May 20, 2011
चार कविता सुंदर रचिल्या,
काव्य वाचन केले त्याचे
रसिक जनाची स्तुति ऐकूनी,
स्वप्न रंगविले कालीदासाचे....१,
कॉलेजातील रंगमंचावरी,
तल्लीन होवूनी भूमिका केली
टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी,
नटसम्राटाची आठवण झाली....२,
जमले होते शंभर श्रोते,
भाषण ज्यांचे समोर केले
श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी,
गांधी नेहरूसम होवूं वाटले...३,
यश जेंव्हां पदरी पडते,
भारावूनी जातो आम्ही त्यावेळी
कर्तृत्व शक्तीचे मूल्यमापन,
करीत राहतो चूक सगळी...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 7, 2016
चंचल केलंस मन, स्थिर करण्यासांगे ।
दिलेल्या गुणाची मग, बदलेल कशी अंगे ?
निसर्ग नियमाच्या, कोण विरूद्ध जाईल ।
फायद्याचे ते का त्याचे परि होईल ?
चपळता जसा गुण, स्थिरपणा असे दुजा ।
आगळ्यातील आनंद, हिच त्यातील मजा ।।
देहा ठेवून चंचल, सांगे स्थिरावण्या मन ।
हा उलटा खेळ कसा, खेळण्या भासे कठीण ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 27, 2021
सोडूनी दिली मी पूजाअर्चा, समाधान मज ज्यात न लाभले
दैनंदिनीच्या कार्यक्रमातील, एक भाग तो सदैव वाटले
बालपणी मज कुणी शिकविले, पूजाअर्चा आन्हकी सारे
ठसले नाही मनात कधीही, भक्तीला हे पोषक ठरे
पूजाअर्चा ह्या विधीमध्ये, लक्ष आमचे केंद्रीत होते
हळदी कुंकू गंध फूले आणि, दीपधूप हे मधूर जळते
सुबकतेच्या पाठी लागूनी, यांत्रिकतेसम आम्ही झालो
अर्थ ज्याचा कधी न कळला, मंत्र मुखोदगत वदू लागलो
वास्तव्य ज्याचे सदैव सागरी, स्नान तयाला काय घालता
नैवैद्य ज्याला अर्पण करितो, तो विश्वाचा असे अन्नदाता
प्रेमभाव भक्तीसाठा उचंबळूनी तेव्हा न आला
तांत्रिकतेच्या आहारी जावूनी, मुख्य गाभा विसरूनी गेला
पूजा विधी हा मार्गदर्शक, समरस होण्या प्रभू चिंतनी
रेंगाळूनी जाता वाटेवरती, वेळ दौडतो ध्येय विसरूनी
चिंतन मनन ध्यानामध्ये, पूजा अर्चा जावे विसरूनी
हेच खरे ते साध्य आहे, जे समर्पीत होते ईश्वर चरणी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 10, 2021
March 21, 2022
किती, कसे, कुठे शोधू तुला
अशी कुठे? तूं हरवुनी गेली...
लोचनी रूप तुझेच लाघवी
पापणी, नित्य पाणावलेली...
प्रतीक्षेत हरविले दिन ते सारे
क्षितिजी सांजाळ थबकलेली...
निलांबरी, मोहोळ आठवांचे
निमिषात तूंच उठवूनी गेली...
हे सारे, आज कसे विसरावे
अशी कुठे गं तूच हरवून गेली..
प्रीतिवीण कां? जगणे असते
धुंद श्वासात, गंधाळते बकुळी
शीणलो तरी वाटते तुला पहावे
सांजाळलेल्या या कातरवेळी
रचना क्र. ११२
२२/८/२०२३
- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
August 25, 2023
डेव्हलपर त्याच्या डोक्यावरील भार लवकरात लवकर उतरवायला उत्सुक असतो. तर कधी दिलेली आश्वासनं बिल्डरने पूर्ण करत नाही तोपर्यत काही सदस्य संस्थेचा ताबा घेण्यास तयार नसतात. काही संस्थेचे सदस्य आणि बिल्डर याचे वाद कोर्टात प्रलंबित असतात. तर अनेक सदस्यांना प्रश्न असतो, संस्था नोदणी झाली… पुढे काय? नविन संस्था एक इमारत १५० ते २०० त्याहून अधिक सदस्य असल्याने कामाचे स्वरूप सुद्धा वेगळे आणि वाढले आहे. अनेक प्रकारचे करार तपासावे लागतात. तेव्हा अशा स्वरूपाच्या कामाची माहिती असलेला कायदेतज्ञ यांच्या सल्ल्याने कारभार केल्यास सदस्याचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदतच होईल. आजच्या भागात पहिल्या सर्वसाधारण सभेची माहिती आपल्यासाठी.
July 30, 2021
करेन कोटी, करेन कोटी
करेन कोट्या कोटी कोटी
सांभाळीन त्या छातीच्या कोटी
केवळ अस्सल एक ना खोटी
सरस्वती थैमाने ओठी
कोटीला मग कसली खोटी
- यतीन सामंत
July 19, 2022
जात असता गाडी मधूनी,
दुर्घटना ती घडली,
अचानकपणे एक दुचाकी,
आम्हा पुढे धडकली ।।१।।
प्रयत्न होऊनी योग्य असे,
थोडक्यात निभावले,
वखवखलेल्या काळालाही,
निराश व्हावे लागले ।।२।।
घिरट्या घालीत काळ आला,
झडप घातली त्याने,
वेळ आली नव्हती म्हणूनी,
बचावलो नशिबाने ।।३।।
अपमान झाला होता त्याचा,
सुडाने तो पेटला,
थोड्याशाच अंतरी जावूनी,
दुजाच बळी घेतला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 5, 2017
दुपारचे ते भोजन करूनी, आडवा झालो थोडासा
झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा....१,
वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे
स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे.....२,
पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा
घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा....३,
खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी
खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी....४,
आई नको, परि तुम्हीच या, माझी शाळा सुटताना
टाटा करित गोड वदलि, शाळेमध्ये शिरताना....५,
येत असता घरि परत, दुकानी एका शिरलो
बराच खावू आणि खेळणी, घेवूनी मी परतलो....६,
उत्सुकतेने बघत असता, कुणीतरी हालविले
हाय वेड्या ! हे तर स्वप्न, तिनेच जे तोडले.....७,
क्षणभर आवक् झालो मनी, स्वप्न भंग पावतां
खंत वाटली उगाच एक, अपूरी इच्छा राहतां....८
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 25, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti