मन हिंदोळ्यावरी !

मन माझे हिंदोळ्यावरी

बघते धरू आभाळ,

विहरते किती उंच

ठाऊक खितीज मृगजळ !

मना मनाच्या साखळ्या

गुंतता गुंती गुंता,

सोडविण्या त्या सगळ्या

हैराण जीव पुरता !

मना मनाचे द्वैत

भांडते आतल्या आत,

भांड भांडूनिया भूस

नकळे कशात अंत !

होण्या मन मोकळे

फिरे गरगरा भोवर्यावाणी,

पळे इकडून तिकडे,

मग भटके रोनोमाळी !

मन गेले बुद्धीकडे

विचाराव्या यावरील उपया,

फिरवी बुद्धी प्रेमाने

मनाच्या डोक्यावरुनी हात !

सांगतसे बुद्धी मनाला

युक्तीच्या गोष्टी चार,

शांती, तृप्ती, प्रेम, आनंद

मान मनाचा आधार !

झुलू नको हिंदोळ्यावर

सोडविण्या मनातील गुंता,

तुझ्या मनाचा लगाम

दे माझ्या हाता !

-- जगदीश पटवर्धन



मन माझे हिंदोळ्यावरी

बघते धरू आभाळ,

विहरते किती उंच

ठाऊक खितीज मृगजळ !

मना मनाच्या साखळ्या

गुंतता गुंती गुंता,

सोडविण्या त्या सगळ्या

हैराण जीव पुरता !

मना मनाचे द्वैत

भांडते आतल्या आत,

भांड भांडूनिया भूस

नकळे कशात अंत !

होण्या मन मोकळे

फिरे गरगरा भोवर्यावाणी,

पळे इकडून तिकडे,

मग भटके रोनोमाळी !

मन गेले बुद्धीकडे

विचाराव्या यावरील उपया,

फिरवी बुद्धी प्रेमाने

मनाच्या डोक्यावरुनी हात !

सांगतसे बुद्धी मनाला

युक्तीच्या गोष्टी चार,

शांती, तृप्ती, प्रेम, आनंद

मान मनाचा आधार !

झुलू नको हिंदोळ्यावर

सोडविण्या मनातील गुंता,

तुझ्या मनाचा लगाम

दे माझ्या हाता !

— जगदीश पटवर्धन

Author