रीन असतात. त्यांना ऋतूच्या मर्यादा बांधून ठेवू शकत नाही. ओल्या नारळाच्या करंज्या त्यातल्याच एक. तुम्ही केंव्हाही करा, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, सकाळच्या न्याहरीला, दुपारी जेवणाला, मधल्यावेळच्या खाण्याला किंव्हा रात्री जेवणाला. त्यांची चव खाणाऱ्याच्या जिभेवर आपली आठवण ठेवणार.

      September 12, 2018


  • लाल भोपळा आणि सफरचंदाचं सूप

    लाल भोपळा आणि सफरचंदाचं सूप

    साहित्य: अर्धा किलो लाल भोपळा, १ सफरचंद, मीठ-मिरपूड-जिरेपूड चवीनुसार, अर्धा कप दूध

    कृती: लाल भोपळा आणि सफरचंदाच्या साली काढून तुकडे करा. हे तुकडे कुकरला बेताचं पाणी घालून शिजवा. मिक्सरमधून काढा. त्यात मीठ-मिरपूड-जिरेपूड आणि दूध घाला. चांगली उकळी काढा.

      September 1, 2018


  • p-3119-limbu-sarbat

    लिंबु सरबत

    साहित्य : १ मोठे लिंबू, पाच चहाचे चमचे भरून साखर, अर्धा चहाचा चमचा मीठ, चिमूटभर जिरे पावडर, दोन ग्लासभर थंड पाणी, बर्फाचे ४-५ तुकडे.

    कृती : लिंबू हाताने स्वयंपाकाच्या ओट्यावर गोलगोल फिरवून हाताने दाबून मऊ करावे म्हणजे त्याचा रस काढणे सोपे जाते. मग सुरीने त्याचे दोन तुकडे करून एका स्टीलच्या पातेल्यात फोडींचा रस पिळावा. त्यातील बिया काढून टाकाव्यात, त्यात साखर, मीठ व जिरेपूड घालून आधी थोडेसे पाणी घालून ते ढवळावे साखर विरघळेपर्यंत हलवावे, ग्लासात ओतावे आणि वर बर्फाचे खडे टाकून हे सरबत द्यावे.

      August 3, 2018


  • रताळ्याच्या फ्रिटाटा

    रताळ्याच्या फ्रिटाटा – Recipe

      September 11, 2026


  • स्प्रिंग रोल्स

    स्प्रिंग रोल्स – Recipe

      September 11, 2026


  • maharashtrian-khamang-kakdi-300

    मसाला क्युकंबर (काकडी)

    बर्फ वगळून सर्व पदार्थ एकत्र करुन मिक्सरमध्ये घाला. रस काढा. आवश्यकतेनुसार पाणी घाला. मिश्रण गाळून घ्या. थंड करा किंवा बर्फ घालून प्यायला द्या.

      November 9, 2016


  • पेरूची चटणी

    साहित्य:- पिकलेला पेरू २ नग, मीठ, व्हिनेगर, मिरची पावडर, वेलची पावडर, बदामाचे तुकडे व बेदाणे

    कृती:- पेरूची साले काढून आतील बियाही काढाव्यात. सगळा गर पाण्यात शिजवावा. त्यात मीठ, व्हिनेगर, मिरची पावडर, वेलची पावडर, बदामाचे तुकडे व बेदाणे घालून पुन्हा शिजवावे. चटणी इतपत हे मिश्रण घट्ट असावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२०१७३३

      January 17, 2017


  • किचन टिप्स

    डोशाचं पीठ उरलं असेल तर फ्रीजमध्ये ठेवताना त्यात विड्याचे पान घालून ठेवा. पीठ आंबट होत नाही.
    इडली उरली तर फ्रीजमध्ये झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी एक-एक इडली पाण्यात बुडवून वाफवा. इडली मुलायम होते.

    मटारदाणे उकडायला ठेवा. एक उकळी आली की, त्यात चिमूटभर हळद घालून गॅसवरुन उतरवा. ते हिरवेगार राहतात.

    पालकाची पाने मिठाच्या पाण्यात भिजवून दोन मिनिटे ठेवा. मग त्याची पुरी करून फ्रीजमध्ये ठेवा. पुढील ८ दिवसांकरिता त्याचा वापर करता येतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      April 17, 2017


  • p-2858-upvaas-pizza

    उपवासाचा पिझ्झा बेस

    साहित्य: ३/४ कप उपवासाची भाजणी, १ टिस्पून ड्राय यिस्ट, १/२ टिस्पून साखर, १/२ टिस्पून मिठ, १/४ कप कोमट पाणी, थोडी भाजणी पिझ्झा लाटताना.

    कृती:
    १) एका बोलमध्ये २ टेस्पून कोमट पाणी घ्यावे, त्यात १ टिस्पून ड्राय यिस्ट व १/२ टिस्पून साखर घालून मिक्स करावे. हे मिश्रण १० मिनीटे झाकून ठेवावे. ५ ते १० मिनीटात हे मिश्रण फेसाळेल.
    २) ३/४ कप भाजणी वाडग्यात घेऊन हे फेसाळलेले मिश्रण त्यात घालावे, मिठ आणि थोडे तेल घालावे. गरजेनुसार थोडे कोमट पाणी घेऊन पिठ एकदम मऊसर मळून घ्यावे (साधारण ७-८ मिनीटे) . मळलेले पिठ एकदम इलेस्टिक झाले पाहिजे. मळलेल्या पिठाच्या गोळ्याला तेलाचा हात लावून एका काचेच्या किंवा इतर कोणत्याही, बर्‍यापैकी खोलगट भांड्यात ठेवून वरून निट झाकावे. उबदार ठिकाणी हे भांडे दिड तास ठेवावे म्हणजे पिठ फुगून येईल.
    ३) मळलेले पिठ व्यवस्थित फुगले कि ओव्हन ४८० F (२५० C) वर प्रिहीट करावे. यिस्टमुळे पिठात हवेचे बुडबुडे तयार होतात, म्हणून पिठ परत एकदा निट मळून घ्यावे . मळताना थोडा तेलाचा हात लावावा.
    ४) सुकी भाजणी भुरभूरवून जाडसर पोळी लाटावी . काट्याने पूर्ण पोळीवर टोचावे म्हणजे बेक करताना फुगणार नाही. पोळीला वरून थोडे तेल लावावे.
    ५) साधारण ६-८ मिनीटे बेक करून घ्यावे.

      August 10, 2018


  • p-2230-ragda

    रगडा पॅटिस

    पॅटिससाठी उकडून घेललेले बटाटे सोलून किसून घ्यावेत. त्यात हिरवी मिरची, लसूण, आले व जिरे वाटून घालावेत. चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र मिसळून घ्यावे. हा बटाट्याचा गोळा थोडा चिकट वाटल्यास ब्रेडचे दोन तुकडे थोडे ओले करून कुस्करून घालावेत.

      March 7, 2017