(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संकोचलेले मन

    मध्य रात्र झाली होती, सारे होते शांत ।

    रस्त्यावरती तुरळक व्यक्ती, वाटला एकांत ।।

    एक गाडी मंदिरीं थांबली, त्याच शांत वेळीं ।

    सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी ।।

    सारे होते नशिबात त्याच्या, धन संपत्तीचे सुख ।

    दिवस घालवी मग्न राहूनी, कार्ये पुढती अनेक ।।

    तर्कज्ञान तीव्र असूनी, आगळा बाह्य चेहरा ।

    परि अंर्तमन सांगत होते, सत्यास शोध जरा ।।

    केव्हां केव्हां विजय होई, सुप्त त्या विचारांचा ।

    संकोचल्या मनीं गाभारा बघे , रात्री मंदिराचा ।।

    डॉ, भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 31, 2020


  • का मागे, मागे वळून पाहशी

    विसर सर्व गतकाळां,
    उगा मना रेगांळशी,
    पुढे जाऊन, समोर पहा ,;---
    का मागे, मागे वळून पाहशी,---!!!

    मागे राहिला बालपणा,
    त्यात कशाला हुंदडशी
    चार सुखाचे थेंब दिसतां
    सारे आभाळ पुन्हा पेलशी,--!!!

    कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, सारख्या सारख्या विसरशी,
    पाहून आपल्या भूतकाळां,
    पुन्हा पुन्हा रे गहिंवरशी,--!!!

    घरात माणसांचा राबता,
    सांग आता कुठून आणशी,
    अशा अनमोल दौलतीला,
    तूच ना रे झुगारशी,--!!!?

    येता काळ तरुणपणाचा,
    तुला जाणीव नव्हती जराशी, गमावशील जर यांना,
    कसे त्यांना परत आणशी,-?

    एक एक करून सर्व तुला,
    राजा, बघ सोडून जाती,
    काळाची ही महान किमया,
    नातीगोती संपून जाती,--!!!

    आता उरला एकटेपणा,
    जो जन्माचा सोबती,
    दाबून टाक भूतकाळा,
    वर्तमानच फक्त या जगी,--!!

    हिमगौरी कर्वे. ©

      September 3, 2019


  • काळ व कार्याची सांगड

    मानव जीवन तुम्हां लाभले,
    महत् भाग्य ते समजावे
    कर्म दिधले पाठी तुमच्या,
    सद्उपयोगी यांसी करावे....१,

    जीवन रेखा मर्यादेतच,
    ठेवली असती तुमचे हातीं
    जाणीव त्याची मनीं असावी,
    कर्म कार्ये जेव्हां करिती...२,

    हाती घेतल्या कार्यामध्ये,
    एकचित्त तो प्रयत्न व्हावा
    काळ केवढा तुमचे जवळी,
    याचा विचार सतत यावा...३,

    कार्ये राहता अपूर्ण अशी,
    वेळ न उरे तुमचे हाती
    अभाव असता योजनेचा,
    अपयश ते पदरी पडती....४

    कार्य व्याप्तीची दिशा असावी,
    शक्ती साधन काळ बघूनी
    जीवन यशाचा आनंद खरा,
    लुटाल तुम्ही हे ध्या जाणूनी.....५

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 18, 2016


  • यश येईल मागे मागे

    नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे ।

    येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे ।। १

    निराशूनी जावू नकोस रागें रागें ।

    हिंमत बांधूनी जावेस आगे आगे ।। २

    विणाविस यशाची शाल धागे धागे ।

    सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे ।। ३

    सतत रहावे जीवनी जागे जागे ।

    तेव्हाच यश येत असते भागे भागे ।। ४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      August 7, 2020


  • डोळियांमध्ये किती तरंग

    डोळियांमध्ये किती *तरंग*,
    सुख-दु:खांची प्रतिबिंबे,
    समाधान,तृप्ती,हर्ष,खेद,
    आनंद,लोभ,लालस *उधाणे*,--!!

    आत्मिक भावनांचे किती रंग,
    प्रेम, भूतदया,शांती,अशी रुपे,
    बोलकी उदाहरणे कित्येक,--! कधी मात्र असती *नि:स्संग*,--!!!

    डोळे रडती, डोळे हसती, डोळ्यातूनच उमटे राग,
    अस्वस्थता जिवाची *काहिली*, *घालमेल* कधी असते उगीच,--!!

    कधी कामवासना उफाळे,
    डोळे बोलती, माणसे राक्षस, बरसात करती *संजीवने*,
    कधी सुखाची ओसंडत *रांस*,--!!!

    डोळ्यांचे असते *विश्व* निराळे,
    त्यात माणसांची *लकब* दिसे,
    सत्ता, लालसा, पैसा, दर्शवती,
    हक्क कर्तव्य अधिकार *सोहाळे*,-

    ©️ हिमगौरी कर्वे.

