(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • युरो-गंध

    युरोपच्या दौर्‍याचे पद्यरुपात सुंदर वर्णन 

      May 14, 2012


  • होळीवर चारोळी

    होळी खेळ हा दुजाभाव विसरुन प्रेमत्वाची प्राप्ती करण्यासाठी केलेला असून याचं वर्णन करणारी ही चारोळी आहे.

      March 11, 2017


  • सासरीं जाणार्‍या मुलीस

    बागेतील तारका –

      May 15, 2013


  • काळजातला झंझावात

    काळजातला झंझावात, उफाळत बाहेर येत,
    किती एक वर्षानंतर,
    जीव जिवास भेटत,
    स्मृतींची मनात ओळ,
    केवढेतरी अधोरेखित,
    दोन टिंबे एका रेषेत,
    रेखली करत अंत,--!!!
    आसूंसे भेटण्या जीव,
    गाली हसे नशीब,
    लागले करण्या हिशोब,
    उभे राहून करत कींव,--!!!
    मनातल्या मनात वादळ,
    दडपावे भावकल्लोळ,
    सामोरी येता मूर्त,
    थांबला वाटतो काळ,--!!!!
    दिवस आणखी तास,
    पडले केवढे अंतर,
    भोवती खूप वर्दळ,
    तरीही एकांत -भास,--!!!!
    स्पर्श कराया तुज,
    धाडस लागे आज,
    खेळ खेळे प्राक्तन,
    खडे लेऊन सुख - साज,--!!!
    गालावर हास्य उमटत,
    परकेपण त्या खळीत,
    संपत सारे अद्वैत,
    आत्मे काहूर माजवत,--!!!!

    © हिमगौरी कर्वे.

      January 10, 2020


  • प्राणीमात्रा विषयी दया

    चाललो होतो मित्रासह सहल करण्या एके दिनीं
    आनंदाच्या जल्लोषात आम्हीं गात होतो सुंदर गाणीं १

    वेगामध्यें चालली असतां आमची गाडी एका दिशेने
    लक्ष्य आमचे खेचले गेले अवचित एका घटनेने २

    चपळाईनें चालला होता काळसर्प तो रस्त्यातूनी
    क्षणांत त्याचे तुकडे झाले रस्त्यावरी पडला मरूनी ३

    काय झाले कुणास ठाऊक सर्व मंडळी हळहळली
    जीव घेणाऱ्या प्राण्यालाही सहानुभूती ती लाभली ४

    अंत:करणीं दया भाव तो असतो ईश्ररी गुणधर्म
    जीवमात्रीं वसला असूनी निर्मितो आपसातील प्रेम ५

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      September 9, 2012


  • आनंदी भाव हाच भगवंत

    बागेतील तारका-

      April 25, 2014


  • दोघे एका डहाळीवरच झुलू

    दोघे एका डहाळीवरच झुलू,निसर्गाचे ,देणे किती पाहू,
    बघ, रसरशीत खाली फळे,
    दोघे मिळून चवीने खाऊ,--!!!

    पक्ष्यांची जात आपुली,
    निसर्गमेवा"आपुल्याचसाठी,
    मानव त्याचा बाजार मांडे,
    निसर्गराजा, फिरवी कांडी,

    एका वृक्षा,-- किती फळे,
    रसाळ,गोड,चविष्ट मधुर,
    तुझ्यासमवेत स्वाद वाढे,
    फळ बने आणखी रुचिर,

    प्रेमसंगत वाढून आपुली,
    एकमेकांचे उष्टे' खाऊ,--!!
    त्यागातच प्रेम असते,
    सखे, दुनियेस दाखवून देऊ,--!!

    दोन "सांसारिक" जीव आपुले,
    करती मधुर रसपाना,--!!!
    निसर्गच लुटून देतो सारे,
    शिकवतोही साऱ्या जगतां,--!!!

    संसार या कैरीसारखा,--
    कच्चा असता चटकदार,
    चाखण्यां मिळती सर्व चवी,
    आंबट, तुरट, गोडसर फार,--!!

    नवीन संसार सुरु होतां,
    फळां, जपावे लागते,
    करतां-करतां,फळ मग,
    कशी संपन्नता आणते,--!!!

    हिरवाकंच रंग संपे,
    जो असतो तारुण्याचा,
    पिवळसर कांतिमान रंग चढे,
    पिकल्यावर तो प्रौढत्त्वाचा,--!!!

    आंबट, तुरट फळ,
    हळूहळू, होई जसे गोड,
    तसेच साथीदार होती कृतार्थ,
    संसारी मिळतां योग्य जोड,--!!!

    फळ संपे दुसऱ्यासाठी,
    बघ त्याचे समर्पण,
    सूचित होई त्यातून प्रिये,
    संसाराचेच उदाहरण,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      April 19, 2019


  • आपला एकतर पाहिजे (गझल)

    शेवटी साथ जर पाहिजे
    माणसांची कदर पाहिजे

    तूच असशील ज्याच्यामधे
    स्वप्न ते रात्रभर पाहिजे

    जीव तर लावतो गाव पण
    माणसाला शहर पाहिजे

    कर्जमाफी नको उद्धवा
    शेतमालास दर पाहिजे

    जीव होईल वेडापिसा
    फक्त पडली नजर पाहिजे

    फक्त एका क्षणाची नको
    साथ आयुष्यभर पाहिजे

    तू असे चुंब की आठवण
    राहिली जन्मभर पाहिजे

    काल होता हवा पायथा
    आज त्याला शिखर पाहिजे

    जी हवी ती दवा दे मला
    व्हायला बस् असर पाहिजे

    भोवती लाख असतात पण
    आपला एकतर पाहिजे

    - महेश मोरे (स्वच्छंदी)
    9579081342

      October 15, 2020


  • नाशाची वृत्ती

    जेव्हा दुजाचे नुकसान होते, उत्सुक दिसे कुणी

    स्वभावाची ही विकृती जाणता, खंत वाटली मनी

    बागेमध्ये फिरत असता, फूल तोडतो अकारण

    सुगंध त्याचा क्षणीक घेवूनी, देतो ते फेकून

    हाती देता सुंदर खेळणी, तोड मोड करिते

    लहान बालक खेळण्यापेक्षा, तोडण्यात दंग होते

    लय पावणे प्रतिक शिवाचे, ईश्वरी असतो गुण

    ‘नष्ट करणे’ निसर्ग स्वभाव, हे घ्या तुम्ही जाणून.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      September 21, 2018


  • वेड

    केलेस प्रेम तू ही भलत्याच गं धिटाने
    उरली उजाड वस्ती तू जिंकली कटाने ​
    मी हा असा कफल्ल्क माझी उदास गाणी
    विराण या जगाची झालीस पट्ट राणी

    देऊ कसे तुला मी आणून चंद्र तारे
    जखडून घेतले मी हे पाय या धरे वर
    घेऊन स्वप्न पंखे आलीस तू अशी का
    आधीच भंगलेली स्वप्ने इथे किती तर

    सांगून टाकली मी माझी जुनी कहाणी
    पण वाटले तुला मी करतो उगी बहाणी
    झाले अनेक तरीही पाहिल्याचे वेगळेपण ​
    वाटे युगास भारी प्रेमातले जुने क्षण ​
    ते वेड नवे होते होते ते प्रेम पहिले
    तूफान एक आले प्रेमाची ज्योत विझली
    सांभाळ तू ही म्हणतो आताच सतर्क करतो ​
    तू आणलीस ज्योत ओसाड या महाली ​
    ​​
    -विनायक आनिखिंडी,
    पुणे

    मो ९९२२९७०३१७

      September 8, 2023