सुवर्णचंपक फुलला अंगणी

सुवर्णचंपक फुलला अंगणी, त्याची शोभा उठून दिसे,पिवळी सोनेरी केशरट फुले,
फांदोफांदी मोहक जुळणी,-!

नजर ठरेना झाडावरी,
उन्हाची मजा घेते सावली , ‌ फुलांतून इवले कवडसे,
डंवरून कसे झाड फुलोरी,--!

वरचा संभार सांभाळत
चाफा, खंबीर उभा राही,
सोनसळी अभिषेक फांद्यातून मग चालू होई,--!!!

फुलां -फुलांतील दरवळ, वाऱ्यावरती मस्त सुगंध,
कोणाचाही आत्मा तृप्त,
झाड स्वतः तरी तप्त, --!!!

सोनेरी पिवळट फुले,
बहरुन उठे पाकळी पाकळी, स्वर्गीय झाड असल्याने,
राजबिंडी तऱ्हा न्यारी,--!!!

ओंजळीत पडता सोनचाफा,
स्वर्ग मज तुच्छ भासे,
इंद्र वंचित या सुखा,
भाग्य मानवाचेच सरसें,--!!!

*जो रुसेल त्याला द्यावी,
अशी गोंडस सोनफुले,
खुलेल त्याची क्षणात कळी,
अगदी तुमच्याही नकळे*,--!!!

हिमगौरी कर्वे.©

सुवर्णचंपक फुलला अंगणी, त्याची शोभा उठून दिसे,पिवळी सोनेरी केशरट फुले,
फांदोफांदी मोहक जुळणी,-!

नजर ठरेना झाडावरी,
उन्हाची मजा घेते सावली , ‌ फुलांतून इवले कवडसे,
डंवरून कसे झाड फुलोरी,–!

वरचा संभार सांभाळत
चाफा, खंबीर उभा राही,
सोनसळी अभिषेक फांद्यातून मग चालू होई,–!!!

फुलां -फुलांतील दरवळ, वाऱ्यावरती मस्त सुगंध,
कोणाचाही आत्मा तृप्त,
झाड स्वतः तरी तप्त, –!!!

सोनेरी पिवळट फुले,
बहरुन उठे पाकळी पाकळी, स्वर्गीय झाड असल्याने,
राजबिंडी तऱ्हा न्यारी,–!!!

ओंजळीत पडता सोनचाफा,
स्वर्ग मज तुच्छ भासे,
इंद्र वंचित या सुखा,
भाग्य मानवाचेच सरसें,–!!!

*जो रुसेल त्याला द्यावी,
अशी गोंडस सोनफुले,
खुलेल त्याची क्षणात कळी,
अगदी तुमच्याही नकळे*,–!!!

हिमगौरी कर्वे.©

Author