June 8, 2022
कधी आठवण अशी येते
सारा जीव व्याकुळ होतो
प्रियजनाची ओढ़ अनावर
अश्रुंना अंतरी महापुर येतो
ऋणानुबंधी,जीवलगाला
बघण्या जीव आतुर होतो
वास्तवताच ती दुर्भलतेची
क्षण, अनावर कातर होतो
विज्ञान प्रतापी, गरुडपंखी
वैभवाला सहज कवेत घेतो
अंतरी मायेची ओढ़ आगळी
स्पर्शासाठी जीव तडफडतो
सांगा, कसे सावरावे मनाला
अधीर लोचनांना महापुर येतो
जगणेच केवळ हाती असते
हतबलतेला या पर्याय नसतो
कलियुगाचा हा दृष्टांत सारा
पदोपदी प्रत्ययास येत असतो
-- वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १७१
१८ - ७ - २०२२
August 14, 2022
शब्दभावनांची झाली उधळण
August 31, 2021
परवलीचाच शब्द आता
हे माझे अन तेही माझे
स्वार्थाचा हव्यास आगळा
जे आहे ते सारे माझे
खरे कुणाचे काही नसते
तसे जगणेच ठरते ओझे
प्रेमभाव एक बाजार आता
नाते एक कर्तव्याचे ओझे
सत्य केवळ श्वास क्षणाचा
अंती कळते रिक्तपण माझे
जेंव्हा होई जीव कासाविस
विसरूनी जाते तुझे माझे
********
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३०८
२७/११/२०२२
December 7, 2022
आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लीहलेल्या काही ओळी.....
भारतीय ! (१५-०८-२०१८)
नको हो माण, नको हो पैसा,
नको तो वायफळ जातीवाद,
कानी पडावी एकच गोष्ट,
भारतीय असल्याची तीक्ष्ण साद...!!
जो तो उठतो लढत बसतो,
वैयक्तिक वाद कुठेच नसतो,
सोडता ठिणगी राजकारण्यांनी,
हल्लाबोल कसा अंगी सळसळतो?!!
थोडातरी विचार करावा,
समजून उमजून निर्णय घ्यावा,
एकजात उरात आम्ही भारतीय,
अंती भारत मातेचा आदर उरावा.....!!
हे अशोकचक्रा पाहता तुझी शान,
गगनी भिडते अभिमानाने उंच मान,
हाच अहंकार प्यारा रे मजला ,
स्वीकार मानाचा मुजरा रे तुजला...!!
... श्र्वेता संकपाळ.
August 16, 2018
मित्र मैत्रिणींनो शुभ संध्या !!
दाटून आलेली सुरेख संध्या, आणि त्याच वेळी तिचं असं नदीकाठी उभं राहणं, हे तिच्या मनात भावभावनांचा कल्लोळ घेऊन येतं आणि मग "त्याची" तीव्र आठवण येऊन ती म्हणते ......….
अजून तुझिया आठवणींनी
शहारते रे शरीर मनही
अजून होतो भास तुझा, अन्
बावरले मन तुलाच पाही !!
किती लोटला काळ आता रे
भेट तुझी ती झाली नाही
या नयनांची मिटली पाखरे
सतत तुला रे शोधत राही !!
आज अचानक या वाऱ्यावर
गंध तुझा मनमोहक आला
आठवणींच्या गंधकोषीचा
रंगीत शेला गंधित झाला !!
काव्यरचना ©✍?
प्रमोद मनोहर जोशी, जळगाव
9422775554, 8830117926
कविता कॉपी राईट अंतर्गत आहे
May 5, 2021
जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा ।
दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।।
सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी ।
हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।।
आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले ।
बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।।
निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी ।
जागृत आसती प्राण तयांचे, आजच्याही क्षणी ।।
संचार त्यांच्या आत्म्याच्या , सदैव होत राही ।
ज्ञान भुकेल्या भाविकाला, चेतना ते देई ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 26, 2019
पांघरुनी , बेगडी मुखवटे..
सुन्न जगावे ! सुंदर जगती..
क्षणक्षण सारे आव्हानांचे..
जीवाचे , जगणेच कसरती..।।१।।
कोण भला अन कोण बुरा ?..
जगती , सारीच सुंदोपसुंदी..
विश्वासाचा नाहीच भरवसां..
स्वार्थापोठी ! साऱ्या संगती..।।२।।
नीती , निष्ठा , प्रीती , भक्ती..
टांगलेल्या , आता वेशीवरती..
आज निर्लज्यांची सदैव सद्दी..
स्वाहा:कार ! विध्वंसी नीती..।।३।।
कलियुगाचीच , सारी किमया..
रामराज्याविना , राज्य राक्षसी..
हत्त्या ! मानवतेची ही निर्घृणी..
विनाशी ! हीच आज संस्कृती..।।४।।
विवेकानेच , आज इथे जगावे..
स्वस्वार्था कां उगा कवटाळावे..
तन रेतीच आहे , मृत्यूच सत्य..
रिकाम्याच रे या ओंजळी अंती..।।५।।
वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ६७
१९ - ५ - २०२१
June 10, 2021
एके काळीं हवे होते,
मजलाच सारे कांहीं
आज दुजाला मिळतां
आनंद मनास होई
माझ्यातील 'मी ' पणानें
विसरलो सारे जग
तुझ्यामध्येंही ' मी ' आहे,
जाण येई कशी मग
जेंव्हा उलगडा झाला
साऱ्या मध्ये असतो 'मी'
आदर वाटू लागला,
जाणता 'अहं ब्रह्मास्मि'
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 5, 2021
सुवर्णचंपक फुलला अंगणी, त्याची शोभा उठून दिसे,पिवळी सोनेरी केशरट फुले,
फांदोफांदी मोहक जुळणी,-!
नजर ठरेना झाडावरी,
उन्हाची मजा घेते सावली , फुलांतून इवले कवडसे,
डंवरून कसे झाड फुलोरी,--!
वरचा संभार सांभाळत
चाफा, खंबीर उभा राही,
सोनसळी अभिषेक फांद्यातून मग चालू होई,--!!!
फुलां -फुलांतील दरवळ, वाऱ्यावरती मस्त सुगंध,
कोणाचाही आत्मा तृप्त,
झाड स्वतः तरी तप्त, --!!!
सोनेरी पिवळट फुले,
बहरुन उठे पाकळी पाकळी, स्वर्गीय झाड असल्याने,
राजबिंडी तऱ्हा न्यारी,--!!!
ओंजळीत पडता सोनचाफा,
स्वर्ग मज तुच्छ भासे,
इंद्र वंचित या सुखा,
भाग्य मानवाचेच सरसें,--!!!
*जो रुसेल त्याला द्यावी,
अशी गोंडस सोनफुले,
खुलेल त्याची क्षणात कळी,
अगदी तुमच्याही नकळे*,--!!!
हिमगौरी कर्वे.©
May 25, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti