(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तू नसता

    तू नसता मी सैरभैर
    तू असता स्थिर होतो !

    -- श्रीकांत पेटकर
    कौशल.

      March 24, 2019


  • त्यांचे नाते

    कोण लागतात माझे, नाते ते ठावूक नाहीं
    देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं....१,

    विठ्ठल- रामाचा नाद, गुंजन करितो येथें
    पवित्र वातावरण, येण्यानी होवून जाते....२,

    देवण घेवण आत्म्याची, आपसामध्यें चालती
    शब्द फुलांची गुंफण, त्वरीत होऊन जाती....३,

    फूले देऊनी मजला, हार गुफूंन घेतात
    दोघे मिळूनी तो हार, प्रभूस अर्पूं सांगतात....४

    अदृश्य असले नाते, असावे दोघांमध्ये
    भाषा आत्म्याची जाणतां, मन नाचते आनंदे....५

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      February 12, 2019


  • सहज मिटल्या डोळ्यांत

    सहज मिटल्या डोळ्यांत
    का तू अलगद आठवावा
    पाऊस मनात रिमझिम
    का तू मनात आल्हाद मिटावा
    कसली ही भूल मनीची
    आरक्त मी तुझ्यात व्हावी
    न उलगडले गुपित मज हे
    का तुझी वाट मी पाहवी
    कसले हे चांदण टिपूर
    हृदयाची हितगुज उमलावी
    न बोलता मी अबोल अशी
    अंतरीची साद तुला कळावी
    येशील का रे तू असा
    नदीकाठी मी वाट पाहवी
    हात तुझा हातात अलगद
    भान हरपून वाट चुकावी
    न बोलणे कसले व्हावे दोघांत
    स्पर्शाची गुज अंतरी उमटावी
    निसर्ग खुणावे दोघांना अवखळ
    डोळ्यांत तृप्तता दोघांनी लुटावी
    ये अलवार सख्या तू असा
    वाट मी कितीक पाहवी
    थेंब थेंब जमले टिपूर असे
    तुझ्या आठवणीत मोहक मी लाजुनी
    -- स्वाती ठोंबरे.

      February 4, 2022


  • हिशोबातील शिल्लक

    हिशोबाची वही घेवूनी बसलो,
    हिशोब करण्यासाठीं ।
    जमाखार्च तो करित होतो,
    जीवनाच्या सरत्या काठीं ।।

    घोड दौड ती चालूं असतां,
    सुख दु:खानी भरले क्षण ।
    प्रसंग कांहीं असेही गेले,
    सदैव त्याची राही आठवण ।।

    कष्ट करूनी जे कमविले,
    थोडे धन या देहाकरिता ।
    उपयोग नव्हता त्याचा कांहीं,
    जग सोडूनी देह जाता ।।

    कधी काळचा निवांतपणा,
    घालविला दुजाच्या सेवेत ।
    पुण्य राहिले शिल्लकीमध्ये,
    वाटते तेवढेच हिशोब वहीत ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      October 27, 2016


  • चरावस्था

    बाल्यावस्था
    रम्य कसे
    रमतांना
    मौज असे

    सरतांना
    बालपण
    येई मना
    दडपण

    हा किशोर
    अवघडे
    कुतूहल
    मनी दडे

    नाना प्रश्न
    येता मनी
    ओथंबला
    तारुण्यानी

    तरुणाई
    मस्तीतली
    नवलाई
    धुंदीतली

    जिरे रग
    तरुणाची
    चाहुलही
    वार्धक्याची

    वार्धक्य हे
    विरक्तिचे
    अवलंबी
    निवृत्तीचे

    दुखे-खुपे
    भय साचे
    दुखण्याने
    वृद्ध खचे

    पुर्ती करा
    कर्तृत्वाच्या
    चारीवस्था
    महत्वाच्या

    सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

      January 8, 2020


  • नशीब

    का असा धांवतोस तूं ,

    नशिबाच्या मागें मागें,

    यत्न होता भगिरथी,

    नशीब येईल संगे ।।१।।

    प्रयत्न होतां जोमाने,

    दिशा दिसताती तेथें,

    यशाचे ध्येय सदैव,

    योग्य मार्गानें मिळते ।।२।।

    प्रयत्न करूनी बघा,

    ईश्वर देखील मिळेल,

    इच्छा शक्ती प्रभावानें,

    नशीबही बदलेल ।।३।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      December 9, 2020


  • काही म्हणतात प्रेमात पडायचे असते

    काही म्हणतात प्रेमात पडायचे असते
    तर काही म्हणतात प्रेम करायचे असते...
    काहीही असो प्रेम महत्वाचे
    पण काहीना तेही आवडत नाही....
    प्रेमात असताना अनेक जण किवा जणी
    खुप ' डोळस ' प्रेम करतात..
    मग ते खरे प्रेम असते ..
    का तिथे पण ६०-४०% हिशेब असतो....
    असेल बुवा ६०-४० चा नाद अनेकांना
    कदाचित वृतीने टक्केवाले
    अधिकारी-कर्मचारीअसतील...
    टक्क्यावर जगणारे...
    पण प्रेमात असे नसावे
    असे वाटते...
    अर्थात ते हिशेब त्यांना
    चुकते करावे लागतात
    एखाद्या एकाकी
    वळणावर......
    -- सतीश चाफेकर.

      December 13, 2021


  • सु्र्य-चंद्राचा लपंडाव

    बघा बघा तो रवि चालला, अतिशय वेगानें ।
    पूर्व दिशेला चंद्रही येई, त्याच तन्मयतेने ।।

    युगानु युगें लपंडाव हा, त्यांचा चालला असे ।
    भावांमधली शर्यत बघूनी, गम्मत परी भासे ।।

    मोठा भाऊ रवि त्याला, पकडण्या धांव घेई ।
    लहान भाऊ चंद्र असूनी, निसटून मात्र जाई ।।

    संताप येता लाल होऊनी, रवि जाई तापूनी ।
    परि शांत असे चंद्र बघा, राग घेई गिळूनी ।।

    लहान असूनी थकून जाई, कांही काळ जाता ।
    नभीं न येतां घरींच झोपे, थकवा जाण्या करीता ।।

    विश्रांतीचा काळ घालवूनी, हलके हलके येई ।
    पुनरपि त्यांचा खेळ बघतां, आनंद मनास होई ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bbbknagapurkar@gmail.com

      January 8, 2019


  • कळ्या नाजुकशा

    कळ्या नाजुकशा,
    फुलल्या तुझ्यासाठी,--!!!

    गगनी चांदण्या,
    आल्या तुझ्यासाठी,--!!!

    घमघमणाऱ्या केवड्या,
    सुगंध तुझ्यासाठी,--!!!

    आरक्त प्राजक्ता,
    पखरले तुझ्यासाठी,--!!!

    दिमाखदार चाफ्या,
    लुटले तुझ्यासाठी,--!!!

    मदमस्त मोगऱ्या,
    खुडले तुझ्यासाठी,--!!!

    बकुळां,अर्धमिटल्या,
    वेचले तुझ्यासाठी,--!!!

    सायलीच्या सुगंधा,
    मोहित तुझ्यासाठी,--!!!

    अबोलीच्या वेण्या,
    माळल्या तुझ्यासाठी,--!!!

    मंद- मंद रातराण्या,
    उमलल्या तुझ्यासाठी,--!!!

    यामिनीला ढळत्या,
    मातले तुझ्यासाठी,--!!!

    आलिंगनात तुझ्या,
    सहज विरघळण्यासाठी,--!!!

    © हिमगौरी कर्वे

      October 8, 2019


  • भटक्या कुत्र्यांना आवर घालायाला नको का ?

    दोन एकदिवसापूर्वी मुंब्र्यात एक लहान मुलगा शाळेत जात असताना सात – आठ भटक्याकुत्र्यांनी त्याचे लचके तोडून जखमी केले. त्या जखमी मुलाला जवळ पास १५० टाके पडले.जर लोकांनी योग्य वेळी मदत केली नसती तर कदाचित त्या मुलाला आपले प्राणही गमवावेलागले असते.

      June 28, 2014