(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अस्तित्व

    "अव्यक्त"

    जे व्यक्त होतात
    ती मते
    कदाचित मनात,हृदयात
    पोहचत नसतील
    तरी ती कानावर पडली पाहिजेत,

    वाद विवाद संवाद
    कोलाहलात सुद्धा
    शोधले पाहिजेत,

    जे व्यक्त होत नाहीत
    त्यांच्या अस्तित्वाचा सुद्धा
    आदर करुयात,

    इथे फक्त माझे अस्तित्वच
    मोलाचे नाही,
    या यात्रेत
    सहवास ,सह अस्तित्व सुद्धा
    मोलाचे आहे,
    तुझ्या,माझ्या व त्यांच्या
    जगण्याचे मोल
    सदैव समजले पाहिजे.

    ~ विजय नगरकर

      September 26, 2021


  • सृष्टी गाते

    सृष्टी गाते हिरवे गाणे हिरव्या हिरव्या ओठांनी

      July 12, 2026


  • निरंजन – भाग ५८ – अवतरले रुप दिगंबर…!

    झाले प्रसन्न मातेवरी। ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर। मार्ग भक्तीचा देण्याकरिता। अवतरले रुप दिगंबर॥

      November 20, 2025


  • दोन्हीं दारीं मारामारी

    दोन्हीं दारीं मारामारी
    खानेसुमारी पानसुपारी.

    खालीवर तागडी जुळली फुगडी
    हुशारला गडी फुशारला गडी.

    आतां झाली पक्की आतां मिळेल नक्की
    लाल-दिव्याची गाडी !

    - सुभाष स. नाईक

      August 27, 2018


  • दिवस तुझे हे फुगायचॆ

    पाडगावकरानी आता 'दिवस तुझे हे फुलायचे' याचे विडंबन चाळीशी नंतर 'दिवस तुझे हे फुगायचॆ' केलयं. त्या अनाम कवीला सलाम

    दिवस तुझे हे फ़ुगायचे
    मोजून मापून जेवायचे ॥ध्रु॥
    लाडकी माझी तु राणी
    नको तु खाऊ गं लोणी
    पाण्यात लिंबाला पिळायचे
    मोजून मापून जेवायचे॥१॥
    दिवस तुझे.....
    साजुक तुपाची धार
    वाढवी calories फ़ार
    पोटात salad भरायचे
    मोजून मापून जेवायचे॥२॥
    दिवस तुझे.....
    प्रभाती फिराया जाणे
    जाताना धापा टाकणे
    दमून मटकन बसायचे
    मोजून मापून जेवायचे॥३॥
    दिवस तुझे.....
    वजन वाढते फ़ार
    सोसेना काट्याला भार
    कळेना काय ते करायचे
    मोजून मापून जेवायचे॥४॥
    दिवस तुझे .....
    आपुल्या घरच्यापाशी
    फिर तू गडे जराशी
    हालत चालत राहायचे
    मोजून मापून जेवायचे॥५॥
    दिवस तुझे .....

      May 3, 2017


  • लाटांच्या साक्षीने

    नदीच्या शांत तीरावर तू अलगद बोलली होतीस,
    लाटांच्या मंद गाण्यात एक प्रतिज्ञा ठेवली होतीस.

    संध्येच्या फिक्या उजेडात वेळ जरा थांबला होता,
    तुझ्या त्या साध्या शब्दांनी जीव माझा भरला होता.

    वारा साक्षीदार झाला, आकाशही ऐकत होतं,
    दोन मनांच्या त्या गाठीला विश्व जणू पाहत होतं.

    आज प्रवाह बदलले,
    घाटही मागे राहिले,
    पण तुझ्या त्या बोलण्याचे स्पंदन मनात राहिले.

    कधी नदीकाठ आठवला की हसू नकळत उमलतं,
    कारण तिथेच आयुष्याने एक स्वप्न हळूच जपलं होतं.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 13, 2026


  • स्वातंत्र्य

    व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली मंदाकिनी पाटील यांची हि कविता

      December 8, 2023


  • सावित्री

    क्रांतीची धगधगती ज्योत सावित्री
    ज्ञानाची मशाल सावित्री.

    म.फुलेंची साथ सावित्री
    म.फुलेंची विचार सावित्री.

    समतेची साथ सावित्री
    सर्वांचा आधार सावित्री.

    मायेची सागर सावित्री
    दीन-दलितांची माय सावित्री.

    स्त्री उद्धाराची -
    आन-बाण-शान अन् मान सावित्री

    - प्रविण भोसले
    9657897522

      January 4, 2017


  • मनप्रतिबिंब

    कविता! म्हणजे जगणेच असते
    मनाचेच बिलोरी प्रतिबिंब असते
    मनभावनांना, मुक्त व्यक्त करुनी
    जाणीवांना शब्दात माळणे असते

    अलवार, अंतरात झुळझुळणारी
    आत्मरंगी! निर्मल सरिता असते
    मांगल्यमयी, ओढ प्रीतसागराची
    भावशब्दी, पावन गंगोत्री असते

    अविस्मरणीय, आठवांचीच गाथा
    पाझरणारी तृप्त आत्मशांती असते
    मनामनांचे, हितगुज भावस्पर्शी
    शब्दभावनांचीच रिमझिम असते

    शब्द शब्द! वरदान ते भगवंताचे
    क्षणात, वेचुनी अर्पावयाचे असते
    शब्दा,शब्दात, भाव सत्यप्रीतीचे
    कवीतेत, त्या विरघळायचे असते

    भावशब्दी! लडिवाळ स्पर्श रेशमी
    सात्विक! आनंदघनी भरते असते
    कविताच, सर्वश्रेष्ठ साहित्य संपदा
    ब्रह्माण्ड! शब्दांच्याच कवेत असते

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ५७.

    २४ - २ - २०२२.

      March 11, 2022


  • या अशा सांजवेळी

    या अशा सांजवेळी,बाहुपाशी, घे जवळी,
    रात्र उतरून आली खाली,
    तुजविण जिवाची काहिली,
    हुरहुरते मन अशा समयी,
    तुझ्यासाठी,आंत तुटते काही
    जीव कांतर कांतर होई,
    आत्मा तरसे मिलनासाठी,
    लौकिक सुखे भोवताली,
    जीव कसा जळे त्यातही,
    तरसवे मज विरहाग्नी,
    तुझ्या शपथांची येतां स्मृती,
    उले काळीज माझे किती,
    तुला कल्पनाही नाही,
    प्रेमाचीच लागे कसोटी,
    ताटातुटीचीव्यथा ही,
    कोरडेपण तुझे मजसी,
    सारखे आत खात राही,
    रुक्षतेचे तुझ्या काटे सलती,
    टोच बोंच कशी कायम राही,
    वरून वरून चित्रे देखणी,
    नशीब फरांटे मारत राही,
    घायाळ तनी बंबाळ मनी,
    एकच छळे मज मूर्ती,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      April 17, 2019