महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य:- मोठा पेरू १ नग, १ लहान कांदा, १०० ग्राम अळंबी, तेल, मोहरी, हिंग, लाल मिरच्यांचे तुकडे,हळद,मीठ, दाण्याचे कूट, मोहरीची डाळ,कोथिंबीर, मीठ.
कृती:- भरले पेरू करताना पेरू भरण्यासाठी पेरू मधोमध चिरून त्याच्या वाट्या कराव्यात. कढईत तेल तापवून बारीक चिरलेला कांदा त्यात परतावा. बारीक चिरलेली अळंबी या कांद्यात घालून वाफ द्यावी. दोन्ही मऊ झाल्यावर परतून पाणी आटवावे. गार झाल्यावर मीठ, मिरची- कोथिंबीरीचे वाटण एकत्र करावे. पेरूची वाटी बिया काढून रिकामी करावी. त्यातील गर कांद्याच्या मिश्रणात मिसळावा. या मिश्रणाने वाट्या भराव्यात. कढईत तेल तापवून त्यावर एक एक करून या वाट्या रचाव्यात व झाकण ठेवून वाफ द्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२०१७३३
January 21, 2017
सिंधुदुर्गातली दिवाळी अजून तरी आगळी-वेगळी अशीच आहे. ग्रामीण भागाच झपाट्यान शहरीकरण होत असतानाच फराळासाठी केल्या जाणाऱ्या ''चावदिसाच्या फॉवा" ची परंपरा आजही टिकून आहे.
दक्षिण कोकणात नरक चतुर्दशी या दिवसाला ‘चावदिस’ असही म्हटलं जातं. या दिवशी कोकणात सकाळी फराळ करतांना त्यात नेहमीच्या पदार्थांना नगण्य स्थान असतं. या दिवशी महत्त्व दिलं जातं ते घरोघरी तयार केल्या जाणाऱ्या पोह्यांना. या पोह्यांना मालवणी भाषेत 'फॉव' म्हणतात.
कोकणची दिवाळी म्हणजे पोह्यंचा महोत्सवच असतो. हे फॉव तयार करण्याची पद्धत सुद्धा पारंपारिक आहे. भाताच्या गिरणीमध्ये तयार होणाऱ्या आजच्या ‘इन्सटंट’ पोह्यांच्या जमान्यात सिंधुदुर्गातल्या काही घरात भातापासून तयार केल्या जाणाऱ्या पोह्यांचं महत्त्व आजही टिकून आहे. या दरम्यान भाताचे नवीन पीक हाती आलेले असते. तो भात हे पोहे तयार करण्यासाठी आदल्या रात्री भिजत घालावा लागतो. सकाळी तो भात गाळून घेऊन चुलीवर मडक्यामध्ये भाजण्यात येतो. नंतर व्हायनामध्ये म्हणजेच लाकडी उखळीमध्ये हे भात घालून मुसळान कुटलं जातं. याला कांडपणे असं म्हणतात. कांडल्यानंतर तयार होणारे पोहे चुलीवरच शिजविले जातात. या अस्सल वाफाळलेल्या गावठी भातांच्या पोह्याची चव काही निराळीच असते.
पूर्वी हे पोह्याचं कांडप करतांना वयोवृध्द महिलांकडून ओव्यासुद्धा म्हटल्या जात. पण आता त्याही आता ऐकू येईनाशा झाल्या आहेत.
गिरणीवर सगळं तयार मिळत असताना किंवा बाजारात सगळे पदार्थ रेडीमेड मिळत असताना ते घरी तयार करण्याचा व्याप तरी का करायचा?
तसे पाहिलं तर आता कोकणातल्या घरांमधून माणसंही तशी कमीच झाली आहेत. तरीही काही एकत्र कुटुंबांतले लोक हौस म्हणून आजही सर्व परंपरा पाळतांना दिसतात... चावदिसाच्या फॉवाची मनसोक्त मजा लुटतात.
-- संतोष
November 7, 2016
साहित्य: २ वाट्या सोलून धागा काढून, धुवून स्वच्छ केलेली कोलंबी, २ वाट्या ओले खोबरे, २ वाट्या बारील चिरलेली कोंथिबीर, ३ ते ४ मध्यम आकाराचे बटाटे, ३ ते ४ मध्यम आकाराचे कांदे, हिरवी मिरची, आले, कोथिंबिर, लसूण यांचे वाटण, चिंच किंवा लिंबू, तिखट, मीठ, तेल, हिंग
कृती: प्रथम कोलंबीला हळद, तिखट, मीठ, चिंच, हिरवे वाटण, लावून ठेवावे. (तिखट, मीठ थोडे जास्त घालावे) व कोलंबी थोड्या लसूण कांद्यावर तळून घ्यावी. अंगासरशी रस्सा ठेवावा. कांदे व बटाटे यांच्या गोल स्लाईस कराव्यात. एका भांड्यांत १ वाटी तेल तापवावे, त्यात पाव चमचा हिंग टाकावा. व ह्यापैकी थोडेसे तेल भांड्यांत ठेवून बाकीचे तेल एका वाटीत ओतून ठेवावे थोडेसे तेल ठेवलेल्या भांड्यांत खाली जरा जाड कांद्याचे व बटाट्याचे स्लाईस लावावे. त्यावर ओले खोबरे व कोंथिबीरीचा थर लावावा. नंतर तळलेल्या कोलंबीचा थर लावावा. परत वरती जरा पातळ स्लाईस केलेल्या गोल कांदा बटाट्याच्या चकत्या लावाव्या परत कोलंबी, खोबरे, कोथिंबीर असे करुन एकावर एक थर लावावेत. शेवटचा वरचा थर खोबरे कोथिंबीरीचा लावावा व कालथ्याने भोक पाडून हिंगाचे काढून ठेवलेले तेल सर्व बाजूनी ओतावे व वाफेला बारीक गॅसवर झाकण लावून ठेवावे.
- श्रीमती मीना अरविंद हजरनिस
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
September 10, 2026
सर्व जिन्नस लोण्यामध्ये मिसळून जरुरीपुरते थंड पाणी घालावे व छोटे चपटे गोळे करून वर एक एक काजूचा तुकडा लावावा. १८० डिग्रीवर ८ ते १० मिनिटे बेक करावे.
December 29, 2016
ब्लेण्डरमध्ये पपईचे तुकडे आणि दूध घालून हळूवार ब्लेण्ड करून घ्या. आता अन्य सर्व जिन्नस घालून घट्ट आणि फेसाळ होईपर्यंत पुन्हा ब्लेण्ड करा. थंडगार पपई हनी स्मुदी ग्लासात ओतून सर्व्ह करा.
February 28, 2017
जेवणाचा स्वाद वाढविणारी, रुचकर, सुगंधी कोथिंबीर स्वयंपाकात वापरली जाते. अनेक पदार्थाच्या सजावटीसाठीसुद्धा कोथिंबीरीचा वापर केला जातो. कोथिंबीरीचा गंध भूक वाढवितो, मन प्रसन्न करतो.
February 9, 2017
साहित्य:
२५० ग्रॅम स्ट्रॉबेरी
४०० ग्रॅम पिठीसाखर
कृती:
स्ट्रॉबेरी स्वच्छ पाण्यात घालून हलक्या हाताने बाहेर काढाव्यात. वरचे हिरवे देठ काढून टाकावे. नंतर त्यात पिठीसाखर घालून हाताने कुसकरावे. साखरेला जरा पाणी सुटले, की गॅसवर ठेवावे. मंदाग्नीवर असू द्यावे. झाकण ठेवावे. नंतर हलक्या हाताने ढवळत राहावे. जाडसर पाक झाला की उतरावा. हा जॅम जास्त दिवस टिकत नाही.
August 6, 2018
कणसाचे २ १/२” ते ३” लांबीचे तुकडे करून ठेवा. तुरीची डाळ, शेंगदाणे, कणसाचे तुकडे आणि चवीनुसार १-२ हिरवी मिरच्या प्रेशर कुकरमध्ये एकत्र शिजवून घ्या.
June 9, 2017
आपण वेगवेगळ्या सॅन्डविचची चव घेतो. परंतु गोड सॅन्डविच हा प्रकार खूप कमी वेळा टेस्ट करत असतो. खरे तर या सॅन्डविचच्या माध्यमातून विविध फळे खाल्ली जातात. हे सॅन्डविच करताना प्रथम अननस, सफरचंद, चिक्कू, केळ, स्ट्रॉबेरीचे पात्तळ आणि बारीक काप करुन घ्या. आता मोसंबी, अंजीर, संत्रे सोलून त्याचे बारीक भाग करुन घ्या.
March 6, 2017
साहित्य :
पाव किलो मावा, ८५ ग्रॅम बारीक साखर, १ चमचा वेलची पूड ,केशर अगर केशरी रंग.
मोदकात भरण्यासाठी काजू, बदाम, पिस्ता पूड अगर बेदाणे हे सारे आपल्या आवडीवर आहे.
कृती :
मावा मिळून घेवून त्यात साखर मिसळावी .कल्हई केलेले पितळेचे पातेले घेवून त्यात मावा घालून मंद गस वर ढवळत राहावे.मधून मधून गोळी होत आली का पहावी ,गोळी करताना मावा बोटाला चिकटता कामा नये.पटकन गोळी झाली कि गस बंद करून पातेले खाली उतरावे,मावा थंड होवू दयावा. वेलची पावडर व केशर घालावे.
मोदक चार -पांच तासांनी मोदक वळले तरी चालतील.हे मोदक लहान करावेत व एखादा बेदाणा आत घालावा.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
September 4, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti