दु:ख जाणण्या दु:खी व्हावे, या परि अनूभव दुजा कोणता
सत्य समजण्या कामी न येई, तेथ कुणाची कल्पकता
धगधगणारे अंगारे हे, जाळती जेथे काळीज
शब्दांचे फुंकार घालूनी, येईल कधी का समज
मर्मा वरती घाव बसता, सत्य येते उफाळूनी
चेहऱ्यावरले रंग निराळे, हलके हलके जाती मिटूनी
त्या दु:खीताला जाणीव असते, जीवनामधली निराशा कशी
झेप घेवूनी समरस होतो, इतर जणांच्या काळजाशी
सुख दु:खातील दु:ख आधीक ते, पदोपदी जे दिसून येई
दु:खीतांचे अश्रू पुसण्यासाठी, दु:खी अनूभवी धाव घेई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 26, 2019
एके काळीं हवे होते,
मजलाच सारे कांहीं
आज दुजाला मिळतां
आनंद मनास होई
माझ्यातील 'मी ' पणानें
विसरलो सारे जग
तुझ्यामध्येंही ' मी ' आहे,
जाण येई कशी मग
जेंव्हा उलगडा झाला
साऱ्या मध्ये असतो 'मी'
आदर वाटू लागला,
जाणता 'अहं ब्रह्मास्मि'
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 5, 2021
ती आत्महत्त्या करताच समाज तिच्याच
चारित्र्यावर प्रश्न चिन्ह लावून मोकळा होत असतो...
पण तिने आत्महत्त्या करण्यापूर्वी
किती रात्री जागून काढल्या असतील,
किती उश्या तिच्या अश्रुंनी ओल्या झाल्या असतील,
कित्येकदा मनातल्या मनात ती मेलीही असेल
याचा विचार कोणी कधीच करीत नाही...
प्रत्येकाला तिच्या मृत्यूचे कारण जाणण्यात रस असतो...
ती गेल्याचे दु:ख फारच थोड्यांना असतं ...
बाकीच्यांना तो मनस्तापच वाटत असतो...
कोण म्हणतं तिचं प्रेमप्रकरण असेल,
कोण म्हणतं तिचा प्रेमभंग झाला असेल,
कोण म्हणतं ती गरोदर असेल,
कोण म्हणतं तिचे लग्न ठरत नव्हतं,
कोण म्हणतं तिच मन फारच हळवं होतं...
पण खरंच हिच कारणे असतात का तिच्या आत्महत्तेमागे ..?
तिच्या आत्महत्तेची खरी कारणे कधीच येत नाहीत का जगासमोर...
पुरुषांना जन्माला घालणारी स्त्री
त्याच पुरुषांच्या अहंकाराची बळी ठरत असते का ?
ठरत असेल तर हे वेळीच थांबायला हवे !
तिची आत्महत्त्या टाळायला हवी !
नाहीतर... तिच्या अभावी...
भविष्यात कित्येक पुरुषच
आत्महत्त्या करताना दिसतील...
©कवी – निलेश बामणे ( एन.डी.) 18-02-24
February 28, 2024
या सांजराई मी माझ्या
डोकावलो जरा भूतकाळी.
आठवले अर्ध्यात सोडून गेलेले बाबा आणि आई,
आठवण त्यांची मज येई
आजही आयुष्याच्या या सांजराई..
बाल सवंगडी
वरच्या आळीचे बंडू व माझी ताई,
आठवण त्यांची मज येई
आजही आयुष्याच्या या
सांजराई..
मी सगळ्यात लहानगा
दोन भावंडांत मोठा माझा भाई,
आठवण त्यांची मज येई
आजही आयुष्याच्या या सांजराई..
गावची कौलारू शाळा
मित्र, गुरुजी आणि शाळेतल्या बाई,
आठवण त्यांची मज येई
आजही आयुष्याच्या या सांजराई..
पडली जबाबदारी
प्रपंचासाठी हाल अपेष्टा बरेच काही,
आठवण त्यांची मज येई
आजही आयुष्याच्या या सांजराई..
किती झिजलो किती कष्ट
कधी सुख कधी दु:ख
भरेल त्याची एक मोठी वही,
आठवण त्यांची मज येई
आजही आयुष्याच्या या सांजराई..
या सांजराई.. या सांजराई..
कवी.
शिव सह्याद्री.
- नंदकुमार स.गोपाळे
(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
April 4, 2023
(आमच्या झोपायच्या खोलीच्या खिडकी समोर उंबराचे झाड आहे. त्यावर चिमण्या राहतात. पहाटे साडेचार पाच वाजल्यापासून त्यांची चिवचिव चालू होते. जाग आल्यावर वाटते झाडच जणू गात आहे. हे गाणे दोन-तीन तास चालू असते.)
उंबराच्या झाडाच्या गाण्याने
पहाटे जाग येते तेव्हा वाटते
जणू कोणी नर्तक
पायात बांधून घुंगरांचा साज
करतोय सुंदर पदन्यास
उंबराच्या झाडात म्हणे असतो
सद्गुरूंचा वावर
म्हणूनच काही चिमणी पाखरं
पहाटेच सुरू करतात
मधुर मंत्रजागर?
असेलही खरे
म्हणूनच म्हणतात का बरे?
चराचर सृष्टीतच
भरला आहे ईश्वर?
पहाटेच्या मंगल वेळी
गोड किलबिल मंजुळ वाणी
गाणारे झाड
अलौकिकाचा स्पर्श!
किमयागार तो
सृष्टीचा इश
जोडूनी दोन्ही कर
त्याला करू वंदन!
-- विनायक अत्रे.
July 14, 2022
तू माळल्या बकुळीचा गंध
अंतरात दरवळतो अजुनही
आली कित्येक बेधुंद वादळे
स्मरण तुझे अंतरी अजुनही
सारेसारे आजही तसेच आहे
मी न काही भुललो अजुनही
जिथे जिथे जाते नजर माझी
तुझेच ते ध्यासभास अजुनही
तूच रुजलिस अशी हृदयांतरी
स्पंदनी चैतन्य तुझेच अजुनही
********
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३०३
२४/११/२०२२
December 2, 2022
या मित्रांनो सारे या,
सर्व मिळूनी खेळू या ।।धृ।।
खेळ आमच्या देशाचे
गरिबांसाठी सोईचे ।
मैदान नको मोठे ते
वस्तूही अल्प लागते ।।
खेळांना त्या समजून घ्या - १
--- या मित्रांनो सारे या,
हुतुतूचा खेळ बघा
दोन गट, छोटी जागा ।
स्पर्श रेषा ओलांडूनी
ह्तुतू म्हणती तोंडानी ।।
एकाच दमात भिडू मारू या - २
--- या मित्रांनो सारे या,
खो खो मध्ये चपळाई
चकमा देण्याची घाई ।
उलट सुलट बसे
एकाच रांगेत दिसे ।।
मिळता खो भिडूला पकडू या - ३
--- या मित्रांनो सारे या,
लपंडाव हा खेळ कसा
लपलेल्यांना शोधत बसा ।
राज्य येते त्यावरती
शोध घेई सभोवती ।।
तीक्ष्ण नजर ती ठेऊया – ४
--- या मित्रांनो सारे या,
आट्या पाट्या च्या खेळात
कांही घरे आखतात ।
सीमेवरती दक्ष राहती
घरात येण्या ते रोकती ।।
चपळाईने घरात शिरू या – ५
--- या मित्रांनो सारे या,
एका पायाची गम्मत
लंगडी आहे माहित? ।
उड्या मारीत पळावे
भिडू सारे पकडावे ।।
आखल्या रेषेतच खेळू या - ६
--- या मित्रांनो सारे या,
एक दिलाने खेळू या
आनंद सारा लुटू या ।
निरोगी सदा राही तो
प्रफुल्ल मन बाळगतो ।।
शीण अभ्यासाचा घालवू या – ७
--- मित्रांनो सारे या,
-- डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com
December 28, 2018
भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले
करण्यास तव जवळीक, कामास तेच आले ।।१
जिंकून घेई राधा तुजला, उत्कठ करुनी प्रेम
उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म ।।२
भक्तीभावाची करिता बात, ती तर असे आगळी
पावन करण्या धाऊन जाती, सर्व संत मंडळी ।।३
भजनांत मिरा रंगली, ध्यास तुझा घेऊन
नाचत गांत राहिली, केले तुझ पावन ।।४
दया क्षमा शांतीचे भाव, करुणेमध्ये भरलेले
त्यांत शोधता तुझा ठाव, आनंदी मन झाले ।।५
सर्वस्व तुजला अर्पिता, पावन होतो भक्तासी
भावनेची ज्योत पेटतां, कदर तुच करिसी ।।६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 2, 2021
वाटते सारे विसरुनी जावे
परी आठव व्याकुळ करते...
श्वासात रुतलीस तूं अशी
तुज उसविणे जीवघेणे असते...
रुधिरातील तुझीच सळसळ
लोचनातुनी अविरत पाझरते...
सांग कसे, तुज भुलुनी जावू
स्मरण तुझेच जगवित असते...
विस्मरणे कां असे इतुके सोपे
अंती सरणीही ते सोबत असते
वि.ग.सातपुते.( भावकवी )
(976654908 )
रचना क्र. २६९
२३/१०/ २०२२
October 29, 2022
विसरून गेलो सारे कांहीं, आठवत नाही मला,
रचली होती एक कविता, त्याच प्रसंगाला ।।१।।
जल्लोषांत होतो आम्हीं, दिवस घातला आनंदी,
खिन्नतेचा विचार त्या दिनीं, शिवला नाही कधीं ।।२।।
नाच गाऊनी खाणेंपिणें, सारे केले त्या दिवशीं,
बेहोशीच्या काळामध्यें, कविंता मजला सुचली कशी ।।३।।
छोटे होऊन गेले काव्य, अमर राहिले आतां,
प्रसंग जरी तो गेला निघुनी, राहते जिवंत कविता ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 6, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti