आमच्या नितीन नांदगावकर साहेबांवर केलेली एक कविता. ती वाचून विषयाचा संदर्भ आपणास लागेलच. धन्यवाद.
अन्यायाचा अंधक्कार माजतां,
एक हात पुढे येतो,--
जुलुमांच्या बुजबुजाटां,
तो इतिश्री देतो,--!!!
कुणी रडे, कुणी कळवळे,
कुणी आपल्या जिवाला खाई, अत्याचारांचे रान माजता,
कुणी एकदम हाय खाई,--!!!
असा हा:हा:कार होता,
मदतीस येईना कोणी,
वाली कोण आपुला आता,
जनता दहशत घेई,--?
जिकडेतिकडे सामान्य जनता,
धूर्त वेठीस धरती,--
लुबाडून लाखो रुपयां,
स्वप्न धुळीस मिळवती,--!!!
कुणी फसवे, कुणी लुटे,
गोड किती बोलती,
जरा कुठे संधी मिळतां,
हात मारुन पळती,--!!!
अशावेळी कोण त्राता,
जनता न्यायाला तरसे,
शिंगरे हेलपाट्याने मरती,
धावती घोडे घालून डाकां,--!!!
न्यायाला टांगून ठेवती,
पण तो आहे मर्द खरा,
हतबलता जाणून घेई,
कृतीने दाखवी सक्रियता, --!!!
रंजले गांजले दुवा देती,
आशीर्वाद हे मिळती त्याला
दुर्जना साऱ्या, शिक्षा मिळती न्यायही बघा मिळे सर्वां,--!!!
वाममार्ग ज्याने पत्करला,
त्याला तर ठोकूनच काढी,
अपार प्रेम करी जनता,
आपला आधारच मानी,--!!!
देव दिनाघरी धावला
तसाच तूही बघ धावशी,
इतरांचे ठाऊक नाही,
मज देवदूतच भासशी,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
May 20, 2019
December 11, 2013
आंस लागली मजला,
बघून याव्या त्या शाळा,
देहू, आळंदी, परिसर,
जाऊनी तो धुंडाळला ।।१।।
कोठे शिकले तुकोबा,
कसे ज्ञानोबांना ज्ञान मिळाले,
साधन दिसले नाहीं,
परि तेज आगळे भासले ।।२।।
विचार झेंप बघतां,
आचंबा आम्हां वाटतो,
कोठून शिकले सारे,
मनी हा प्रश्न पडतो ।।३।।
त्यांची शाळा अतर्मनीं,
गंगोत्री ज्ञानाची ती,
वाहात होती बाहेरी,
पावन करी धरती ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 31, 2017
काही असले नसले,
तरी आनंदातच जगावे,
काय आणले, काय न्यायचे, सर्वांनाच आहे ठांवे ,--!!!
,मी मी करत करत,
कमरेला बांधून गोष्टी,
पैसाअडका, सोने-नाणे,
सारे ठेवायाचे पाठी ,--!!!
शेतीवाडी, जमीनजुमला,
भाईबंद हक्क सांगती,
भाऊबंदकी होऊन निव्वळ,
तुटतात सगळी नाती गोती,--!!!
हे माझे ते तुझे,
कशासाठी, आपपरभाव,-?
स्वार्थ आपमतलब शेवटी,
करून दु:खी होतो मानव,--!!!
सख्खे, सख्खे न राहती, परस्परांच्या जिवांवर उठती,
आपल्या पोळीवर तूप ओढुनी, दुसऱ्यास वाईट ठरवती,-!!!
काय मिळते असे करून,
जीवनी फक्त ताण तणाव,
शरीर मन नसते धड,
दुखण्यानाही चढतो भाव,--!!!
जगण्यातलानिखळआनंद निसर्गात खूप दडला असे,
पदोपदी शिक्षण देई ,
निसर्गासारखा गुरु नसे,--!!!
प्रत्येक घटक त्याचा,
त्याग समर्पण शिकवे, माणूस राही किती अडाणी, त्याचीभाषा समजत नसे,
हिमगौरी कर्वे.©
May 30, 2019
कोजागिरीची पौर्णिमा परि, आकाश होते ढगाळलेले ।
शोधूं लागले नयन आमचे, चंद्र चांदणे कोठे लपले ।।
गाणी गावून नाचत होती, गच्चीवरली मंडळी सारी ।
आनंदाची नशा चढून मग, तल्लीन झाली आपल्याच परी ।।
मध्यरात्र ती होवून गेली, चंद्र न दिसे अजूनी कुणा ।
वायु नव्हता फिरत नभी , मेघ राहती त्याच ठिकाणा ।।
दूध आटवूनी प्रसाद घेण्या, उत्सुक होतो आम्ही सारे ।
ढगात लपल्या चंद्राला मग, क्षीरात शोधी आमची नजरे ।।
स्वादिष्ट मधूर दुग्धांमृत ते, शशिधरांच्या चांदण्यापरि ।
मेघांमध्ये तो लपला नसूनी, उतरलां होता याच क्षिरी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
September 26, 2020
किती रंग या जीवनी पहावे, कितीदा पुन्हा नव्याने जगावे,
रोज रोज नवीन ताजे,
दुःख जिवापाड सोसावे,--!!
ठरवलेले नेहमी चुकते,
विपरीत काही घडते,
अगणित अपेक्षांचे ओझे,
इवल्या हृदयाने पेलावे,-?
जे विधायक, ते दूर राहते,
नकारात्मक ते सारे घडते,
आपल्याच जिवाचा बळी
रोज नव्याने पहावे लागते,-!!
मदतीचा हात करता पुढे,
आरोपांना पेंव फुटते ,
आंधळ्या निर्जन आयुष्याला ,
रानावनीची वाट दिसते,--!!
कुणाला आपले म्हणावे,
मन एक ठरवून ठेवते,
बघता बघताअगदी सारे,
कुठेतरी बिनसलेले असते,--!!!
गैरसमजांची तुफान वादळे,
अवती भोवती घोंघावती ,
अलगद घास टिपण्या,
सभोवार तांडव करिती,-!!
शांतता करुणा प्रेम
सहकाराच्या सर्व भावना,
का हरत राहती सारख्या,--
मग जीवन कसे असावे क्षेम,-?
हिमगौरी कर्वे.©
May 29, 2019
आपल्या देशात खास करून मुंबईसारख्या शहरात हा वर्गणी गोळा करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. एखाद्या चांगल्या कार्यासाठी वर्गणी गोळा करणे चुकीचे नाही पण ती उकलणे चुकीचेच आहे. सध्याची वर्गणी गोळा करण्याची जी प्रचलित पद्धत आहे ती अत्यंत चुकीचीच आहे. खरं म्ह्णजे कोणतीही वर्गणी ही इच्छिकच असायला हवी. ज्याची जेवढी ऐपत असेल आणि ज्याला देण शक्य असेल तो देईल. वर्गणी देण्यासाठी कोणावरही दबावतंत्रचा वापर करणे चुकीचेच आहे.
February 24, 2014
May 2, 2022
सुखदुःखाचा , मी कधीच
गणिती हिशेब नाही केला
जीवा जगविता , जगविता
कधी अट्टाहास नाही केला
वेदनांतूनही शोधीता सुखा
दुश्वास कुणाचा नाही केला
सुखसमाधान, योग भाळीचे
त्याचा हव्यासही नाही केला
निर्मळी ! सहवासात लाभले
संस्कारांचे रांजण सोबतीला
आघातातही डगमगलो नाही
विवेके , सावरले मनांतराला
खेळ सारेच त्या अनामीकाचे
ना कधी विसरलो दयाघनाला
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१५२
१४ - १२ - २०२१.
December 21, 2021
ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी,
कां धाडिला राम वनीं ? कैकयीला भरत विचारी ।।धृ।।
आम्ही बंधू चौघेजण,
झालो एका पिंडातून,
कसा येईल भाव परका ?
असतां एकची जीव, चार शरीरीं
कैकयीला भरत विचारी ।।१।।
वचनपूर्ती ब्रीद ज्याचे,
आदर्श जीवन रघूवंशाचे,
कसली शंका मनांत होती ?
पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी,
कैकयीला भरत विचारी ।।२।।
सर्व जणांचे प्राण होता,
जगणे कठीण झाले आतां,
रोष कशाला घेसी त्याचे,
अकारण ते आपल्या शिरावरी ?
कैकयीला भरत विचारी ।।३।।
--डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 15, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti