उदबत्तीचा सुगंध दरवळे चोहोकडे
कोठे लपलीस तूं प्रश्न मजला पडे
मंद मंद जळते शांत तुझे जीवन
धुंद मना करिते दूर कोपरीं राहून
जळून जातेस तूं राख होऊनी सारी
तुझे आत्मसमरपण सर्वत्र सुगंध पसरी
तुझेपण वाटते क्षुल्लक दाम अति कमी
आनंदी होती अनेक जेव्हां येई तूं कामीं
लाडकी तूं भक्तांना तुजवीण पूजा नाहीं
प्रफूल्ल करुन चेतना प्रभू भाव मना येई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 3, 2019
आकाशाशी स्पर्धा करणे, हीच मातीची ओढ असे,
खालून मुळ्यांची पेरणी,
झाडाझुडपांचा पायाच असे,
वाढावे असेच उदंड,
खालून वरवर जावे,
कितीही वर गेलो तरी,
पायाला न कधी विसरावे,
गगन विस्तीर्ण भोवती,
बुंध्यातून वाढीस लागावे,
फांद्या पाने ,फुले यांनी,
खोडास सतत बिलगावे,
झाड लेकुरवाळे असते,
तरी किती निस्संग,---!!!
एक निळाई त्याच्या डोळी,
दुसरा न कुठला रंग ,--!!!
*हिरवे असून, आसमानी जाई,
अवती भोवती किती लेकरे,
सोडून सगळ्या ऐहिक गोष्टी, मोक्षाचा फक्त माग काढे*,--!!!
फांद्या, पाने, फुले सारे,
शिकती सारे झाडाकडुनी, दुसऱ्याला देऊन टाकणे,
स्वार्थ कधी नसतोच मनी,--!!!
म्हणूनच का एवढे जाते,
उंचावरती पसरत ते ,------?
कुठून आणे तटस्थ वृत्ती,
संन्यस्त अश्वत्थ बनते,--?
© हिमगौरी कर्वे.
January 2, 2020
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
May 25, 2012
June 15, 2013
व्यतिरीक्त सौंदर्याच्या पाहूण जे मी
तुझ्या प्रेमात पडाव अस तुझ्यात काहीच नव्हत …….
May 11, 2011
घक्के देऊन आली धरणीकंप करुन
भावना मनीं चमकली बनेल ही महान ।।
बालपणाची मुर्ति गोंडस तुझें भाव
तेज चेहऱ्यावरती घेती मनाचे ठाव ।।
शाळेतील जीवन दाखवी मार्ग विजयाचे
सर्वामध्यें चमकून प्रमाण मिळे यशाचे ।।
एकाग्रचित्त करुनी मिळवलेस तूं यश
प्रतिष्ठा टिकवूनी असेच जा सावकाश ।।
विजे सारखी चमकूनी झेप घे नभांत
प्रकाशमान होऊनी यशस्वी हो जीवनांत ।।
एका गोष्टीची जाण असावी तुझ्या मनीं
मिळण्यास हा मान पाठीराखे आहेत इतर कुणी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 6, 2016
देशभर देशभक्तीची लाट आली वाटतं
कुणी जवान शहीद तर झाला नाही ना!
अनोळखीचा बिल्डर नमस्कार करतोय
येत्या इलेक्शनला उभा राहणार तर नाही ना?
जास्तच जरा बोलणे गोड वाटले त्याचे
उधारबिधार नाहीतर काही काम तर नाही ना?
(कुरकुरतं .... शरीर नाही पेलवत पेग पुढचा
एकच ब्रँड सारखा बोअर झाला तर नाही ना?)
मंदिर प्रश्न पुन्हा येत आहेत चर्चेत पेपरात
निवडणुका इतक्यात येत तर नाही ना?
पोरगा मोबाईल सोडुन पुस्तकात घुसला
परीक्षा बिरीक्षा सुरु झाल्यात तर नाही ना?
~ कौशल
-- श्रीकांत पेटकर
March 1, 2019
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
गुड़ मॉर्निग, गुड़ नाईट
सर्व काही होते....
वाढदिवसाच्या शुभेच्छा ही
त्यातून देता येतात
वाटतील तेवढे पुष्पगुच्छ ही
पाठवता येतात....
अभिनंदन, स्वागत,
सर्व काही करता येते
श्रद्धांजलि द्यायला
मौन ही धरता येते....
सर्व कसे अगदी
ऑनलाइन चालते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
फेसबूक, whatsapp
आणि काय काय राव
चॅटींग मधली मजा
तुम्हाला कुठे ठाव....??
विनोद, मस्ती,
असो कि जयंती, पुण्यतिथी
पोस्टचा वर्षाव होतो
साऱ्यांच्या माथी....
शाळेत नसेल शिकवित
एवढे ज्ञान मिळते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
तसे भेटून बोलणे
होत नाही आता फारसे
तुम्ही ऑनलाइन या ना
बोलू मग खुपसे....
गेलात जवळून तर
नमस्कार ही करु नका
ऑनलाइन मात्र
हाय हॅलो विसरू नका....
थोडीशी virtual दुनियाच
आता हवी-हवीशी वाटते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
ऑनलाइन जग झाले
याची नाही खंत
माणुसकी आटत चालली
हे मना सलतं....
भावनेचा ओलावा
कोरडा झाला फ़क्त
समुहात राहुनही
एकटं एकटं वाटतं....
नुसत्या शब्दांनी
ह्रदय कुठे हलते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....!!
November 11, 2016
पर्यावरणविषयक लघुकाव्ये….
January 7, 2018
निसर्ग भगवंताचे रूप
स्पर्श दिव्य अनामिक
लाभता या स्पंदनांना
आत्मिक शांती सात्विक....
अविष्कार पंचभुतांचे
सदा सर्वदा सौख्यदायक
नक्षत्रे अलंकार सृष्टिचे
लोचनी उमले नंदनवन....
क्षण सारेच भारावलेले
स्वानुभूतिच आनंदघन
दृष्टांत, नैसर्गी लडिवाळ
मनमनांतर पावन पावन....
सृजनता ही अलौकिक
झुळझुळते तृप्त जीवन
निर्मोही, भाव परस्पर
निरंतर कृतकृत्य जीवन....
--वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.१९२
८/८/२०२२
September 11, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti