(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • p-1715-veg-biryani

    व्हेज बिर्याणी

    तांदूळ धुऊन १० मिनिटेे भिजत ठेवावेत. त्यांत तांदूळ शिजविण्यास लागणारे सर्व साहित्य आणि ६ कप पाणी घालून भात शिजवून घ्यावा व मोठ्या थाळीत पसरवून हाताने थोडा मोकळा करून घ्यावा व थंड करावा. वाटणाचा सर्व मसाला एकत्र करून बारीक वाटून घ्या नंतर या वाटणांत दही, दुधाची साय, चिरलेल्या भाज्या, मटर मिक्स करून घ्यावे. दूध थोडे गरम करून त्यांत केशर काड्या घालून ठेवा.

      March 6, 2017


  • p-964-patwadi

    पाटवड्या

    प्रथम बेसन चाळून घ्या आणि गाठी काढून घ्या. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करावे. त्यामध्ये जिरे ,मोहरी ,हळद ,खसखस आणि कढीपत्ता घालुन १-२ मिनिटे परतून घ्या. नंतर आहे त्यातील अर्धे खोबरे वरील मसाल्यात घालून थोडेसे परतून घ्यावे. खोबरे जळणार नाही इकडे लक्ष असू द्या.
    आता वरील मिश्रणात पाणी टाकून ते उकळी आणावी. त्यात मीठ, लाल तिखट आणि कोथिंबीर घालावी.

      March 6, 2017


  • p-3733-tomato-saar

    टोमॅटोचं सार

    साहित्य: २ टोमॅटोंचा रस, १ कप नारळाचं पातळ दूध, १ टीस्पून साजूक तूप, १ टीस्पून जिरं, २ चिमटी हिंग, ३-४ कढीपत्त्याची पानं, १ मिरची मोठे तुकडे करून (ऐच्छिक), पाव टीस्पून साखर, मीठ चवीनुसार, आवडत असल्यास वरून घालायला थोडी कोथिंबीर

    कृती: तुपाची जिरं घालून फोडणी करा. त्यात कढीपत्ता, मिरची, हिंग घाला. टोमॅटोचा रस घाला. मंद आचेवर टोमॅटोचा कच्चा वास जाईपर्यंत उकळा. टोमॅटो अर्धवट शिजला की अर्धा कप पाणी घाला. पूर्ण शिजू द्या. नंतर त्यात मीठ, साखर, नारळाचं दूध घाला. मंद आचेवर उकळा. वरून कोथिंबीर घाला.

      September 2, 2018


  • mix-daliche-vade-300

    मिश्र डाळीचे वडे

    तुरीची डाळ, हरबऱ्याची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ व मसुराची डाळ थोडी-थोडी घ्यावी व भिजत घालून डाळी वाटून घ्याव्या. नंतर त्यात मीठ, मिरच्या, कढीलिंब, जिरे व कांदा घालून वडे करावे.

      November 9, 2016


  • आजचा विषय आवळा भाग एक

    आजचा विषय आवळा भाग एक

    भारतीय संस्कृतीत वृक्ष,वनस्पतींना अतिशय मानाचे स्थान दिलेले आढळते. वृक्षांचे संवर्धन, पालनपोषण, इतकेच नाही, तर त्यांचे पूजन करण्याचीही पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. तसेच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमेच्या काळात आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा झाल्यावर आवळ्याचा औषधासाठी वापर करण्यास प्रारंभ करायचा असतो.

      January 12, 2017


  • p-1247-lal-mirchi-thecha

    लाल मिरचीचा ठेचा

    डेखे काढलेल्या लाल रंगाच्या पिकलेल्या ओल्या मिरच्या, मीठ, आवडीप्रमाणे लसून घालून जरा जाडसर वाटून घ्यावे. त्यात भरपूर लिंबाचा रस घालावा व नंतर मोहरी, हिंगपूड, मेथीपूड, हळद घालून तेलाची फोडणी करून गार झाल्यावर घालावी.

      April 28, 2017


  • kaddhanya

    मिक्स कडधान्याचे धिरडे

    सर्व कडधान्ये एकत्र करून पाण्यात ८ ते १० तास भिजवावीत. कडधान्ये नीट भिजली की त्यातील न भिजलेली, कडक राहिलेली कडधान्ये वेचून काढून टाकावीत. स्वच्छ केलेली कडधान्ये कापडात बांधून मोड यायला उबदार जागी ठेवावी. ७ ते १० तासांनी मोड येतील.

      February 24, 2017


  • p-2332-mukhwas-thaali

    आजचा विषय बडीशेप

    घरातील जेवण असो किंवा लग्नाच्या पंगती, जेवल्यानंतर बडीशेपची पुडी, घरात डब्यात भाजून ठेवलेली बडीशेपची थाळी आगत्याने पुढे केली जाते. मुखशुद्धी व पचनासाठी अत्यंत उपयोगी बडीशेप औषधी म्हणूनही विविध काढे आणि ‘ग्रीन टी’सारख्या चहामध्येही वापरली जाते.

      April 17, 2017


  • लुक्मीव

    साहित्य:- २ वाट्या मैदा, १ वाटी रवा, साजूक तूप, २ वाट्या खवा, दीड वाटी पिठीसाखर, केशर-वेलची पूड, १ वाटी सुकामेवा पूड.
    कृती:- मैदा, रवा, मीठ व अर्धा चमचा पिठीसाखर एकत्र करावी. त्यात अर्धी वाटी तुपाचे मोहन घालून कालवून घ्यावे व नंतर गरजेप्रमाणे पाणी घालून घट्ट कालवावे. 2 वाट्या खवा तांबूस परतून त्यात पिठीसाखर मिसळून छान मऊसर करून घ्यावा. त्यात वेलची पूड, केशर व काजू-बदामाची जाडसर पूड मिसळावी. रवा - मैदा तासभर भिजल्यावर पुन्हा चांगले मळून घ्यावे. लुक्मीी चौकोनी आकाराची असते. पुरीला घेतो तेवढीच लाटी घेऊन लांबट लाटावे. अर्ध्या भागात सारण भरून दुसरा अर्धा भाग त्यावर दाबून चौकोनी आकार द्यावा. नंतर लुक्मी साजूक तुपात तळून गरमागरम वाढाव्यात.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      August 15, 2018


  • चिकन व व्हेज सूप

    साहित्य: ६-७ मध्यम आकाराचे लाल टोमॅटो, १ गाजर, १ कांदा, अर्धा टी स्पून किसलेले आले, १ टे. स्पून अमूल बटर, १ टी स्पून मैदा, १ कप दूध, ४-५ कप चिकन स्टॉक, मीठ, मिरे पावडर चवीनुसार, मिळाल्यास थोडी पार्सलेची पाने. सजावटीसाठी: ब्रेड स्टिकस, किसलेले चीज.

    कृती: वेळ: १५ मिनिटे सर्व भाज्या धुऊन चिरून चिकन स्टॉकमध्ये शिजवून घ्याव्यात.
    शिजलेल्या भाज्या थंड झाल्यावर स्टॉकसह मिक्सरमध्ये फिरवून एकजीव कराव्यात. मोठ्या गाळणीने गाळून स्टॉक तयार करावा. एका मोठ्या पातेल्यात बटर गरम करून त्यात मैदा परतावा. लगेच त्यात दूध घालावे आणि सतत ढवळत मिश्रण शिजवून घ्यावे. थोडे घट्ट झाले की त्यात मीठ, मिरे पावडर घालावी. या मिश्रणावर तयार केलेला स्टॉक ओतावा. पुन्हा चांगले उकळवावे. थोडे दाटसर झाले की गॅस बंद करावा.

    प्रत्येक बाऊलमध्ये गरम सूप ओतून त्यावर थोडे किसलेले चीज घालावे. थोडी पार्सलेची पाने चिरून घालावी. सोबत ब्रेड स्टिक द्यावा.

      September 10, 2026