कुठे शोधू तुला, ध्यास लागला मनी
वाटे मजला, तू बसलास लपुनी
इंद्र धनुष्याचे रंग, आकर्षक वाटती
बघण्यात दंग, लक्ष वेधुनी घेती
ओढ्याची झुळझुळ, पडे कानावरी
ऐकून नाद मंजुळ, मना वेडे करी
फुलातील गंध, तल्लीन करी मना
होऊनी मी धुंद, विसरे सर्वाना
फळातील रस, देई मधुर स्वाद
उल्हासी मनाला, देऊनी आनंद
वाऱ्याची झुळूक, रोमांचकारी
देई देहा सुख, अल्हाद्कारी
रंग, गंध, रस, स्पर्शात, तुझ्या अस्तित्वाची जाण
तू लपलास गुणांत, तुला शोधणे कठीण
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
October 18, 2016
March 13, 2022
रामरक्षेची जागा आता Android ने घेतली,
त्या नादातच आजकालची कार्टी ऊशिरा झोपली....
माहीत नाही सीता कोण,भगवदगीता कोण,
मात्र प्रत्येक हातात Latest आय फोन....
पुस्तकाची PDF झाली,
रोज वेगळा BF
अन रोज नवी GF आली...
प्रगती होतेय सांगत
घडणारी / बिघडणारी
नवीन Online पीढ़ी आली...
अंगठे दुखतायत आता Type करून
मानसं भेटतायतं आता Skype वरुन...
पाहुण्यांना भेटणं,पत्र लीहिणं जुनं झालं आता,
काका,Plzz ज़रा तुमचा Email ID देता...
मॉर्निंग Walk कधीचाच बंद झालाय,
Android Market मध्ये Temple Run जो आलाय...
व्हर्चुअल जमान्यात लांबचे सगळे झाले 'Connected',
पण शेजारधर्म '. Totally Disconnected'...
आई वडिलांचे संस्कार सुद्धा Download केले जातील आता,
'देव देव' काय करता,पूजा करायचं पण App आलाय आता....
या 'Technology' मागे पळता पळता,
लोकांनी पळणंच बंद केलय आता....
विसरले सारे चव आईच्या भाजीची,
शुर गाथा शिवाजीची,
साथ पसरलीय सावध रहा
Latest आलेल्या 'Technology' ची...
तुळशी" ची जागा आता "Money Plant" ने
घेतलीय...!!
"काकी" ची जागा आता Aunt ने घेतलीय...!!
वडील जिवंतपणिचं"डैड" झाले,
अजुन बरचं काही आहे
आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले....??
भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis"...!!
दिवसभर मुलगा CHATTING चं करत,
नाही तर रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो...!!
दुध पाजणारी आई जिवंतपणीचं "Mummy"
झाली...!!
घरची भाकरं आता कशी आवडणार हो... ५ रु. ची Maggi
आता किती"Yummy" झाली...!!
माझा मराठी माणूसच मराठी ला विसरू लागलाय....
बघा जमल्यास विचार करुन शेअर करा व
आपली संस्कृती.लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा प्रयत्न
करा ...!!!!!!!!!
फेसबुकवरुन फिरणारी ही कविता.. कवी अज्ञात..
प्रेषक - विनय साटम
October 28, 2016
आता स्वतःसाठीही थोडेसे जगू या
आज थोडे या जगाला विसरु या
हृदयावरी या कोरलेली प्रश्नचिन्हे
आज ती हलक्या हातांनी रे पुसू या
घेत गेलो दुःख कोणाचे कुणाचे
आज अपुल्याही व्यथेला सावरु या
सोसल्या ज्या वेदनाही लपवूनी
एकमेकांना तरी त्या दाखवू या
प्रौढत्व माथी घेऊनी जे हरवले
कोवळेपण जाईचे ते भोगू या
खूप जळलो पाहुनी तम भोवती
आज थोडे चांदणेही पांघरु या
वाट ही ना संपली अजुनी तरी
काढण्या काटे पढीचे थांबू या
आयुष्य जगला का कुणी प्रश्नांविना?
समजाऊनी हे एकमेकांना; हसू या !
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
May 5, 2023
निघून जरी जाशी,---
मम आयुष्यातुनी तू ,
तरी सारखा मागे उरशी,
लपलेल्या अंत:करणी तू ,---
तीर जसा वेगे शिरतो,
घायाळ करत अचानक,
तसा तू बाण बनतो,
छेद आरपार देत,--!!!
तो जसा बंबाळ करी,
पर्वा ना त्याला कुठली,
कोण त्याला थोपवी,
न कुणी त्यावर मात करी,
तसेच तुझे घुसणे,--
मम हृदयी, आंत आंत,
कितीदा नव्याने पुन्हा जगावे मरणच पाहे अगदी वाट,--!!! मुखवटे सुखाचे घालून सगळे,
आता थकावयांस होते,-- मुखवट्यामागे काय दडले ते, कुणास काय ठाऊक असते,--? रात्रंदिन तुझे असे छळणे,
कुठवर मी आता सहावे,?
बरसात पोकळ सुखांची होता, त्यात किती कोरडे राहावे,--
तू स्वतःत नाहीस राहिला,
तितुका माझ्यात सामावला,---
दूर तरी कसे जावे,--
प्रश्न अनुत्तरीत राहिला,--!!!
हिमगौरी कर्वे ©
August 31, 2019
सतत फिरत राही, चक्र जीवनाचे
विविधता पाही , रंग आयुष्याचे ।।१
सुख दुःखाच्या भावना, उठवूनी लहरी
देह आणि मना, परिणाम करी ।।२
लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार
आनंद समाधान आशा, करी भावना साकार ।।३
जीवन विषयाचे, बनत असे वलय
रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय ।।४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 28, 2020
मिळवलेस तूं जे जे काही,
कौतूक त्याचे सारे करतील
स्तुती सुमनातील भाव जमूनी,
हृदयामधले दालन भरतील....१
उचंबळूनी जाशील जेव्हां,
बांध फुटेल नयनामधुनी
ओघळणारे अश्रू सांगतील,
भाग्य तुझे ग आले उजळूनी....२
दरवळू दे सुंगध सारा,
नभांत जातील यश तरंग
स्वर्गांमधुनी 'भावू 'बघतील
भीजव त्यांचे सारे अंग...३
(चि. वर्षा विद्यापीठांत सर्व प्रथम आल्याबद्दल)
-- डॉ. भगवान नागापूरकर
May 17, 2016
येतात तुझे आठव, गगनात काळे ढग,
उरांत फक्त पाझर,
शिवाय नुसते रौरव,--||१||
येतात तुझे आठव,
सयींची होते बरसात,
चित्तात उठे तूफांन,
मनात चालते तांडव,--||२||
येतात तुझे आठव,
प्रीतीचे हे संजीवन,
स्मृतींचे मोठे आवर्तन,
त्यांचे लागती न थांग,--||३||
येतात तुझे आठव,
सरींची त्या उधळण,
शब्दांचे पोकळ वाद,
कल्पनांचे नुसते डांव,--||४||
येतात तुझे आठव,
अश्रू असूनही शुष्क,
मन मात्र पांणथळ,
कसानुसा होई जीव,--||५||
येतात तुझे आठव,
भोवती दुःखाची पाचर,
सहवासाचे अमृतथेंब,
कधी बनती विष:कण,--||६||
येतात तुझे आठव,
प्रेमाचे निव्वळ भास,
आत्म्यात फक्त उलघाल, काट्यांची बनते शेज,--||७||
येतात तुझे आठव,
कधी येईल राघववेळ,
कुशीत तुझ्या शिरून,
संपवेन दुर्भाग्याचा खेळ,--||८||
© हिमगौरी कर्वे.
January 5, 2020
आपलं कधी असं ठरलं नव्हतं
आपण बोलताना
हा असा अमुक अमुक विषय काढू
तमक्या विषयावर तू तुझं मत मांड
हा विषय ऐनवेळीचा विषय म्हणून
घेऊया का चर्चेस
हा एक इतका महत्वाचा विषय आहे
तू तुझे विचार ऐकव
आणि मग मी माझे मत मांडते
मग तुझ्या वाट्याला एवढी वाक्ये आणि
एका वाक्यात अमके एवढेच शब्द बसण्याची मर्यादा
आपलं अस काहीच नव्हतं ठरलं
हे आज आठवलं म्हणजे मग
आताशा माझ्या लक्षात येतंय की
फक्त मीच तर बोलायचे...
मी बोलायचे आणि तू ऐकायचास
असही नाहीच म्हणू शकत मी
मी बोलायचे आणि मला तू ऐकत
असल्याचा निदान आभास तरी व्हायचाच
मी बोलायचे
काही जुन्या आठवणी निघायच्या
काही आवडती गाणी सांगायचे
मी आजूबाजूच्या
प्रत्येक गोष्टीवर बोलायचे
मला पडलेल्या स्वप्नांवर
माझ्या स्वतःच्या स्वप्नांवर
तू काय केले पाहिजेस सांगायचे
तू आज कसा छान दिसतोस हे देखील
बोलूनच सांगायचे
आपण भेटलो ना की मी बोलायचे
उधानलेल्या पावसाने
उधानलेले पाणी जणू
तसे कसेही आणि कुठेही वळायचे माझं बोलणे
आणि ...
माझ्या प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद म्हणून
तू हसायचास..
मग मीच अर्थ लावायचे या हसण्याचे
तू खळाळून हसलास की
तुला पटल किंवा तू तुझ्या हास्याच्या धबधब्यात
माझं बोलणं उडवून लावलंस
तू फक्त बुद्धासारखं पुसटस हसलास की
मला वाटायचं तुला नाही बोलायचं या विषयावर
हे असे नेमके हेच आहेत का अर्थ
असही मी विचारलंच नाही तुला कधी
पण आज ....
प्रत्येक गोष्ट बोलून का दाखवतेस?
या तुझ्या एका प्रश्नासरशी
तुझ्या अव्यक्ततेमधील व्यक्तता जाणवली
'नाहीच बोलणार मी आता'
आता हे देखील नसते बोलले तरी चाललं असतंच म्हणा
असो.....
©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
१८/०८/२०१८
August 20, 2018
बंधनातले जग आमुचे हे जरी घातले कुंपण
July 12, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti