उगवले होते जंगलात ते उंच माळावरी
रंग आकर्षक फुलझाडांचे मन प्रसन्न करी //
जरी होता उग्रवास तयाला मधूरता आगळी
खेचित होते सौंदर्याने फुलपांखरे जवळी //
वनराईचा पुष्कराज तो डोलत होता आनंदे
ऐकत होता मान हलवूनी कोकिळेची पदें //
वर्षा विपूल प्रकाश विपूल आणिक तो वारा
स्वच्छंदाचे भाव उमटवित वाढवी स्वैर पसारा//
कुणीतरी आला वाटसरु तो घेउन गेला त्याला
बागेमधल्या कुंडीमध्ये मान तयाचा झाला //
खतपाणी भरपूर असूनी मुंग्या किडे नव्हते
आधूनिकतेची दृष्टी ठेवूनी वाढवित त्यास होते//
डेरेदार डौलदार भरगच्च भासला तो आता
परि स्वातंत्र्याच्या जीवनाला कात्री लागून जाता //
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 16, 2017
काळ येतां वृद्धपणाचा, विरक्तींची येई भावना
निरोप घेण्या जगताचा, तयार करीत असे मना
वेड्यापरी आकर्षण होते, सर्व जगातील वस्तूंवरी
नाशवंत त्या, माहित असूनी, प्रेम करितो जीवन भरी
जीवनांतील ढळत्या वेळीं, जेव्हां वळूनी बघतो मागें
मृगजळासाठीं धावत होतो, जाणून घेण्या सुखाची अंगे
प्रयत्न केले जरी बहूत, हातीं न लागे काहीं
पूर्ण कल्पना येई मनीं, जगण्यात आंता तथ्य नाहीं
उर्वरीत आयुष्याची रेखा, मर्यादेतच आखूनी काढी
समज येतां प्रभूचे सारे, समर्पण करीत जग सोडी
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 11, 2016
बदलून गेले जीवन
अर्थ कळल्यानंतर
परिस्थितीची आली जाण
जाग आल्या नंतर ।।१।।
श्रीमंतीच्या नादानें
ऐषआरामी झालो
पैशाच्या गर्वाने
माणुसकी विसरलो ।।२।।
तारुण्यातील उर्मीने
अहंकारी बनविले
शरिरातील गुर्मीने
निर्दयी मज ठरविले ।।३।।
धंद्यामध्ये येता खोट
निराश अति झालो
गरिबीची चालतां वाट
प्रेमळ मी बनलो ।।४।।
देह बनला दुर्बल
विकार तो जडूनी
जर्जर- पिडीतां बद्दल
सहानुभूती आली मनी ।।५।।
अनुभवासारखा
शिक्षक नाहीं कुणी
शहाणा करी अनेका
परिस्थीती समजावूनी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 6, 2017
आधी मूळ धाडा
अष्ट गणेशांना
इच्छिल्या कार्याला शुभारंभ ।
आधी मूळ धाडा
बापुजी देवाला
घरच्या कार्याला हातभार ।
आधी मूळ धाडा
कार्ला गडावरी
बैसोनी अंबारी येई माते ।
आधी मूळ धाडा
सप्तश्रुंगावरी
भगवतीची स्वारी येई कार्या ।
आधी मूळ धाडा
कृष्णेला वाईच्या
मान आजोळीचा आहे तिचा ।
आधी मूळ धाडा
जेजूरी खंडेराया
बहिणीच्या कार्या पाठी उभा ।
October 11, 2018
काळे दाट रेशमी कुंतले
पाहिले ज्यांनी ते गुंतले
कोण असेल रे ती ?
दिसते छान सुंदर किती
सुंदर डोळे नजर बोलकी
गाली खळया गोड खुलती
डौलदार चालतांना टाकते
पावले एका लयीत ती
कोण असेल रे ती ?
दिसते छान सुंदर किती
पाहाण्या मन भरूनी तिला
किती बहाणे करीती वेडे ते
डोळ्यासमोरूनी जाई जेंव्हा
नजरेचे त्यांच्या पारणे फिटते
कोण असेल रे ती ?
दिसते छान सुंदर किती
-- अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
प्रकाशित - दिवाळी अंक- २०१८ -.दै.स्वतंत्र उज्वल भारत - धुळे .
January 10, 2019
एकटाच बसलो होतो, खोलीमध्यें शांत
करमणूक करीत होते, दुरदर्शन आत..१,
दूरीवरील व्यक्ती बघूनी, शब्द त्याचे ऐके
केवळ चावी फिरवितां क्षणी, दृष्य दुजे देखे...२,
जगामधली सर्व ठिकाणें, खोलीत अदृष्य तीं
साधनांचा उपयोग करीता, जाण त्याची येती....३,
वातावरण निसर्गाने, व्यापले सर्व जगी
सुक्ष्मापासूनी अनंततेचे, गुण एकाचे अंगी....४,
तेथे आहे जे येथेही, व्यापूनी सर्व स्थळी
ब्रह्माडांची व्यापकता, बिंदूत एका सगळी....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 26, 2020
चमचम चमकते नाणें दूरी वरुनी दिसले ।
चांदीचे समजूनी मन तयावर झेपावले ।।
निराशा आली पदरीं जाणतां तुकडा पत्र्याचा ।
खोटी चमक बाळगुनी फसविणे गुणधर्म तयाचा ।।
भास ही चेतना ती तर्क वाढीवी कसा ।
दिसून येई सदैव मनावर जो उमटे ठसा ।।
ठसे उमटती संस्कारांनीं बघतां भोवती सारे ।
मनावर बिंबून जाते आणि भासते तेच खरे ।।
दिसून येतो ऊर्जा वापर देह, बुद्धी वा मनीं ।
संस्काराचे बीज अंकुरते परिस्थिती बघूनी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 7, 2017
सप्तसुरांचा जसा गंधार राजा
सण दिवाळी , हा सणांचा राजा
अविवेकाची विझवीत काजळी
आनंददीप उजळीत सुखदा आली ।।१।।
स्वर्ग ! त्रैलोक्याचा जणू अवतरला
दिप नभांगणीचेच सजवीत धरेवरी
अमंगळा सारुनी महन्मंगला आली
उधळीत आनंदाला दीपावली आली ।।२।।
क्षण क्षण , अत्तरी सुगंधात नाहला
प्रीतवात्सल्ये ओवाळीली निरांजने
दारी , अंगणी रंगली सडा रांगोळी
दीवाळी ऐश्वर्यसुखदा घेऊनी आली ।।३।।
वसुबारस , धनतेरस ,नरकचतुर्दशी
पाडवा , लक्ष्मीपूजन , भाऊबीजेची
पंचूकली ! दिपावलीची आनंदघनी
परंपरंगत , सुखदा तेजोमयी आली ।।४।।
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १४१
२ - ११ - २०२१.
November 20, 2021
कळले माझे मलाच आता जगणे माझे अल्प
July 12, 2026
मद, मोह, क्रोध, वासना शरीरांतर्गत किती भावना,माणूस नावाची जादू भारते,
नेहमीच मज हे दयाघना,--!!!
लोभ मत्सर इर्ष्या नीचता, माणसातही आढळते क्रूरता,
संपून माणुसकी, वृत्ती दानवी, दाखवतो आपली बा हीनता,--!!
तरीही माणूसपण असते,
एखाद्या सज्जन हृदयात,
माणुसकीचे महत्व जाणे,
कितीही असेल संकटात,--!!!
असा सज्जन प्रेम मानतो जगातील मोठी शक्ती,
हेच प्रेम असे त्याचे,
जगण्याची विशाल उक्ती,--!!!
मुके प्राणी वृक्षलता,
सारेच त्यापुढे झुकतात,
प्रेमळ बाळकडू मिळतां,
अधिक जीवन जगतात,--!!!
याच माणसात आढळते,
परमेश्वरावर अढळ भक्ती,
तीच तारक बनते,
जीवन सुसह्य सरतेशेवटी,---!!!
करुणा भाके तो भक्त,
लीन दीन ईश्वरापुढे,
जगाच्या कल्याणाकरिता,
ज्ञानेश्वरही घालती साकडे,--!!!!
हिमगौरी कर्वे
©
January 5, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti