असं प्रेम सोपं नसतं,
ज्यात शब्दांपेक्षा शांतता जास्त बोलते,
हातात हात नसतो,
पण मनात घट्ट धरलेलं असतं.
असं प्रेम सोपं नसतं,
ज्यात अधिकार नसतो, फक्त प्रतीक्षा असते,
डोळ्यांत स्वप्नं असतात,
पण ओठांवर कबुली नसते.
रोजच्या संध्याकाळीत
तुझ्या आठवणींचा चंद्र उगवतो,
आणि मनाच्या आकाशात
तुझ्याच नावाचा तारा चमकतो.
असं प्रेम म्हणजे
पावसाआधीची गंधीत माती,
स्पर्श न करताही जाणवणारी
एक गूढ, हलकीशी व्याकुळता.
तुझ्या एका हसण्यावर
संपूर्ण दिवस उजळून निघतो,
आणि तुझ्या एका शांततेत
मन हजार प्रश्नांनी भरून जातो.
असं प्रेम सोपं नसतं..
ते मिळवण्यात नसतं,
ते फक्त जपण्यात असतं.
मनाच्या सर्वात खोल कप्प्यात,
नाव न देता,
पण आयुष्यभरासाठी.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
June 4, 2026
एके दिनीं निघून जाईन निरोप घेवून ह्या जगताचा
प्रवास माझा अनंतात कसा असेल त्या वेळेचा
आकाशाच्या छाये खालती विदेही स्थितींत फिरत राहीन
'तू' आणि 'मी' च्या विरहीत मी गत कर्माचे करिन मापन
बाल्यातील चुका उमगल्या तरूणपणाच्या उंबरठ्यावरी
सळसळणारे यौवन रक्त वृधावस्तेतील खंत ठरी
पूनर्जन्म घेण्याकरितां गर्भाची निवड करीन
गत जन्मींच्या चुका टाळूनी आदर्शमय जीवन जगेन
शंकेची परि पाल चुकचुके राहील का स्मृति गत जन्माची
नसतां पूनरपि चक्र फिरेल विस्मृति होतां गत कर्माची
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 22, 2020
काजळाची रेघ तुझ्या पापण्यात लपलेली
अलवार काळजाचा ठाव घेत जाते..
मन मुग्ध अन बरसतात श्रावण धारा
ओठावर हळूवार तुझे नाव येते..
रेशीम किनार तुझ्या पदराची वीण
खुणावते वाऱ्याला आज नव्यानं
पापण्यांच्या कडा मिटून घट्ट एकदा
मिठीत तुझ्या येता उरावे न भान...
उन्हातून सावली परतून यावी
निळ्या नभात उमटावे इंद्रधनू..
अनामिक नातं जुळत असताना
मनातील द्वंद्व उन पाऊस जणू..
उमलतील जेव्हा पापण्यांच्या कळ्या
वाचत राहिन हृदयातील ओळी..
नकोस खेळ खेळू लपंडाव आता
जीव कातर झाला असा सांजवेळी.
July 11, 2026
चाफा आणि मोगरा
गंधर्व कुठले हे,
धरातलावर येऊन,
सर्वांस मोहवती खरे,
शापित म्हणू त्यांना
तर सुगंधाच्या राशी,
जो तो कुरवाळे त्यांना,
घेऊन थेट हृदयाशी, --!!!
हिमगौरी कर्वे ©
August 14, 2019
तुझ्या आठवातुनी रमता, रमता
August 19, 2021
सरता दिवस, राहते उभी सामोरी सांज
जशी प्रसन्न प्राची, तशीच सांजही सुंदर
अंतरात भावनांची लोभस ती सोनसळी
जीवा सुखावणारी सांजाळ क्षितिजावर
सुखाचाच संसार, नाही कुणाशीही वैर
तृप्तले, सारे जीवन केले प्रेम सर्वावर
आता आठविती क्षण सारेच हरवलेले
होता आत्ममुख मन होई कातर कातर
आता न अंतरी सुखदुःखाचे मोजमापदंड
सारेच आपुले, हाच भाव जागो निरंतर
जगताजगता राखावित बहुतांची अंतरंगे
स्मरावी गीता, आणि रूप ते शामसुंदर
***********
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र.३११
२८/११/२०२२
December 10, 2022
वाटते पाहू नयेच स्वप्न
ना ते भंगण्याची भिती
करु नये प्रेम कुणावर
ना प्रेमभंगाची ही भिती ।
घेऊनी स्वप्ने ऊराशी
तव जीवनी मी आले
स्वप्न ते सत्य करण्या
रात्रंदीन मी एक केले ।
वाटले तुझ्या समवेत
नाही कठीण काही जगात
मिळता साथ तुझी मजला
काय आहे कठीण जगात ।
परी फसगत अशी जाहली
मम स्वप्ने ती विरुन गेली
पौर्णिमेची रात्र सुध्दा मज
अंधार जीवनी देऊन गेली ।
सुरेश काळे
मो.9860307752
सातारा
५ सप्टेंबर २०१८
September 7, 2018
June 1, 2022
जसे रंग फुलांफुलांचे
तसेच रंग मनामनांचे..
नित्य उमलुनी गंधाळावे
दरवळावे श्वास सुखाचे..
मनफुलांचे नाते आगळे
स्पर्श तयांचे मोरपीसांचे..
निर्माल्यातही सुख आगळे
जीवन हे, भाग्य भाळीचे..
जगण्याचे हे क्षण कृतार्थी
संचित सारे हे गतजन्मांचे..
-- वि.ग.सातपुते. (भावकवी )
9766544908
रचना क्र.२३७
१६ /९/२०२२
September 21, 2022
सुर्य किरणें रानभर
ऐस पैस पसरली
झाडा खाली वेडी
सावली घुटमलली
फुलून रानभर वेली
गंध फुलाचा दरवलतो
फुलपाखराचा थवा
त्यावरती भिरभीरतो
घालीत शिल
रानपाखरे गाती गाणे
मन वेडे करती
मनमोहन किलबीलणे
@ शरद शहारे
November 18, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti