(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बापाची जागा

    अरे माझी माय .. माझी माय ..
    म्हणून सगळेच बोंबलतात
    बाप तुमचा मेलाय काय...?
    आईनं जन्म दिला आईनं वाढवलं
    बापाचं योगदान काहीच नाही काय ?

    रडत होती पण लढत होती
    बरंच सोसावं लागलंय तिला
    बापाचा हात पाठीवर होता
    म्हणून लढली कधी तरी विचारा तिला.!

    आईच्या डोळ्यातलं पाणी आणि
    दाटलेले हुंदके सगळ्यांना दिसतात
    अरे दिसले नाही कधी कुणाला पण
    बापाच्याही डोळ्यात अश्रू असतात..!!

    आजची लेक उद्या बहीण प्रेयसी
    पत्नी आणि आई होणारच आहे
    तु सुध्दा मुलगा आहेस उद्या भाऊ
    प्रियकर पती आणि बाप होणारच आहे.
    जिवनाच्या जत्रेला जायला जी वाट
    काल होती तीच उद्या असणार आहे
    निष्ठूरपणे अडगळीत टाकलेल्या बापाच्या जागी
    तु ही उद्या बसणार आहे..!!

    -- राजेश जगताप

      January 30, 2023


  • पाहुणे

    रोज येती घरा हो
    असे पाहुणे
    एकलेपणातही
    नाही काही उणे

      August 19, 2026


  • जगमोगन रेड्डी नी “घराणेशाही” साठी “भुकंप” घडवला ?

    जगमोगन रेड्डी नी “घराणेशाही” साठी “भुकंप” घडवला ?

      November 30, 2010


  • आधार

    वेलींना आधार होता,
    वृक्ष वाटला दणकट परि
    बुंधा ज्याचा किडूनी गेला,
    कोसळणार मग कधीतरी

    नष्ट करिल तरूवेलींना,
    धरणीवरती आडवा होता
    सौंदर्य दिले लताफूलांनी,
    सारे कांहीं विसरूनी जाता

    वेलींनो आणि झुडपानों,
    सोडूनी घ्या आधार पोकळ
    स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या ,
    स्वावलंबनाचे टाका पाऊल

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 19, 2016


  • तुझा उपयोग नाही काम झाल्यावर

    तुझा उपयोग नाही काम झाल्यावर
    तुला उमजेल का आराम झाल्यावर ?

    पुढे घेऊन जाते सायकल साधी
    कधी रस्त्यात ट्राफिक-जाम झाल्यावर

    तुला समजेल बघ आहे किती सुंदर !
    तुझे आयुष्य इन्स्टाग्राम झाल्यावर

    नवे खाते, नवा डी.पी., नवा नंबर
    विसर ओळख जुनी; बदनाम झाल्यावर

    तुझा आवाज बाकी गोड आहे; पण
    नको बोलूस तू बेफाम झाल्यावर

    बदल घडला जरी चिंताजनक मोठा
    दखल घेईल जग परिणाम झाल्यावर

    -- ॐकार जोशी

      August 18, 2019


  • लोकशाही सत्ता हवी

    लोकशाही सत्ता हवी

    लोकशाही राज्य
    भारताने स्विकारले
    लोकहो टिकवा हे सुराज्य

    इथे चालवतो
    पंच वार्षिक योजना
    नवी सत्ता ,नवा रस्ता स्विकारतो

    बेधुंद जनता
    हानीकारक देशास
    निर्बंधच फायदा असता

    हाव नको नुस्ती
    राजकारण्या खुर्चीची
    त्यास समाजसेवेची पुस्ती

    करू नका इथे
    जाळ-पोळ,दंगा-धोपा
    जिथे शांती लोकशाही तिथे
    कर्तव्य नी हक्क
    दिले ना संविधानाने
    पाळता होतील सारे थक्क

    सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

      January 9, 2020


  • काळजाचं दुकनं

    माज्या कुकवाचा धनी, माज्या डोरल्याचा मनी
    कवातरि ऐक माज्या काळजातली गानी
    भिताडानाबी कळतंय रोजचं माज दुकनं
    तूला का कळू न्हाय, माज झिजून झिजून ह्ये जिणं
    संगटीने ऱ्हातुयस येकाच खोपीमंदी
    संगटीने पितुयस येकाच खापरातलं पानी
    तरी बी ऱ्हातुया कोरडंच वाळवंटावानी
    दावू कसं रं तूला, माज्या पिरितीतली ज्वानी
    खोपट्यातल्या गर्दीत हुडकू सांग कसं
    माज्या काळजातलं इप्सित सांगू तुला कसं
    खटल्यातनं मान मोडू मोडू जाय
    बायांच्या हाताबुडी राबून जीव उगी ऱ्हाय
    त्येबी नगं चल, घ्ये काळजाचा तरी ठाव
    त्यावर गुजरलं जिंदगी, येकवार तरी शबूद ओला दाव
    कटाळून जातो जीव, उठतो वणवा ह्यो मग बंडाचा
    रोखतो उंबरा, देतो आन, गळातल्या फुटक्या डोरल्याचा
    असंच हाय आता ह्ये वाळकं माज पान
    कंदी येकवार बग घरातल्या घरणीकडं, तूला माजी हाय आन!!
    -- वर्षा कदम.

      November 18, 2021


  • अनंतात नाम तुझे

    अनंतात नाम तुझे
    तुझ्या चरणी माथा,
    कानडा विठ्ठल तू
    उभ्या पंढरीचा राजा
    धाव घेतो तू सत्वरी
    भोळा भाव भक्तीचा,
    नामदेवाची खातो खीर
    काय वर्णावा तुझा सोहळा
    जनीचे दळतो दळण
    सावत्या माळ्याचा पिकवी मळा,
    श्रीखंडया बनून पाणी
    भरले एकनाथांच्या घरा
    चंद्रभागेच्या तिरी जमला
    साऱ्या वैष्णवांचा मळा,
    तुझ्या नामात तल्लीन
    होतो भक्तांचा हा मेळा
    ज्ञानदेवांनी सुरु केली
    वारीचा अनमोल हा ठेवा,
    नतमस्तक तुझ्या चरणी
    माझा नमस्कार पांडुरंगा सदा
    -- स्वाती ठोंबरे.

      June 2, 2022


  • न्याहरीची तऱ्हा न्यारी

    दोसा असतो कसा छान जाळीदार
    मन मोकळे जसे असते त्याचे आरपार
    इडली सदाच टम्म फुगलेली.
    साधीदार सांबार नसला की असते रुसलेली
    खमंग खुसखुशीत आप्पे गोल गोल
    गरम गरम असतानाच खाणार किती बोलबोल
    आंबट ताकातली खमंग फोडणीत उकड शिजते रटरटा
    डोळे मिचकावत खायचे मस्त गटगटा
    कुणी म्हणतात उप्पीट तर कुणी ऊपमा
    या साठी बऱेच पदार्थ करावे लागतात जमा
    शिरा याचा मान तर असतो खूपच मोठा
    तूप साखर. बदाम. काजू यांचा असतो ना साठा
    साधे सरळ सोपे नाती जुळवणारे कांदे पोहे
    कुणीही या कधीही या ते तयारीतच आहे.
    सांगा सांगा लवकर सांगा. तुम्हाला काय आवडते ते लवकर सांगा
    -- सौ. कुमुद ढवळेकर.

      June 22, 2022


  • प्राण्याचे मोल समजा

    खरेदी केला सुंदर पक्षी, दाम देवूनी योग्य असे ते

    नक्षीदार पिंजरा घेवूनी, शोभिवान केले घरातें ।।१

    प्रात:काळी उठोनी बघतां, चकित होवूनी गेलो मनीं

    पक्षानें मान टाकली, पडला होता तळात मरूनी ।।२

    क्षणभर मनी खंत वाटली, राग आला स्वकृत्याचा

    अकारण हौस म्हणूनी, खरेदी केला पक्षी याचा ।।३

    किती बरे निच मन हे निराशा तयाला धन हानीची

    पक्षानेतर प्राण गमविला, विषण्णता परि दुय्यम याची ।।४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 15, 2020