बेबी कॉर्न रोल

एका बाऊलमध्ये तेल, लिंबाचा रस, मीठ व लाल तिखट एकत्र मिसळा. या मिश्रणात बेबी कॉर्न घोळवा व अर्धा तास तसेच ठेवा. उकडलेले बटाटे, मलई, हिरवी मिरची व मीठ मिक्ससरमध्ये फेटा.



baby-corn-roll-300
baby-corn-roll-300

साहित्य :- 8-10 बेबी कॉर्न, 6-8 ब्रेड स्लाइस, 4 मोठे चमचे लोणी, एक मोठा चमचा तेल, एक मोठा चमचा लिंबाचा रस, अर्धा लहान चमचा लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे, 2 उकडलेले बटाटे, अर्धा कप मलई, एक हिरवी मिरची.

कृती :- एका बाऊलमध्ये तेल, लिंबाचा रस, मीठ व लाल तिखट एकत्र मिसळा. या मिश्रणात बेबी कॉर्न घोळवा व अर्धा तास तसेच ठेवा. उकडलेले बटाटे, मलई, हिरवी मिरची व मीठ मिक्ससरमध्ये फेटा. हे मिश्रण बाजूला ठेवा. ब्रेड स्लाइस लाटण्याने चपटे लाटून घ्या. यावर बटाट्याचे मिश्रण लावा. त्याच्या मधोमध बेबी कॉर्न ठेवून रोल करा. गरम पॅनवर लोणी सोडून शेकून घ्या.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →