(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आवडते मला….

     

      October 29, 2012


  • परमार्थ व संसार आहेत एकच

    उपास तापास करुनी, शिणवित होतो देहाला

    भजन पूजन करुनी, पूजीत होतो देवाला

    कथा किर्तनें ऐकूनी, पुराण मी जाणिले

    माळ जप जपूनी, प्रभू नामस्मरण केले

    वेचूनी सुमनें सुंदर, वाही प्रभूचे चरणीं

    फुलांचे गुंफूनी हार, अर्पण केले कंठमणीं

    जाऊनी तीर्थ यात्रेत, दर्शन घेतले तीर्थांचे

    प्रसिद्ध देवालयांत, चरण स्पर्षिले मूर्तीचे

    मनामध्यें ठेऊन शांती, मूल्यमापन केले जीवनाचे

    कांहीं न मिळाले हातीं, व्यर्थ दवडिले क्षण वेळेचे

    संसारातील प्रेम व राग, ह्यातच मन गुरफटले

    कर्तव्यातील एक भाग, प्रभू भक्तीसी संबोधले

    परमार्थ आणि संसार, भिन्न नाहींत दोन

    प्रभूचाच आहे संसार, मनी तूं हे जाण

    कर्म फळ आशा, बाळगूं नको मनीं

    तेंव्हा न येईल निराशा, कर्म करिता क्षणीं

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      January 17, 2021


  • वेळेची किमया

    वेळ येता उकल होते,
    साऱ्या प्रश्नांची ।
    जाणून घ्या तुम्ही,
    रीत निसर्गाची...१,

    जेंव्हां यश ना मिळते,
    एखाद्या प्रश्नी ।।
    वेळ नसे योग्य आली,
    हेच घ्यावे जाणूनी...२,

    प्रयत्न सारे चालूं ठेवतां,
    यश ना मिळे ।
    कांहीं काळासाठी थांबवा,
    प्रयत्न सगळे...३,

    काळ लोटतां प्रयत्न होती,
    पुनरपि सारे ।
    उकल होऊन गुंत्यांची,
    आख्खे निघती दोरे...४,

    कुणी म्हणती ग्रह अनूकुल,
    ह्या घटनेला ।
    हीच तर वेळेची किमया,
    कशी कळे कुणाला....५

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 9, 2016


  • पाऊस

     

      June 28, 2013


  • भक्ष्य

    नदिकाठच्या कपारीमध्ये, बेडूक बसला दबा धरूनी

    उडणाऱ्या त्या माशी वरते, लक्ष सारे केंद्रीत करूनी...१,

    नजीक येवूनी त्या माशीचे, भक्ष त्याने करूनी टाकले

    परि दुर्दैव त्याचे बघा कसे, सर्पानेही त्यास पकडले...२,

    बेडूक गिळूनी सर्प चालला, हलके हलके वनामधूनी

    झेप मारूनी आकाशी नेले, घारीने त्याला चोचित धरूनी...३,

    'भक्ष्य बनने' दुजा करिता, मृत्यूची ही चालते श्रृखंला

    जनक असता तोच सर्वांचा, गमंत येई त्या खेळाला...४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 19, 2021


  • रवंथ

    “सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…

      June 22, 2012


  • तुझे तुलाच देवून मोठेपण

    वेडे आम्ही सारे,

    तुझेच घेवूनी तुला देतो, त्यातच मोठेपण मिटवतो...१,

    जाण आहे याची

    सर्व जगाला चकमा देतो, स्वत:लाही फसविता असतो....२,

    फूले बागेमधली

    तोडून ते तुजला वाहतो, हार त्यांचे करूनी घालतो....३,

    गंगेतील थोडे पाणी,

    अर्घ्य आम्ही तुला देतो, भक्तीभावाने अर्पण करितो....४,

    सारे असूनी तुझे,

    मीपणा हा सतत राहतो, परी हा भाव दुजासाठी असतो...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      January 2, 2020


  • मुक्ता ताटी

    नको चिंता
    नको क्रोध
    मोह माया
    नको लोभ

    सारे काही
    दुर सारा
    ताटी काढा
    ज्ञानेश्वरा

    अपराध
    हा जनाचा
    साही आता
    मुखी ऋचा

    विश्व कोपे
    पेटे वन्ही
    बंधू राया
    व्हावे पाणी

    उणे-दुणे
    खुपे बोल
    संत बोधा
    आहे मोल

    पुर्ण ब्रम्ह
    आहे घर
    नको कुढू
    जगा तार

    ब्रम्हा सम
    विश्व सारे
    जनलोक
    थोर की रे

    आवरावे
    क्रोधाग्नीस
    जाणारच
    एक दिस

    मारुनिया
    मनाला या
    उद्धरण्या
    जगाला या

    बहिणाई
    मी तुमची
    विनवणी
    जगताची

    ज्ञानदिप
    पाजळावा
    ज्ञान वाटा
    ज्ञानदेवा

    उठा उठा
    झडकरी
    ताबा ठेवा
    क्रोधावरी

    ताटी ऐका
    मुक्ताईची
    शिकवण
    बहिणीची

    -- सौ.माणिक शुरजोशी

      January 2, 2019


  • गंध कस्तूरी

    सखये अजुनही दरवळवतो
    तुझ्या, प्रीतीचा गंध कस्तूरी....

    रुतलेल्या तुझ्या पाऊलखुणा
    मृदगंधलेल्या या सुन्न वाटेवरी....

    आजही तुझेच वेड लोचनांना
    उमलुनी येती प्रीतभाव अंतरी....

    सांगनां, यातुनी सावरावे कसे
    मृदगंधलेल्या या सुन्न वाटेवरी....

    हे गुज, मनीचे मधुरम प्रीतीचे
    व्याकुळलेले, केशरी सांजतीरी...

    कालचक्र हे अखंडित अविरत
    तशीच ओढ़, तुझीच गं निरंतरी....

    --वि.ग.सातपुते (भावकवी)

    (9766544908 )

    रचना क्र.२७५

    २९/१०/२०२२

      November 4, 2022


  • सांगना बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का?

    रुसलेच मी कधी तर लाडोबा मला मंननार का?सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का?

      June 14, 2019