तेजोनिधीचे आगमन होते, सोनसळी सगळे भूतल, रंग पाण्यावरती बिखरतें,
फक्त मोजावे ते निव्वळ,--!!!
आभाळात, दशदिशांत,
ते कोठून सगळेच येतात,
सूर्योदयाची संधी साधत,
चहुदिशी कसे पसरतात,--!!!
कुठला रंग नसतो बघावे,--?
तांबडा, निळा, हिरवा, पिवळा, नैसर्गिक रंगांचे मेळ जमले,
अखंड संगत ना, सूर्यदेवा ,--?!!!
जशी किरणांची जादू फैलावे, बदल साऱ्या चराचरांत,
उजेडाची भक्कम पकड येते, धरणीला घेत आवाक्यात,--!!!
जांभळे, निळे, तांबडे, पिवळे,
रंग मावेनात आकाशात
नभ पहा ओसंडून वाहते, पृथ्वीवरती कसे झोकात,--!!!
तपकिरी, राखाडी, काळे, निळे फलक सगळे विस्तारत जात, रंगांचे फिरवत मग कुंचले, दिनकराच्या दिव्य दरबारात,--!!!
डोळ्यांचे फेडत पारणे,
मित्रराज येई गगनात,
रंगीबेरंगी चित्र देखणे,
धरेच्या विशाल प्रांगणात,--!!!
प्रतिबिंब निळ्या पाण्यात पडे, सोनेरी किरणांचा धुडगूस,
उन्हे कोवळी, खेळती बाळे, काळ्याआईच्या अंगोपांगात,--!!!
सोनेरी पिवळट ऊन साजिरे, निळ्या पाण्यात जाई आरपार, तेथवर जाऊन दर्शन घेते,
सूर्यबिंबाचे पुन्हा एकवार,--!!!
© हिमगौरी कर्वे.
February 18, 2020
May 19, 2011
मूल्य नाही कुणा,
तूं दिल्या वेळेचे,
गमावून टाकी,
जाणूनी फुकाचे ।।१।।
लागत नसते,
दाम वेळेसाठीं,
म्हणून दवडे,
अकारणा पोटीं ।।२।।
वस्तूचे मूल्य ते,
पैशांनीच ठरते,
परी वेळेची किंमत,
कुणा न समजते ।।३।।
वेडे आहोत सारे,
कसे होई मूल्य
वेळ जातां मग,
आयुष्य जाईल ।।४।।
आयुष्य खर्चणे,
हेच वेळेचे मुल्य ठरते,
जीवनांतील यश,
त्यावरुन कळते ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 19, 2017
कधी तिचा “चुकतो अंदाज”… आणि तांदूळ होतात जास्त दुसऱ्या दिवशी सगळे करतात … फोडणीचा भात फस्त
September 6, 2021
दयावंताला पाझर फुटला ,
पक्षी पिंजऱ्यातून सोडला,
विहंगम तो आनंदला,
भरारी घेऊनी, उडाला,--!!!
निळे आसमान ते,
खुणावत सारखे होते,
पिंजऱ्याच्या बंधनाला,
मूक मन झुगारत होते,--!!!
कोण येईल पुढे अन्
स्वातंत्र्य देई मजला,
देवाचा दूतच तो,--
मज तेव्हा तो वाटला---!!!
कोण आहे त्राता माझा,
मज स्वातंत्र्य देणारा,
वाट पाहतो जीव सारखा,
उडायाला आसुसला,--!!!
बोलावे मज हिरवी धरा,
झाडे वृक्ष वेली लता,
प्राण येथेच सोडेन मी,
इथून सुटका नसतां--!!!
दुःख माझे कोण जाणेल,
हात देईल मदतीचा,
जागेत संकुचित या,
जीव घुसमटे हो माझा,--!!!
कोण आला जवळी हा,
दरवाजा उघडे पिंजऱ्याचा,
माणूस निष्ठुर भारी ना,
नको, नको रे धरू बाबा,--!!!
घेऊन कुठे चालला हा,--?
निघाला का मारावया,
भीती वाटे मज फार,
मारतील धरून गळा,--!!!
मी मागे थरथरत उभा,
काळीज हाले लपालपा,
दयावान तो पुढे येता,
दार उघडतो बघतां-बघतां,--!!!
बाहेर येता जीव थोडा,
जागचा की हाललो,--
उडालो सरळ गगनांतरी,
घेतली मोठीच भरारी
देवा त्याचे कल्याण करी,
हीच विनंती तुज खरी,--!!!
हिमगौरी कर्वे.©
August 10, 2019
व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली स्व. सौ. गंगूताई वैद्य यांची हि कविता
गरगर गरगर फिरवू चरखा
दीन जना जो देईल तनखा।।धृ।।
चरख्याचा हा मंजुळ नाद
दशदिशांतुनी घालीत साद
स्वदेशी खादीचा जणू प्रसाद
परसत्तेचा सोडवी विळखा
गरगर गरगर फिरवू चरखा ।। १ ।।
निघती भरभर कोमल धागे
सुबक गुंफुनी विणुया तागे
देश आपुला न राहील मागे
करी निर्भय हा पाठीराखा
गरगर गरगर फिरवू चरखा।।२।।
कवच स्वदेशी निर्भयतेचे
शस्त्र हाती हे संघटनेचे
गीत मुखीचे स्वातंत्र्याचे
जयभारत हा घोषही ऐका
गरगर गरगर फिरवू चरखा ।। ३ ।।
-स्व. सौ. गंगूताई वैद्य
December 18, 2023
………पाण्यासारखच निर्मळ त्याच तीच प्रेम असावं.
June 17, 2010
सखू ग सखू, कुठं चाललीस?
बाजारात जाते, बाजारहाट करते
भाजीपाला आणते,फळबिळं आणते
अंगडे टोपडे बघते,बाळा खाऊ घेते
सखू ग सखू, कुठं चाललीस?
पाचदहा रूपये घेते, दुकानात जाते
गंध पावडर आणते,फणीबिनी बघते
साबणतेल आणते,बाळा न्हाऊ घालते
सखू ग सखू, कुठं चाललीस ?
दवाखान्यात जाते,डाक्तरला दावते
दवापाणी घेते, डिकमली बघते
गुट्टीबिट्टी लावते,बाळाला लई जपते
सखू ग सखू, कुठं चाललीस?
माहेराला जाते,आईबाबांना पाहते
दोनचार दिस राहते, वहिनीस बोलते
बाळाला मामा दावते, गावमळा पाहते
सखू ग सखू, कुठं चाललीस ?
मराठी शाळेत जाते, गुरूजींना बोलते
जन्मतारीख सांगते,पतीचं नाव घेते
बाळाच नाव घालते, माणूस बनवते
-- विठ्ठल मारूती जाधव
शिरूरकासार जि.बीड
सं.९४२१४४२९९५
July 18, 2018
हिरवी माया हिरवी छाया हिरवी हिरवी काया
July 12, 2026
हपालेल्या निष्ठूर काळा,
समाधानी तू कसा होशील,
बळी घेण्याचे सत्र तुझे ते,
केंव्हां बरे तू थांबवशील ? ।।१।।
नित्य तुला भक्ष्य लागते,
वेध घेई टिपूनी त्याचा,
मिस्कीलतेने हासत जातो,
गर्व होई स्वकृत्याचा ।।२।।
अवचित कशी ही भूक वाढली,
मात करूनी त्या वेळेवरी,
सूडानें पेटूनी जावूनी,
बळी घेतले गरीबांचे परी ।।३।।
काळ येई परि वेळ न आली,
म्हणून सदा हताश होतो,
वेळेची ढिलाई बघूनी,
तांडव नृत्य करीतो ।।४।।
शांत होऊ दे क्रोध तुझा ,
बळी कुणाचा राग कुणावरी,
‘वेळवरती’ अवलंबूनी तूं,
जाण ठेव याची तरी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 25, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti