(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माती

    माती
    *अष्टाक्षरी ओवी*
    शिर्षक
    *मृदा*

    मृदा तुझी रुपे भिन्न
    चिकण,तांबडी,छान
    पिके खुप तिथे अन्न
    माती द्यावा मान पान ।।१।।

    राबती तुझी लेकरे
    अहोरात्र सेवा करी
    खत पाणी ही देत रे
    सोनं येई घरो घरी ।।२।।

    मातीचा टिळा लाविती
    बळी राजा तुझे भुषण
    नाही उतत,मातत
    तुच त्याचे आभुषण ।।३।।

    हा सुगीच्या दिवसात
    आनंद पर्वणी खास
    चीज होता कष्टाचेच
    विसरे साऱ्या कष्टास ।।४।।

    कण न् कण मातीचा
    परिस दगड पाहे
    रुजता धान्याचा कण
    कुस उजवली आहे ।।५।।

    गुण गावे तरी किती
    तुझी महान ही किर्ती
    मनी नसे भय मुळी
    स्वप्नांची होईल पुर्ती ।।६।।

    -- सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

      January 15, 2020


  • ३ – गजानना, तव स्तवन चहुंकडे सुरूं

    गजानना, सृष्टि ही चराचर तुझेंच प्रिय लेकरू

    विश्वपसारा तुझी कृती, तव स्तवन चहुंकडे सुरूं ।।

    ‘न’ चें रक्षी द्वित्व. नारि-नर, भूचर, तरु-लतिका

    ‘ज’कार रक्षी, गजानना, जलचर अन् कृमि-कीटकां

    ‘ग’कार तव रक्षी गगनींचें प्रत्येकच पाखरूं ।।

    संथ करत तव मंत्र-पठण, गायी ‘ॐ गँ गणपती’

    नित करतो तव जप पोपट, कुक्कुट काकड-आरती

    कोकिळ-कंठा लागे सुमधुर अथर्वशीर्ष स्फुरूं ।।

    शिशूमुखातुन भाषेआधी ‘गँ’ उच्चार फुटे

    दर कंठीं निद्रेत, लयीनें ओंकारच उमटे

    नाद-अनाहत मृत्युपथीं ‘गँ गँ’ लागे बहरूं ।।

    गातें जग, तूं मातृ-पिता, सर्वस्वच गणदेवा

    मित्र-बंधु तूं, तूं विद्या , तूं ओजस ज्ञानदिवा

    ने मोक्षाप्रत, हे गजमुख पथदर्शक परमगुरू ।।

    - - -

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

      September 6, 2016


  • निसर्गाचे चक्र

    सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे

    उत्पत्ति स्थीति लय ह्या कालकृमणाचे ।।धृ।।

    एक एक पाकळी

    लहानशी कळी

    जाई उमलून

    फूल त्याचे बनून

    सुगंधी टपोरे फूल

    कांही वेळ राहील

    कोमेजून जाई

    देऊनी रुप बीजाचे

    परत अंकूरण होई

    दुजा एका झाडाचे ।।१।।

    सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे

    एक एक पाऊल

    टाकते मुल

    वाढते हसून

    बनते यौवन

    एटदार तो दहधारी

    कांही काळाची उभारी

    देह होई विलीन

    पेटवूनी दिवे वंशाचे

    होई अवतरण

    नव्या एका मानवाचे ।।२।।

    सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      November 2, 2019


  • सदैव नामस्मरण

    प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा ।

    ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा ।।

    चमत्कार दिसून आला एके दिवशी ।

    राम नामाचे ध्वनी उमटती देहापाशी ।।

    विज्ञानाने उकल केली या घटनेची ।

    खात्री करिता सत्यता पटली याची ।।

    चेतना मिळता स्वर यंत्रात ध्वनी उमटे ।

    त्याच ध्वनीच्या विद्युत लहरींनी शब्द फुटे ।।

    शब्दांचे वलय फिरती देहाभोवती ।

    शरीरासाठी तेच शब्द कवच बनती ।।

    जेव्हां होते नामस्मरण प्रभूंचे सतत ।

    शब्द ध्वनी लहरी निघत असे अविरत ।।

    हुंकार तसाची ऐकू येई देहां जवळी ।

    निद्रेमध्ये जरी असला मेंदू त्या वेळी ।।

    सदैव नामस्मरण चेतना देत राहतो ।

    रामतिर्थांच्या अनुभवांनी हेच अनुभवतो ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५९

      February 26, 2020


  • शब्दाची ठिणगी

    ठिणगी पडूनी पेटे ज्वाला,
    आकाशाला जाऊनी भिडती,
    नष्ट करूनी डोंगर जंगल,
    हा: हा: कार तो माजविती ।।१।।

    शब्दांची ही ठिणगी अशीच,
    क्रोधाचा तो वणवा पेटवी,
    मर्मघाती तो शब्द पडतां,
    अहंकार तो जागृत होई ।।२।।

    सूड वृत्तीचा जन्म होवूनी,
    वातावरण दूषीत होते,
    संघर्षाचा अग्नी पेटूनी ,
    जीवन सारे उजाड करीते ।।३।।

    कारण जरी असे क्षुल्लक,
    विनाश व्याप्ती होई भयकंर,
    केवळ तुमचे प्रेमळ शब्द,
    दुष्ट चक्र थांबवी सत्वर ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      February 8, 2016


  • जीवन परिघ

    एक परिघ ते आंखले आहे
    विधात्याने विश्वाभोवतीं
    जीवन सारे फिरत असते
    एक दिशेनें त्या वरती १

    वाहण्याची क्रिया चालली
    युगानुयुगें या जगतीं
    कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा
    एकांच परिघात सारे फिरती २

    जेंव्हां कुणीतरी थकून जाई
    दुजा उठोनी मदत करी
    जीवन मरणाची शर्यत
    जिंकण्यासाठीं तो लक्ष्य धरी ३

    मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी
    नियंत्रित कुणी करी जगाला
    परिघ सोडूनी जाण्यासाठीं
    दिसत नसे मार्ग कुणाला ४

    प्रयत्न तुमचा सदा असावा
    मध्यबिंदूकडे तो सरकण्याचा
    शक्तिरुप तेथेंच असूनी
    त्याच्यांत सामावून जाण्याचा ५

    भिती तुमच्या मनीं वसते
    कसे जाऊं त्या आंसाकडे
    तुकडे होतील या देहाचे
    जेव्हां त्या आसांत पडे ६

    सोडूनी देण्या तो सारा खेळ
    केंद्रस्थानी जाणे, मार्ग असे
    विसरुन जाता या देहाला
    प्रभू समर्पण करण्यांत असे ७

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

      August 25, 2015


  • तू ज्याचा त्याचा कर्दनकाळ,

    आमचे नितीन नांदगावकर साहेब आजवर सदैव अन्यायाशी लढा देत आले आहेत. त्यांचे कार्यकर्तृत्व मोठे आहे दिवसेंदिवस ते वाढत चालले आहे . त्यांच्यावर केलेली एक कविता----
    तू ज्याचा त्याचा कर्दनकाळ, अन्यायातला पाठीराखा,
    काय म्हणावे तुला तेजा,
    तुझ्यासम,-- या सम हा-!!!

    जनता जनार्दन भक्त होता,
    तुला पाठिंबा सकलांचा,
    दोस्त तू रंजल्या-गांजल्या,
    जुलमीना दाखवीत बडगा,--!!!

    दिप्त प्रदीप्त होशी,
    अन्याया समोर पाहुनी,
    सलाम मराठी अस्मितेला,
    विरोधात कार्यवाही करशी,--!!!

    निर्भिड निडर धच्चोट काम, जसे उधळत यावे तूफान,
    समोर कोणीही उभे न राहती
    ते पुरुषार्थाचेच काम,--!!!

    स्त्रीला संरक्षण तुझे,
    गरीब, गरजू बनती समाधानी, दुःखितांचे अश्रू पुसत,
    प्रेषित तू अंतर्यामी,--!!!

    फणसांगत वाटशी तू ,
    वरून किती काटेरी दिसतो, काळीज तुझे, गोड गरा, अनुभवणारा चक्रावतो,--!!!

    मदतीचा हात तुझा,
    चटकन पुढे येतो,
    व्यथितांना देत दिलासा,
    अत्याचारा नाहीसा करतो,-!!!

    अगतिक हतबल ते,
    तुला शोधीत येती,---
    रुपात तुझ्या मग सारे,
    प्रत्यक्ष भगवंत बघती,--!!!

    © हिमगौरी कर्वे.

      February 13, 2020


  • व्यथा

    गरिबाची लुट
    श्रीमंताला सुट
    अन्यायाची धामधुम खुप झाली .
    आता माझी सटकली....

    धान गेला; कापुस गेला
    सोयाबिननेही दगा दिला
    कवडीमोल मदतीचा
    माञ झाला गलबला.

    वागण्याची रित ही खुप झाली.
    आता माझी सटकली...........
    निर्यातीला नाही वाव
    देशी मालाचे पाडले भाव

    कर्जाच्या डोंगराखाली
    दाबला सारा गाव.
    दुजाभावाची रित ही जुनी झाली.
    आता माझी सटकली .............

    "निती" ला उभं करून
    विचाराचं मंथन झालं
    ग्रहणालाही लाजवेल
    असं "अधिग्रहण " झालं

    आता पून्हा काही राहिलं का बाकी
    कुठं नेऊन ठेवली माझ्या महाराष्ट्राची झाकी.

    * कवी प्रभाकर कुबडे ११/४/१५ नागपुर

      April 14, 2015


  • गुणांची परंपरा

    गादी चालविते माझी आई, माझ्याच आजीची

    मला वाटते परंपरा, ती चाले घराण्याची....१,

    रात्रंदिनीचे कष्ट करणे, हा तिचा स्वभाव

    प्रेमळपणे खावू घालणें, मनी तिच्या भाव....२,

    अधिकाराची नशा तिजला, शब्द तिचा कायदा

    जुमानत नाही कुणाचाही, शाब्दीक तो वायदा....३,

    प्रेमळपणा असूनी अंगी, अहंकार युक्त ती

    गुणदोषांनी भरले व्यक्तीत्व, तसेच पुढे चालती......४

    सोडून घ्या तो अहंकारी भाव, टिकवा प्रेमळपणा

    चक्रामधल्या गुणदोषातील, गुणच अंगा बाणा....५

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      November 28, 2018


  • स्वागत नववर्षाचे करत

    स्वागत नववर्षाचे करत, सुखदुःखांच्या संकल्पना, आज नवीन दिन उगवला,
    प्रार्थित अजोड नव- अरुणां,--!!!

    कल्पना सुखाच्या करत,
    दुःखांचे डोंगर मागे सोडा,
    साजरा करत आनंद,
    समर्थ होऊनी खडे रहा,--!!!

    काय दडले काळाच्या पोटात,
    तोंड उन -पावसा देण्यां,
    सिद्ध असतो हरेक माणूस,
    संकटावरती मात करण्यां,---!!!

    काय शिकवी गतकाळ,
    सुधाराव्यात आपल्या चुका, नियतीचे जे होती लक्ष्य,
    त्यांना हात द्यावा नेमका,---!!!

    कुरवाळतो आपण अहम्
    बाजूला ठेवू या थोडा,
    दृष्टी आपली संकुचित,
    मोठा दृष्टिकोन ठेवावा,--!!!

    माणुसकी आज दुर्लभ,
    स्वस्त अस्वच्छतेच्या जागा,
    परिसर काय, आपले मन,
    लख्ख करत मोकळे जगा,--!!!

    निसर्गराजाची नाही किंमत,
    माणूस दाखवत स्वार्थ,
    हेतू आपले सारे लपवत,
    उगीच स्वीकारे परमार्था,---!!!

    असती देव - वर्तमान भविष्य,
    करू त्यांची यथासांग पूजा,
    प्रेमास फक्त प्राधान्य देत,
    मनुष्यजन्म नाहीच दुजा,--!!!

    © हिमगौरी कर्वे.

      January 1, 2020