सोनुले

कविता



महिला दिनाचा मुहुर्त साधुन

आली आमुच्या घरी

बार्बी डॉल हो खरी खरी

गोरे गोरे गाल नाजुक जीवणी

वाटे जणु ती परी

काळेभोर जावळ,लांब लांब बोटे

नक्की होईल कलाकार ही

मोटी झाल्यावरी

टुळु टुळु बघते, रात्री जागते

सोनुले सवय नाही ही बरी

बहिण लाडकी मनुताईची

हसुन घेते पापी तिची

मुळीच नाही रागावत ती

फ़्रॉकवर शी,शु केली तरी

प्रभा मुळे, औरंगाबाद

— प्रभा मुळे

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →