(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मी तेथेच असेन !

    जेव्हा तू आनंदाच्या क्षितिजी होतीस ,
    तेव्हाही मी तेथच होतो

    आज तू दुःखाच्या सागरी आहेस ,
    तेव्हाही मी तेथेच आहे !

    तू कितीही दुर्लक्षीलेस , टाळलेस तरी ,
    मी तेथेच आहे !

    तुझ्याच मनाच्या एका कोपऱ्यात ,
    तू मान्य कर कि नको ,
    पण हे तुलाही माहित आहे !

    तमा नाही केली कधी ,तुझ्या नकारा ,होकाराची ,
    मी केले फक्त प्रेम तुजवरी ,
    हे तुलाही माहित आहे !

    जगात असेन ,नसेन ,
    पण त्या 'कोपऱ्यात ' नक्की असेन ,
    हे मला आणि तुलाही माहित आहे !

    -- सु र कुलकर्णी

      June 11, 2018


  • गाथा यशाची, वैभववाडीतील सुपुत्राची…!

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मांगवली गावचे सुपुत्र श्री महेश संसारे यांच्या यशाची गाथा आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांनी आपल्या कर्तृत्वातुन कृषिक्षेत्राला प्रदान केले.

      December 12, 2017


  • चहा

    लवंग, आले दालचिनीचा
    सुगंध सारा भरून घ्यावा
    डोळे मिटूनि निवांत रेलून
    घोट चहाचा हळूच घ्यावा

    वेळ असो दुपार तीनाची
    की पहाटेचा असो गारवा
    चहास का लागे निमित्त कोणते?
    कधीही द्यावा कधीही घ्यावा

    चाहते असे चहाचे मिळता
    योग दुर्मिळ जुळून यावा
    स्थळकाळाचे बंधन सोडून
    मस्त गप्पांचा फड रंगावा

    मात्र एकट्या सांजवेळी
    घोट चहाचा हळूच घ्यावा
    पापणीतल्या सुखस्वप्नांना
    आठवणींचा गहिवर यावा...

    ---आनंद

      November 25, 2021


  • प्रियकर

     

      March 1, 2014


  • इंसान था, बदल गया

    शिकवा कैसा इंसान था, बदल गया,
    वक़्त के हर इम्तिहान में ढल गया।

    जो सच्चाई की राह पर चलता रहा,
    भीड़ की चाह में वो भी चल गया।

    जिसके लफ़्ज़ों में होती थी रोशनी,
    आज ख़ामोशी का साया बन गया।

    अपनों से ही मिली जब ठोकरें उसे,
    आईने से भी उसका चेहरा जल गया।

    शिकवा नहीं अब किसी से ऐ ज़िंदगी,
    जो था अपना वही सबसे ज़्यादा बदल गया।

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

      August 9, 2026


  • नववधू

    नववधू
    नवासाज
    लालेलाल
    रंगी आज

    खुले रंग
    मेहंदीचा
    प्रेमभाव
    हा प्रीतीचा

    हाती चुडा
    भरला गं
    येई आता
    साजण गं

    सलज्जता
    वाढलीच
    हाती हात
    गुंफलीच

    गौरवर्णी
    हातावरी
    मेहंदिची
    नक्षी खरी

    जाई आता
    सासरला
    गुंती मन
    माहेराला

    मनातुनी
    बावरली
    सख्या भेटी
    आतुरली

    मालत्यांनी
    ओटी भरा
    लेक जाई
    तिच्या घरा

    सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

      January 11, 2020


  • भास्करा दिन कालचा काळा

    भास्करा दिन कालचा काळा, प्रेमास फुलत्या तुझ्या माझ्या,
    मध्यभागात येऊन जसा,
    चंद्रमाने आणला अडथळा ,--!!!

    काही काळ दर्शना तुझ्या,
    जीव कासावीस माझा,
    कोलाहल माजतां उरां,
    नुरला कुठलाही आसरा,--!!!

    न्यारी प्रेमाची खुमारी,
    चंद्राने अशी वाढवतां,---
    स्वर्ग दोन बोटे राहिला ,
    जशी ग्रहणाची सांगता,--!!!

    मात देत सकल अंधारा,
    उगवशील माझ्या राजा,
    जरी तु होशी झाकोळतां,
    उणीव नाही तुझ्या तेजां,--!!!

    तारे वारे आणि चंद्रा,
    सांगते रे मी कितीकदा,
    सूर्यदेवाची करते पूजा,
    तो एकमेव माझा त्राता,--!!!

    चांद मध्ये असा डोकावतां,
    खळबळ तनामनां,माजतां, दिनकराच्या किरणा तरसतां,--- आधार सहस्रबाहुंचा मला,--!!!

    काय वर्णू त्याचा महिमा,
    माझ्या राजाच्या वेगळ्या थाटां,
    न कोणी धजावे लावण्यां, हाता,
    महाराणी शोभे सम्राटां,--!

    ग्रहण येवो काही अथवा,
    फिकिर नाही मजला,
    प्रियकर एवढा तेजाळतां,
    अंधाराचीही नाही तमा,--!!!

    © हिमगौरी कर्वे

      January 2, 2020


  • गतकाळ विसर

    विसरून जा भूतकाळ तो,

    नजर ठेवूनी भविष्यावरी,

    वर्तमानी राहून प्रवाही,

    जीवन सारे यशस्वी करी ।।१।।

    व्यर्थ होतील प्रयत्न तुझे,

    उगाळता गत आठवणी,

    खीळ पडेल उत्साहाते,

    अपयश आले हे जाणूनी ।।२।।

    ज्ञान जगाचे मिळूनी तुला,

    जन्म जहाला आजच खरा,

    अनुभवी नव बालक तूं,

    वाहून नेई जीवन धुरा ।।३।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      March 25, 2016


  • अनुकरण सोडा

    अनुकरण करणे हा स्वभाव

    काय मग म्हणू मी त्याला हो...।।धृ।।

    स्वतंत्र बुद्धि तुम्हां असूनी

    निर्णय शक्ति असते मनीं

    दुजाचे जीवन यश बघूनी, अनुकरण त्याचे करता हो....१,

    अनुकरण करणे हाच स्वभाव, काय मग म्हणू मी त्याला हो ...

    त्याची स्थिती वेगळी होती

    म्हणून यश पडले हातीं

    वातावरण निराळे असती

    तुम्हास सारे हे कळते हो.....२,

    अनुकरण करणे हाच स्वभाव, काय मग म्हणू मी त्याला हो ...

    यशस्वी ठरला कुणी एक

    जेव्हां केले प्रयत्न अनेक

    विसरू नका नशीब ठिक

    जे यशांत सहभागी होते हो....३,

    अनुकरण करणे हाच स्वभाव, काय मग म्हणू मी त्याला हो...

    सोडून घ्या अनुकरण ते

    निर्णय घ्या जे बुद्धी सांगते

    तुमचा आत्मा प्रभू असूनी

    त्याजवरती विश्वास करा हो.....४

    अनुकरण करणे हाच स्वभाव, काय मग म्हणू मी त्याला हो ...

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 13, 2018


  • असे दान द्यावे की

    असे दान द्यावे की,
    समोरचा अचंबित व्हावा,
    मापे भरून ओतावे,
    हात ओसंडून वहावा,
    करावे रक्तदान सारखे,
    रुग्णांसाठी ते जीवनदान,
    अन्नदानासारखे पुण्य नसते, भुकेल्याला करते तृप्त,
    विद्यादान श्रेष्ठ दान,
    सरस्वती प्रसन्न होई,
    दुसऱ्याला दिल्याने ज्ञान,
    आपुले बघा वाढत जाई
    कला दान करता आपण,
    निर्मितो एक कलाकार,
    सेवा तिची करत करत,
    जिवंत,ठेवेल कला तर ,
    अवयव दान केल्याने पण,
    एका असहाय्य वरच उठे ,
    अशा रुपे जगतो माणुस,
    पुन्हा जसे जगाया मिळे, नेत्रदानाची महती सगळी,
    डोळस होतात काही अंध,
    दुनिया बघत बघत सगळी,
    आनंदे बागडती स्वच्छंद,
    शरीर त्याचे- डोळे आपुले,
    दृग्गोचर होण्या आपली दृष्टी,
    नजर करून पुन्हा पारखी,
    वेगळीच सारी भासते सृष्टी,
    निसर्ग देतो जसे भरभरून',
    अलोट, असीम दानाचा सागर,--
    दातृत्व दाखवावे लुटून-लुटून,
    उदारतेचेच व्हावे आगर--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 24, 2019