रे हिंद बांधवा, थांब या स्थळी
अश्रू दोन ढाळी
ती पराक्रमाची ज्योत मावळे
इथे झाशीवाली । धृ ।।
तांबे कुलवीरश्री ती
नेवाळकरांची कीर्ती,
हिंदभूध्वजा जणु जळती
मर्दानी राणी लक्ष्मीबाई
मूर्त महाकाली ।।१।।
घोड्यावर खंद्या स्वार,
हातात नंगी तरवार
खणखणा करित ती वार
गोऱ्यांची कोंडी फोडित पाडित
बीर इथे आली ।।२।।
कडकडा कडाडे बिजली,
शत्रुचि लष्करे थिजली,
मग कीर्तीरुप ती उरली,
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची
इतिश्रीच झाली ।३।।
मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर
तरु, झरे ढाळतिल नीर
या दगडा फुटतिल जिभा
कथाया कथा सकळ काळी ।!४॥।
रे हिंद बांधवा, थांब या स्थळी
अश्रू दोन ढाळी
ती पराक्रमाची ज्योत मावळे
इथे झाशीवाली ।।५।।
June 11, 2026
दुःख असे मानव निर्मित
जाणती हे सगळे
परि दुःखात शोक करिती
हे कुणा न कळे ।।१।।
आपण कर्म केलेले
आपणचि भोगतो
फळ कर्माचे आलेले
तेच आपण चाखतो ।।२।।
आहे तुजसी हे ज्ञान
माहीत सर्वाना
खंत द्यावी सोडून
नको दाखवूं भावना ।।३।।
इतरांसाठीं आहे
ती भावना उदरीं
सहानुभूती पाहे
इतर जनांचे पदरी ।।४।।
शोक भावना दाखवी
तुझ्या दुःखाची
नसतां तुज निर्दयी ठरवी
हीच भीति जनाची ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
March 10, 2014
कळेना कसे जडले रे मन
आज हरपले माझे रे भान।।धृ।।
फुलात दिसतो,मनी हसतो
क्षणात जीव उगाच
फसतो
मन अजुनही आहे रे सान
आज हरपले माझे रे भान।।१।।
घरात होतसे तुझाच भास
दिलवरा श्वासात तुझी आस
साद ऐकण्या आतुरले कान
आज हरपले माझे रे भान।।२।।
तळमळ वाढे उगाच जीवा
हळहळ दाटे मनात प्रिया
कंठात दाटूनी आले रे प्राण
आज हरपले माझे रे भान।।२।।
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
February 17, 2020
कष्ट करुनी अपार शिकवीतात
मुलांना
करुनी स्वप्नांचा चुराडा
वाढवतात मुलांना
बघतात ते स्वप्न मधुर
मुलगा त्याच्या शिकवता॑ना
किती शोभुन दिसेल मुलगा आपला
मोठ्या खुर्चीवर बसतांना
वाटतें त्यांना आधार मुलगा
आपल्या म्हातारपणाची काठी
मग हेच मुलं लावतात आपल्या
आई वडिलांना वृद्धश्रमाच्या वाटी
दुःखाच्या सागरात त्यांनां आठवतात ते क्षण
यांच्याच साठी हिंडलो आपण वनवन
अश्या विश्वास घातने तुटते त्यांचे मन
दुःखाच्या ओझ्याने आता नकोसे झाले त्यांनां जीवन
आर्त विनंती तुम्हा नका देऊ त्यांना त्रास
तेच आहेत आपल्या जीवनाचा खरा भास
द्या त्यांना प्रेम द्या त्यांना प्रेमाचा घास
तृप्त करा त्यांचे प्रेमाने मन
-- अॅड विशाखा समाधान बोरकर
पातूर ता.पातूर जी अकोला
June 21, 2019
September 2, 2013
एका टोंकावरती जातां, शांत न राही झोका तेथें
विलंब न करता क्षणाचा, जायी दुजा टोका वरती,
जीवनांतील झोके देखील, असेच सदैव फिरताती
बऱ्या वाईटातील अंतर, नेहमी चालत असती
समाधान ते मिळत नसे, जेव्हां बघता तुम्हीं भोग
त्यांत देखील निराशा येते, मनीं ठरविता जेव्हां योग
जवळपणाच्या नात्यामध्यें दुरत्वाचे अंकूर फूटते
दूर असता कुणी तरी, जवळ करावे वाटते,
संतूलन करूनी मनाचे, समत्व बुद्धी ठेवावी
टोकावरती जाण्याची भूमिका, सदैव टाळीत रहावी,
मध्य बिंदू तो साधतां, निवड न राही एकाची
स्थिरत्व येईल जीवनाचे, टोके जातां सुख दु:खाची.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 13, 2019
आज मन आनंदले,
सुखाच्याही पा--र गेले,
भंवसागरी तरणे खासे,
आता सोपे वाटले,--!!!
दुनियादारी निभावणे,
असते किती कठीण,
तरीही तावून-सुलाखणे,
सहजी कसे जमले,--!!!
मनमोर थुई थुई नाचे,
पदन्यासाची तऱ्हा वेगळी, डोळ्यातून दोन थेंब सुखाचे समस्यांची असून चलती,--!
खंबीर,धीरगंभीर राहणे,
तटस्थभूमिका निभावावी,
येऊ देत वारे--वादळे,
मात्र एक झुंज द्यावी,--!
तुझ्यापेक्षा मी सरस,
म्हणत त्यांन भिडावे,
संकटांचे सतत घोर,
जिवामुळी लावू न घ्यावे
एक दत्तगुरु पाठीराखे,
राहावे निर्धास्त लेकराने, गुरुमाऊलीच्या कुशीत सगळे,
आपुले दुःख सांगावे,--!!!
ते असतां मागे,
त्यांची जाणीव ठेवावी,
एक त्यांचे स्मरण,
सारी दुनिया विसरावी,--!!!
आनंदाच्याही डोही बुडावे,
ओलेत्याने राहावे कोरडे,
पाणी जाताना नाकी तोंडी,
दत्तगुरूंनीच फक्त वाचवावे,--!!
हिमगौरी कर्वे.©
May 18, 2019
March 8, 2022
करा सर्वस्व प्रभूसी अर्पण त्यांतच मिळेल समाधान
जीवन अग्नी पेटत राही उर्जा निघे त्याचे ठायीं
उर्जेचे होते रुपांतरण साधत असे कार्य त्यातून
भावनेचा आविष्कार देई जीवना आकार
व्यक्त करण्या भावना उर्जा लागे त्यांना
एकाग्र करा मना सोडूनी सारी भावना
एकाग्र चित्त हेच ध्यान प्रभू मिळण्याचे साधन
सारी उर्जा ध्यानांत जाई तीच प्रभूसी अर्पण होई
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 3, 2017
ती आल्यावर
बाग बहरली ,घेत उखाणे ती आल्यावर
सुरू जाहले ,नवे तराणे ती आल्यावर
मीच टाळतो,पितही नाही,पाजत नाही
सरले सारे ,जुने बहाणे ती आल्यावर
मुलगा गेला हातामधुनी माय सांगते
चालू झाले हे गाऱ्हाणे ती आल्यावर
पदरी पडले रत्न देखणे तिच्या सारखे
घरही झाले असे शहाणे,ती आल्यावर
किती जाळले सूर्याने मज ती नसताना
नभात जमले मेघ दिवाणे ती आल्यावर
मनात माझ्या गीत हरघडी नवे जन्मते
सहज बोलणे,होते गाणे,ती आल्यावर
ती आली अन सुचू लागली मला शायरी
पंख लाभलेली उड्डाणे,ती आल्यावर
© जयवंत वानखडे,कोरपना
भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५
December 19, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti