(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वातावरण आयुष्याचे

    छान चाललंय सगळं आपलं,
    फक्त थोडंसं वातावरण तापलं,
    गंमतीने आयुष्याच्या नावेमधलं,
    हळूच स्मृतींच गाठोड मापलं…

    इतभर सुख गोड मानलेलं,
    पुरतं हसण्याचं मनी ठाणलेलं,
    सांगा! आडव्या-तिडव्या आयुष्याचं,
    गुपीत तरी कोणी जाणलेलं?

    झुकझुक गाडी अन् वाऱ्यासारखं ,
    आयुष्य भूरर्कन निघून गेलं,
    रेसलींगच्या या वाटेवरती,
    नेहमी भेटलं सारख्यास वारखं…

    तूं तू – मी मी करता करता,
    नात्यांचा धागा झीजुन गेला,
    आपलेपणाचा काळा शालू,
    माणुसकीने पांघरलेला……

    – श्र्वेता संकपाळ

      August 21, 2018


  • प्रतिक्रिया

    क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी ।

    तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी ।। १

    फेकतां जोराने, आदळे भिंतीवरी ।

    प्रवास परतीचा, होई तुमचे उरीं ।। २

    शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी ।

    येऊनी धडकतील, तुमचेच पाठीं ।। ३

    प्रेमाने बोलणे, सुंगध आणिते ।

    आनंदी लहरी, मनां सुखावते ।। ४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 22, 2021


  • भिकारीण

    मधूर आवाज मिळूनी, उपकार झाले तिजवर

    सुंदर गाणे गाऊनी, आनंदीत करी इतर // १

    हातपाय दुबळे होते, दृष्टी नव्हती तिजला

    कष्ट करण्या शक्ति नव्हती, कसा मिळेल घास तिला // २

    परी ती होती आनंदी, गाण्याच्या ओघांत

    उचलित होती पैसे, पडता तिच्या पदरांत // ३

    जरी झाला देह दुर्बल, जगण्याची होती आंस मनी

    मिळालेल्या आवाजाला, ऋणी समजे ती मनी // ४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 20, 2021


  • मागू तिला कसे मी ?

    मागू तिला कसे मी ?

    वृत्त :- आनंदकंद

    लगावली :- गागालगा लगागा गागालगा लगागा

    गेली निघून कोठे ,गाठू तिला कसे मी?
    घेणे जुनेपुराणे,मागू तिला कसे मी?

    राहून भेट गेली ,गर्दीत चाहत्यांच्या
    ये एकटी पहाटे,सांगू तिला कसे मी ?

    घालून पोत काळी,भेटावयास आली
    हा लागला सुगावा,भेटू तिला कसे मी ?

    चर्चा नको म्हणाली,गावात भेटल्याची
    सोडून गाव जा तू , बोलू तिला कसे मी ?

    कोमेजली फुलेही,यात्रेत घेतलेली
    वेणीत माळण्याला ,देवू तिला कसे मी ?

    रडणार ती उद्याला,माहेर सोडताना
    बोलायला तिच्याशी,भेटू तिला कसे मी ?

    © जयवंत वानखडे

      August 27, 2018


  • दुर्लक्षित गणपती

     

      September 17, 2013


  • हिरवाई – पेढ्याचा भैरोबा

    सह्यगिरीच्या डोंगररांगा
    हिरवाईने नटून बहरल्या |

    रंगबिरंगी रानफुले गोजिरी
    भाळावरती त्यांनी माळीली |

    संततधारा शिरी बरसात होत्या
    मेघातुनी अलवारश्या रेषा |

    झाकोळून गर्द रंग हा गहिरा
    घननीळ नभातच मिसळून गेला |

    वेध लागले सहस्त्ररश्मीला
    कधी पाहतो शृंगार धरेचा |

    हळूच बाजूला करुनी ढगांना
    थोपविल्या त्या झरझर धारा |

    अलगद पसरली रवी किरणेही
    सोन पाऊली धरणीवर उतरली |

    उघडून निळी आभाळाची छत्री
    प्रतिबिंब पडे नदीच्या पात्री |

    व्योमाच्या या लख्ख उजेडात
    सातारा माझा उजळुन निघाला |

    सृष्टीच्या ऐकून या काव्या
    भैरोबा पेढ्याचा हसला ||

    ?मी सदाफुली

    ©✍️संध्या प्रकाश बापट

      December 8, 2019


  • स्वप्न तारा

    सांगावीत कशी मी स्वप्ने
    मज शब्द सुचेना काही
    मौनातल्या अंधुक रेषा
    हलकेच पुसते जाई

    सांजवेळ की पहाट ही
    रात्रीस उन्हाचे कोडे
    दवबिंदूंची चांदण स्वप्ने
    अलगद टिपती झाडे

    नवीन जरी झाल्या वाटा
    जुनाच तरी वाहील वारा
    वळणावरती भेटेल तुला
    आठवणींचा अंधुक तारा...

    -- आनंद पाटणकर

      August 1, 2021


  • गळफास बोलला फांदीला

    गळफास बोलला फांदीला

    का गं ? एवढी गर्दी आज ह्या पांदीला

    आज पर्यंत कसं सारं सुनं सुनं होतं

    भेगाळल्या भुईवर काळं कुञही येत नव्हतं

    मग अाज कसा आला ह्यो ताफा

    भर उन्हाळ्यात कशा तोंडातुन वाफा

    मी ही आज तोवर पडुन होतो सांदीला

    कसा लटकलो ह्या सुकल्या फांदीला

    गळफास बोलला फांदीला............

    .........................................................

    वाळलेलं झाड बया पाखरांनी भरलं

    ज्यान त्यान इथं येऊन का मौन धरलं

    कुणीच काही बोलत नाही....

    कालपासुन ह्यो बाॅ चिपकुन बसलाय मला

    मलाही आता याचा भार तोलत नाही

    कुणी तरी याला उतरवेल असं वाटतय

    पण ह्यो लटकलाच का..? प्रश्नच पडतय

    .............................................................

    सुकलेली, पानं झडलेली फांदी

    मग गळा दाटुन लागली म्हणायला

    मला काही हे नवं नाही बाबा,

    माझ्या खालचा जवा करपुन जातो माल

    तवा असच होतं सारं, जे झालं काल

    कोण देईल उत्तरे लाखो हुंदक्यांची

    पुसलेल्या कुंकवांची कोण घेईल जबाबदारी

    किड्यामुंग्यांसारखी माणसं मरायला लागली

    यापरिस बरी असते महामारी ............

    ..........................................................

    तु काय विचारतोस ह्या फांदीला

    चल दोघं मिळुन आता विचारु

    एकदाचं नोटेवरल्या गांधीला

    सांदीला पडलेला दोर

    कुठवर असा लटकत राहणार

    बापु तुमच्याच देशात तुमचीच लेकरं

    कुठवर मरत राहणार...........

    ........................................................

    डोळ्यावरचे हात काढुन , बापु माकडांनाही हे बघु द्या

    कानांनी किंकाळ्या ऎकुन , तोडांनी काही बोलु द्या

    तुमची खादी घालणारे , बापु इथं साधी भाषा बोलतच नाही

    अन् त्यांचे जड जड शब्द , आम्हाला काही तोलतच नाही

    नाहीतर बापु या देशात माती राहिल पण शेती नाही

    अन् राहिलीच शेती तरी शेतकरी नाही....

    ..........................................................

    कवि:- शशिकांत मा. बाबर

    संपर्क :- ९१३०६२०८३४
    shashikantbabar12@gmail.com


      January 17, 2017


  • कलियुगी संस्कृती

    पांघरुनी , बेगडी मुखवटे..
    सुन्न जगावे ! सुंदर जगती..
    क्षणक्षण सारे आव्हानांचे..
    जीवाचे , जगणेच कसरती..।।१।।

    कोण भला अन कोण बुरा ?..
    जगती , सारीच सुंदोपसुंदी..
    विश्वासाचा नाहीच भरवसां..
    स्वार्थापोठी ! साऱ्या संगती..।।२।।

    नीती , निष्ठा , प्रीती , भक्ती..
    टांगलेल्या , आता वेशीवरती..
    आज निर्लज्यांची सदैव सद्दी..
    स्वाहा:कार ! विध्वंसी नीती..।।३।।

    कलियुगाचीच , सारी किमया..
    रामराज्याविना , राज्य राक्षसी..
    हत्त्या ! मानवतेची ही निर्घृणी..
    विनाशी ! हीच आज संस्कृती..।।४।।

    विवेकानेच , आज इथे जगावे..
    स्वस्वार्था कां उगा कवटाळावे..
    तन रेतीच आहे , मृत्यूच सत्य..
    रिकाम्याच रे या ओंजळी अंती..।।५।।

    वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ६७

    १९ - ५ - २०२१

      June 10, 2021


  • शेर प्रीतीचे

    बेत वारंवार – “हृदयाची व्यथा सांगिन तिला“
    पण बसे, जातां पुढे दांतखीळ प्रत्येकदा .

    मीच हेवा करितसे माझ्या मनाचा सर्वदा
    दूर सखिपासून मी, तिजजवळ तें असतें सदा .

    तव मुखा असती दिली उपमा चंद्रम्याची सखे
    तेज जर असतें तया अवसेसही तुजसारखे .

    असतीच केली तुसवें तुलना तयाची, साजणी
    पाहिला नसता कधी जर चंद्रम्यावर डाग मी .

    ठावकी मज, ओढणीची गरज कां तुज पडतसे
    जतन मागे निजहृदय अन् हृदय माझेंही असे .

    कबुल आहे, घेतलें चुंबन तुझें, झाला गुन्हा
    दे सजा, मी सिद्ध आहे चुंबना-आलिंगना .

    स्वाद ओठांचा सखीच्या चाखतो गर्दीत मी
    ती जिथें बाळास चुंबी, तेथेंच ठेवी ओठ मी .

    घायाळ नजरेनें करुन पोटिस स्मिताचें लावसी
    इजा-इलाजहि स्वत:च करणें, अजब पॉलिसी तुझी अशी .

    स्वयपाकामधि ”दगडफूल” हें नांव ऐकुनी मजाच वाटे
    सखि जरि कोमल, हृदय दगडासारखे, मज सजाच वाटे .

    तीर निशाणावर लागावा म्हणुन शिकारी मिटतो डोळा
    आतां कळलें, युवक आजचे, युवतीही कां ”मारत डोळा” .

    बरें असतें जहालें जर तुझा रुमाल मी असतो
    कधी तो स्पर्शतो ओठां, कधी हृदयाजवळ बसतो.

    सुभाष स. नाईक

      December 31, 2017