      April 3, 2020


  • त्यांची शाळा

    आंस लागली मजला,
    बघून याव्या त्या शाळा,
    देहू, आळंदी, परिसर,
    जाऊनी तो धुंडाळला ।।१।।

    कोठे शिकले तुकोबा,
    कसे ज्ञानोबांना ज्ञान मिळाले,
    साधन दिसले नाहीं,
    परि तेज आगळे भासले ।।२।।

    विचार झेंप बघतां,
    आचंबा आम्हां वाटतो,
    कोठून शिकले सारे,
    मनी हा प्रश्न पडतो ।।३।।

    त्यांची शाळा अतर्मनीं,
    गंगोत्री ज्ञानाची ती,
    वाहात होती बाहेरी,
    पावन करी धरती ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 31, 2017


  • सांजकेशरी

    लाभाविण ममप्रीतीत रंगुनी
    नित्य तूही अनवाणी चालली
    मीही, चाललो तुझ्या सवे
    आली सांजकेशरी नभाळी।।
    क्षणभरी, पाहु मागे वळूनी
    अंकुरल्या प्रीतकळ्या ज्यावेळी
    हसले दवबिंदु हिरव्यापर्णी
    हॄदयी, प्रीत गुंतली आपुली।।
    प्रीतफुले फुलता बाग बहरली
    जीवनी सुखदा हिंदोळी झुलली
    रमता, प्रीतीत तू भान हरपली
    चाललो, मीही तुझ्याच पाऊली।।
    विवेके, संयमे आपण जगलो
    कधी संसारी बोचलीही शब्दुली
    तरी शब्दात होती निःसीम प्रीती
    श्वासाश्वासात साथ तुझी लाभली।।
    उतरता, बघ आता सांजवेळा
    घुमते, बघ मुरलीधराची मुरली
    खुणावतो आता श्रीरंग सावळा
    स्पंदने, तुजसवे कृतार्थ जाहली।।
    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)
    9766544908
    रचना क्र. १२५.
    २९ - ४ - २०२२

      May 26, 2022


  • मातृत्वाची कन्येस जाण

    आई होवून कळले मजला, कष्ट आईचे आज खरे

    स्वानुभवे जे जाणूनी घेई, तुलना त्याची कोण करे....१

    नवूमास तू जपला उदरी, क्षणाक्षणाला देवूनी शक्ती

    बाह्य जगातून शोषून सारे, सत्व निवडूनी गर्भा देती....२

    देहावरी अघांत पडता, झेलूनी घेई सारे कांहीं

    बाळ जीवाला बसे न धोका, हीच काळजी सदैव राही....३

    संगोपन ते करिता करिता, हासत होती अर्धपोटी तू

    सूखी ठेवण्या सोशीली दु:खे, कधी न कळला उद्दात हेतू....४

    कसे फेडू मी ऋण मातेचे, ज्योत पेटवी जी जीवनाची

    अर्पियले जरी जीवन सारे, उणीव राहील उपकाराची....५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      February 5, 2020


  • संत संगती

    ललाटी ज्यांच्या जे जे लिहिले,

    संत जाणती दिव्य दृष्टीने,

    नियतीच्या ह्या हलचालींना,

    दिली जाती आवाहने ।।१।।

    जाणून घेता भविष्यवाणी,

    जीवन मार्ग हे ज्यांना कळती,

    तपशक्तीने संत महात्मे,

    योग्य मार्ग ते दाखवूनी देती ।।२।।

    कर्माने जरी भाग्य ठरते,

    सुख दुखःच्या गुंत्या भोवती,

    त्या गुंत्यातील धागा शोधूनी,

    सुसाह्य त्याचे जीवन करीती ।।३।।

    कृपा होता संत जनाची,

    चुकला-मुकला जाई ठिकाणी,

    घनदाट त्या जंगलामधली,

    पाऊलवाट ते देई दाखवूनी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      December 4, 2017


  • पाठिंबा देणारी माणसं कमवा

    पाठिंबा देणारी माणसं कमवा,
    पाठीमागे नाव ठेवणारी तर खूपच असतात…
    समोर उभं राहून खांद्यावर हात ठेवणारी माणसंच
    खरं बळ देऊन जातात.

    सावलीसारखी साथ करणारी कमीच भेटतात,
    बाकी प्रकाशात उभी राहून
    अंधारात दगड फेकणारी गर्दी असते.

    तुमच्या यशावर टाळ्या वाजवणाऱ्यांपेक्षा
    तुमच्या अपयशातही
    “मी आहे” म्हणणारी माणसं कमवा.
    नाव ठेवणारे शब्द फेकतात,
    पाठिंबा देणारे आयुष्य घडवतात.
    पहिले आवाज करतात,
    दुसरे माणूस घडवतात.

    म्हणूनच…
    लोक काय म्हणतात याकडे नाही,
    कोण सोबत उभं राहतं याकडे पाहा.
    कारण शेवटी आठवणीत राहतात तेच,
    जे पडताना हात देतात,
    नाव ठेवणारे नाही.

    * कीर्तिराज आगलावे

      July 13, 2026