(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • p-2499-rava_ladoo

    रवा लाडु

    रवा आणि मैदा चाळणीने चाळून एकत्र करावा. आता २-३ चमचे गरम तूप आणि दुधाचे मोहन घालून एकत्र करून ५-६ तास किंवा रात्रभर तसाच झाकून ठेवावा. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण बारीक चाळणीवर चाळून घ्यावे.

      June 8, 2017


  • व्हेजिटेबल सूप: (प्रकार २)

    साहित्य: १ कप कोबी चिरून, २ गाजर चिरून, वेळ: : ३० मिनिटे ४ टोमॅटो, २ कांदे चिरून, १०-१५ फरसबी चिरून, १ मोठा बटाटा चिरून, २ लसणाच्या पाकळ्या, १ टे. स्पून चीझ, १ टे. स्पून लोणी, मीठ, मिरेपावडर, साखर चवीप्रमाणे.

    कृती: टोमॅटो वेगळे ठेवून सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. पातेल्यात लोणी गरम करून त्यात लसूण ठेचून घालावी व कांदा घालून परतावे. थोडा मऊ झाला की त्यावर सर्व भाज्या घालून परतावे व दोन कप पाणी घालून भाज्या चांगल्या शिजवाव्या. शेवटी टोमॅटो चिरून घालावा. थोड्या उकळीनंतर गॅस बंद करावा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. मोठ्या गाळणीने गाळून घ्यावे. गाळताना दोन ते तीन कप पाणी वापरावे. गाळलेल्या सुपात मीठ, मिरेपावडर व थोडी साखर घालावी. सूप पुन्हा उकळवावे व गरम गरम द्यावे. बाऊलमध्ये वाढल्यावर वरून किसलेले चीझ घालावे.

      September 10, 2026


  • झटपट मिनी पिझ्झा

    झटपट मिनी पिझ्झा – Recipe

      September 11, 2026


  • वरी आणि अळिवाची खांडवी

    साहित्य:- एक वाटी वरी तांदूळ, पाव वाटी तूप, चवीला मीठ, पाव वाटी अळीव, अर्धी वाटी ओले खोबरे, दीड वाटी गूळ, दोन वाट्या गरम पाणी, अर्धी वाटी गरम दूध, अर्धा चमचा जायफळपूड, 10-12 काजू.

    कृती:- अळीव दुधात दोन तास भिजत घालावेत. वरी तांदूळ धुवून घ्यावेत. एक मोठा चमचा तूप गरम करून त्यात तांदूळ परतावेत. मीठ आणि पाणी घालून शिजवावे. उरलेले तूप गरम करून त्यात काजू परतावेत. खोबरे, अळीव तसेच गूळ घालून शिजवावे. मिश्रण थोडे चिकट झाले, की शिजलेले वरी तांदूळ घालून ढवळावे. तांदूळ मोकळे होईपर्यंत ढवळावे, जायफळपूड घालावी. एका थाळीला तुपाचा हात लावून त्यावर हे मिश्रण घालून थापावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

      November 28, 2024


  • p-3727-mushroom-soup

    मश्रूम सूप

    साहित्य: १ पॅकेट मश्रूम पातळ स्लाइस करून, २ कांदे पातळ उभे चिरून, १ कप दूध, २ टीस्पून बटर, २ टीस्पून कणीक, मीठ-मिरपूड चवीनुसार

    कृती: १ टीस्पून बटरवर कांदा परता. पारदर्शक झाला की त्यात मश्रूम घाला. जरासं परतून त्यात कपभर पाणी घालून शिजवा. थंड करून मिक्सरला वाटून घ्या. १ टीस्पून बटरवर कणीक भाजा. खमंग वास आला की त्यात हळूहळू दूध घाला. गुठळ्या होऊ देऊ नका. हा सॉस मश्रूमच्या मिश्रणात ओता. मीठ-मिरपूड घाला. उकळा.

      September 2, 2018


  • डाळमेथी

    साहित्य- एक वाटी तुरीची डाळ, दोन वाट्या बारीक चिरलेली मेथीची पाने, एक चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, आवडीप्रमाणे तिखट पूड, मीठ, साखर, दोन ते तीन आमसुले, फोडणीसाठी चमचा भर तेल, मोहरी, हिंगपूड, तीन-चार लाल सुक्याे मिरच्या, १०-१२ लसूण पाकळ्या.

    कृती- तुरीची डाळ व चिरून घेतलेली मेथी एकत्रितपणे कुकरमध्ये शिजवून घ्यावी.
    मेथीमिश्रित डाळ शिजल्यावर घोटून घेऊन त्यात धनेपूड, जिरेपूड, तिखटपूड, मीठ, साखर व आमसुले घालावीत. आमटी जशी घट्ट वा पातळ आवडत असेल त्याप्रमाणे पाणी घालावे व उकळून घ्यावे.
    नंतर त्यावर मोहरी, हिंगपूड, १०-१२ लसूण पाकळ्या, ३-४ लाल सुक्याघ मिरच्या घालून तेलाची फोडणी द्यावी.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 19, 2017


  • p-78 - grape-lemon-Sarbat-300

    ग्रेप लेमन सरबत

    साहित्य :

    द्राक्षे २५० ग्रॅम, एक मोसंबी, एक लिंबू, मध तीन चमचे, साखर तीन चमचे, थोडीशी मिरपूड, एक ग्लास पाणी.

    कृती :

    द्राक्षे धुऊन, कोरडी करुन बिया काढून टाकाव्या. मोसंबी सोलावी, लिंबाचा रस काढावा.

    नंतर द्राक्षे, मोसंबी, लिंबू रस, मध, साखर, पाणी एकत्र करुन मिक्सर मधून काढून एकजिनसी करावे. मिश्रण गाळून घ्यावे.

    थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर त्यात थोडी मिरपूड व पुरेसे पाणी घाला. आणि प्यायला द्या.

      April 30, 2016


  • झटपट सोलकढी

    प्रथम मिक्सरच्या द्रव पदार्थासाठीच्या भांड्यात १मोठा कप घट्ट दही,१-१/२ते २ कप दूध,१/२ कप कोकण आगळ व पाणी,चवीप्रमाणे साखर व मीठ घालून फिरवून घ्या व एका मोठ्या स्टीलच्या उभ्या आकाराच्या गंजात काढून नंतर त्यात मिक्सरच्या छोट्या भांड्यातून आल्याचा एक छोटा तुकडा,लसणाच्या ४-५ पाकळ्या,चवीप्रमाणे २-३ मिरच्या,धने-जिरे पावडर,थोडी चिरलेली कोथिंबीर व ४-५ कढीपत्याची पाने ह्यांचे वाटण करून घेऊन ते वाटण आणी ५-६ थेंब स्ट्रौबेरी खाण्याचा रंग घालून एकजीव होईपर्यंत ढवळून घ्या व काचेच्या ग्लासमधून सर्व्ह करतेवेळी सजावटीसाठी वरुण थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

      April 5, 2014


  • टोमॅटो-बीट सूप

    साहित्य: ४-५ लाल टोमॅटो, वेळ: : १५ मिनिटे अर्धे बीट, मीठ, साखर, मिरे, २ टे. स्पून मलई.

    कृती: टोमॅटो व बीट कुकरमध्ये वेगवेगळे शिजवून घ्यावे. बीट सोलून घ्यावे व टोमॅटोबरोबर मिक्सरमध्ये फिरवावे. चार कप पाणी घालून सूप उकळवावे. (मिक्सरमध्ये फिरवलेले सूप मोठ्या गाळणीने गाळून घ्यावे.) सूप उकळत ठेवावे. त्यात मीठ, साखर मिरेपावडर घालावी. गॅस बंद करावा व मलई घोटून हळूहळू त्यात घालून फिरवावे. बाऊलमध्ये गरमगरम वाढावे. बरोबर तळलेले ब्रेडचे चौकोनी तुकडे वेळेवर खायला द्यावे. हे सूप रंगाने अतिशय आकर्षक दिसते.

      September 10, 2026


  • तिरंगी मोदक

    साहित्य: २ वाट्या बासमती तांदळाचे पिठ, २ वाट्या ओल्या नारळाचे खोबरे, २ वाट्या गूळ, चवीप्रमाणे मीठ,१ चमचा तूप, १ चमचा खसखस, अर्धा चमचा वेलची व जायफळ पूड, कुठलेही आपल्या आवडीप्रमाणे दोन रंग

    कृती: ओले खोबरे, गुळ, मीठ, खसखस घालून चव शिजवून घ्यावा. गार झाल्यावर त्यामध्ये जायफल व वेलची पूड घालावी. एका पातेल्यात २ वाट्या पाणी गॅसवर उकळत ठेवावे. पाणी उकळत असताना त्यात थोडे मीठ व तूप घालावे. लगेच पीठ घालून चांगले घाटून गॅस बारीक करून वाफ घ्यावे. आणावी. वाफ आल्यावर पीठ गरम असताना पीठाला पाण्याचा हात लावून पीठ मळून पिठाचे तीन भाग करणे. एक गोळ्यात (मोठ्या) आवडीप्रमाणे रंग घालावा. दुसऱ्या भागाला परत आवडीप्रमाणे दुसरा रंग घालावा. तिसरा गोळा तसाच पांढरा ठेवावा. तिन्ही पिठाचे पेढ्या एवढे गोळे करुन एकत्र गोळा बनवून नंतर आंगठा व मधले बोट याच्या सहाय्याने पाकळ्या करून त्यात चव भरावा व वरुन तोंड बंद करुन वर पाकळी करावी. चाळणीला थोडे तेल मोदक लावून अलगद थंड पाण्यात बुडवून चाळणीत ठेवावे. अशा तऱ्हेने सर्व मोदक मोदकपात्रात वाफ आणण्यास ठेवावे. १० मि. वाफ घ्यावी थंड झाल्यावर मोदक काढावे.

    -सौ. श्वेता गौरव प्रधान

    ५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

      September 10, 2026