१० वर्ष

१० वर्ष आईची.. पुढली
१० बाबांची.

१० दिली नवऱ्याला..

१० दिली मुलांना..
सर्वार्थाने केवळ त्यांची.

आता मात्र मुक्त हो...
ही १० स्व:तःची...

वाच, नाच, मौज कर...
हवे ते ते स्वैर कर.

पुढील १० आहेत मग
त्याच्या-आपल्या तब्येतीची...

त्या पुढील १० वानप्रस्थ...
संसारातून निवृतिची.

म्हणून म्हणते...

हीच १० वर्षे फक्त तुझी
नाहीत दुसऱ्या कुणाची
सूनेच्या संसारातही
नाक न खुपसण्यायची

आताच मस्त जगून घे
खळखळून हसून घे
प्रेमात पड स्वतःच्याच
लाड कर स्वतःचेच
स्वतःवरच रुसून घे
नवऱ्याला मार काखोटीला
जग सारे फिरुन घे

देव करो तुला मिळावी
१० वर्षे स्वैर सुखाची.

देव करो तुला कळो
महती स्वत:च्या एका क्षणाची....



१० वर्ष आईची.. पुढली
१० बाबांची.

१० दिली नवऱ्याला..

१० दिली मुलांना..
सर्वार्थाने केवळ त्यांची.

आता मात्र मुक्त हो…
ही १० स्व:तःची…

वाच, नाच, मौज कर…
हवे ते ते स्वैर कर.

पुढील १० आहेत मग
त्याच्या-आपल्या तब्येतीची…

त्या पुढील १० वानप्रस्थ…
संसारातून निवृतिची.

म्हणून म्हणते…

हीच १० वर्षे फक्त तुझी
नाहीत दुसऱ्या कुणाची
सूनेच्या संसारातही
नाक न खुपसण्यायची

आताच मस्त जगून घे
खळखळून हसून घे
प्रेमात पड स्वतःच्याच
लाड कर स्वतःचेच
स्वतःवरच रुसून घे
नवऱ्याला मार काखोटीला
जग सारे फिरुन घे

देव करो तुला मिळावी
१० वर्षे स्वैर सुखाची.

देव करो तुला कळो
महती स्वत:च्या एका क्षणाची….

Author