कालचक्र

दयाघनाची अगाध लीला
सारे शब्दांच्या पलिकडले
सृजनशीलतेचे अगम्य कोड़े
प्रारब्धाचे दृष्टांत आगळे...

ब्रह्मांड ! साक्षात्कार ईश्वरी
चराचर निसर्गात रंगलेले
सप्तरंगली सृष्टी मनोहर
वैविध्यतेत रूपरंग नटलेले...

असीम अंबर, अथांग सागर
नाते धरेचे चैतन्यात रमलेले
अनाकलनीय रुपे भगवंताची
अस्तित्व, देवत्वाचे रुजलेले...

तोच सार्वभौमी सत्ताधीश
सत्य अंतिम श्वासात उरलेले
तोच जगवितो अन तारितो
कालचक्र अखंडित चाललेले....

--वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908

रचना क्र.२६३

१७/१०/२०२२



दयाघनाची अगाध लीला
सारे शब्दांच्या पलिकडले
सृजनशीलतेचे अगम्य कोड़े
प्रारब्धाचे दृष्टांत आगळे…

ब्रह्मांड ! साक्षात्कार ईश्वरी
चराचर निसर्गात रंगलेले
सप्तरंगली सृष्टी मनोहर
वैविध्यतेत रूपरंग नटलेले…

असीम अंबर, अथांग सागर
नाते धरेचे चैतन्यात रमलेले
अनाकलनीय रुपे भगवंताची
अस्तित्व, देवत्वाचे रुजलेले…

तोच सार्वभौमी सत्ताधीश
सत्य अंतिम श्वासात उरलेले
तोच जगवितो अन तारितो
कालचक्र अखंडित चाललेले….

–वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908

रचना क्र.२६३

१७/१०/२०२२

Author