(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • उदबत्ती एक आत्मसमर्पण

    उदबत्तीचा सुगंध

    दरवळे चोहोकडे,

    कोठे लपलीस तूं

    प्रश्न मजला पडे ।।१।।

    मंद मंद जळते

    शांत तुझे जीवन,

    धुंद मना करिते

    दूर कोपरीं राहून ।।२।।

    जळून जातेस तूं

    राख होऊनी सारी,

    तुझे आत्मसमर्पण

    सर्वत्र सुगंध पसरी ।।३।।

    तुझेपण वाटते क्षुल्लक

    दाम अति कमी,

    आनंदी होती अनेक

    जेव्हां येई तूं कामीं ।।४।।

    लाडकी तूं भक्तांना

    तुजवीण पूजा नाहीं,

    प्रफुल्ल करुन चेतना

    प्रभू भाव मना येई ।।५।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      March 26, 2016


  • वर्‍हाडातली गाणी – १२

    कारल्याची बी पेर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

    कारल्याची बी पेरली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

    कारल्याला कोंब येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

    कारल्याला कोंब आल हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

    कारल्याला वेल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

    कारल्याला वेल आला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

    कारल्याला फुल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

    कारल्याला फुल आले हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

    कारल्याला कारले लागू दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

    कारल्याला कारले लागले हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

    कारल्याची भाजी कर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

    कारल्याची भाजी केली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

    कारल्याची भाजी खा ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

    कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

    कारल्याचा गंज घास ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

    कारल्याचा गंज घासला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

    मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या सासऱ्याला सासऱ्याला

    मामंजी मामंजी मला मूड आल पाठवता की नाही नाही

    मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या भासऱ्याला भासऱ्याला

    दादाजी दादाजी मला मूड आल पाठवता की नाही नाही

    मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या जावेला जावेला

    जाऊबाई जाऊबाई मला मूड आल पाठवता की नाही नाही

    मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या नन्देला नन्देला

    वन्स वन्स मला मूड आल पाठवता की नाही नाही

    मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या दीराला दीराला

    भाऊजी भाऊजी मला मूड आल पाठवता की नाही नाही

    मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या नवऱ्याला नवऱ्याला

    पतीराज पतीराज मला मूड आल पाठवता की नाही नाही

    आन फणी घाल वेणी मग जा अपूल्या माहेरा माहेरा

    आणली फणी घातली वेणी भुलाबाई गेल्या माहेरा

      March 7, 2017


  • जीवन गुंता

    दोन रिळाचे दोन धागे, एकत्र ते आले
    एकमेकांत दोन्हीही, गुंफून परि गेले....१,

    गुंता झाला होता सारा, निर्मित नात्याचा
    शक्य होईल कसे आता, वेगळे होण्याचा....२,

    खेच बसता वाढत गेला, होता गुंता
    उकलून सुटणे शक्य नव्हते, त्याला आता.....३,

    दोनच पर्याय होते, त्याचे पुढती
    तुटणे वा एकत्र राहणे, ह्या जगती....४,

    वेगळे होतील दोन धागे, तुटून जाणारे
    अवशेष राहतील परि काही, जे न सुटणारे ...५,

    दोन मनांचा असाच होतो, गुंता ह्या जीवनी
    राग-लोभ प्रेमादी भावना, जाती गुंतूनी.....६

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 10, 2017


  • देह मंदीर

    शरीर एक साधन, साध्य करण्या प्रभूला,
    शुद्ध देह- मनांत आठवा त्याला ।।१।।

    व्यायाम आहार, नियमित वेळी,
    शरीर तंदुरस्त, सुदृढ ठेवी ।।२।।

    सुदृढ असता देह, करावे मनाला शांत,
    टाळत असतां मोह, न येई तो भावनेत ।।३।।

    षडरिपू हे विकार, काढा विवेकांनी,
    निर्मळ ठेवा शरीर, पवित्रता राखूनी ।।४।।

    देह आहे मंदीर, गाभारा तो मन,
    आत्मा तो ईश्वर, आनंद देई आंतून ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 7, 2015


  • शरद ऋतू

    दिसभर उकाडा हा
    कुणासही सोसवेना
    त्यावर फुंखर म्हणून का
    केशरी चंद्राच्या दुधाळ चांदण्यांची शितलता...

    आश्विन पोर्णिमेसी वाढली निरभ्रता,सवे पिठूर चांदण्यांची मोहीनी मनाला....

    अंबाबाईचा उत्सव जोडीला भुलाबाईचा जागर
    शिव-पार्वतिचा संगम...

    झाला दिवस लहान,आता होई रात्र महान
    त्या रात्रीला ओवाळण्यास
    दिपावली आली सत्वर...

    शरदाचे हे दिवस सुगीचे
    शेतकरी राजा
    सुखी शय्येवरी आरामात निजे....

    सौ.माणिक
    (रुबी)

      December 9, 2019


  • ध्यास

    अंतरी स्नेहलभाव असावा
    मनी नसावी असुया कटुता
    निर्मल मैत्रसहवास घडावा
    भक्ती प्रीतीचा छंद जडावा....

    संस्कारी अमृतात भिजावे
    हॄदयी सत्यप्रकाश पडावा
    संतत्वाच्या जळात डूंबता
    जीवनाचा सत्यार्थ कळावा....

    जन्म मानवी संचित युगांचे
    सत्कर्मी सदा जगत रहावा
    चैतन्याचा आत्माच हरिहर
    ध्यास जीवा त्याचा असावा....

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र.२८९

    ७ /११ /२०२२

      November 17, 2022


  • वादळ गतस्मृतींचे

    आठविते ते सारे आता
    स्मृतींचीही कमाल आहे
    गात्रे जरी झाली मलुल
    मन, मात्र उत्साही आहे

    अनुभवलेले जीवन सारे
    जपुन पाऊले टाकित आहे
    काय मिळाले अन हरविले
    आता विसरून गेलो आहे

    घडायाचे ते ते घडूनी गेले
    अजूनी काय घडणार आहे
    अंतरात वादळ गतस्मृतींचे
    आज मात्र घोंगावते आहे

    ललाटीच्या त्या रेषा साऱ्या
    संचिताचे भगवंती दान आहे
    आता व्हावे केवळ अंतर्मुख
    विरक्तित खरा आनंद आहे

    -- वि. ग. सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र.१४२.

    २६ - ५ - २०२२.

      June 11, 2022


  • कळसूत्री बाहुल्या

    नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे ।
    टकमक पाहात हांसत होत्या, चोहीकडे ।।१।।

    झीम्मा खेळे, फुगडी खेळे, गरगर फिरती ।
    हातवारे करुन त्या, माना डोलावती ।।२।।

    जवळ येवून गुजगोष्टी, सांगे एकमेकींना ।
    सासू नणंद यांच्या, कुलंगड्या काढतांना ।।३।।

    सुख दुःखाच्या कथा, सांगितल्या त्यांनीं ।
    कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी ।।४।।

    अज्ञानी गरीब बिचाऱ्या, जेंव्हा संकल्प करती ।
    कळसूत्री बाहुल्या त्या, दोर इतरां हातीं ।।५।।

    डॉ.भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 7, 2019


  • क्षण भाळीचे

    अस्तित्वाचा क्षणभंगुर भरोसा

      October 6, 2021


  • समाधानी अश्रू

    बांधले होते सुंदर घरटे, कौशल्य सारे एकवटूनी
    वृक्षाच्या उंच फांदिवरी, लोंबत होते झोके घेवूनी...१,

    दूर जावूनी चारा आणिते, पक्षीण आपल्या पिल्याकरिता
    जग सारे ते घरटे असूनी, स्वप्न तिचे त्यांत राहता...२,

    वादळ सुटले एके दिनी, उन्मळून पडला तो वृक्ष
    पिल्लासाठी ती गेली होती, शोधण्यासाठी आपले भक्ष्य...३

    शाबूत घरटे फांदी वरते, वृक्ष जरी तो पडला होता
    पिल्लामधली ती कुजबुज, असह्य दशेत ऐकत होता...४

    कित्त्येक वर्षीचे जीवन त्याचे, क्षणांत भूमिगत झाले
    स्थिर बघूनी पक्षी घरटे, अखेरचे ते अश्रू गळले...५

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      July 31, 2019