(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दुर्बल मन नको

    सारेच आहेत दुबळे

    कुणाते नसे शक्ति

    वेळ येतां दुर्बल ठरे

    जे सबळ समजती ।।१।।

    विचार मनी येतां

    दुसरा शक्तिशाली

    समजोनी जावे तेव्हां

    हार तुमची झाली ।।२।।

    मनाची सबलता

    हेच शक्तीचे मापन

    काय कामाचा देह

    दुर्बल असतां मन ।।३।।

    सुदृढ देह व मन

    यांची मिळून जोडी

    जीवनातील यश

    तुमच्या पदरीं पाडी ।।४।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 30, 2016


  • ज्याचा त्याचा विठ्ठल

    ज्याचा त्याचा विठ्ठल, अंतरीचा ध्यास,
    नजरेआड तो असे, श्वासामध्ये वास.

    विटेवरी उभा तो, म्हणती लोक सारे,
    मला भेटे एकांतात, अश्रूंच्या किनारे.

    नाही मला गजर, नाही मोठी वारी,
    शांततेच्या वाटेवर, चालतो मी भारी.

    हरपलो जेव्हा मी, सापडला तो तेव्हा,
    “मी”पण गळून गेलं, उरलो फक्त देवा.

    ज्याचा त्याचा विठ्ठल, वेगळी त्याची प्रीत,
    कोणी गातो नाम,कोणी हरवतो अंतरीत.

    दर्शनाची आस नाही, नाही काही मागणं,
    तो आहे इतकंच, झालं जीवन जागणं.

    आतल्या त्या पोकळीत, उजेड जसा लपलेला,
    तसाच माझा विठ्ठल, नि:शब्द सामावलेला.

    ज्याचा त्याचा विठ्ठल…
    शोधू नको दूर,
    डोळे मिटले की दिसतो
    अंतरीचा तो नूर.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 4, 2026


  • प्रेम – एक आठवणींची कविता पुढे चालू..

    प्रेमःएक आठवणींची कवीता चा पुढचा भाग क्रमशः

      June 3, 2011


  • दयेची दिशा

    निसर्ग नियमें दया प्रभूची, सदैव बरसत असते ।

    दयेचा तो सागर असता, कमतरता ही पडत नसते ।। १

    अज्ञानी ठरतो आम्हींच सारे, झेलून घेण्या तीच दया ।

    लक्ष्य आमचे विचलित होते, बघून भोवती फसवी माया ।। २

    उपडे धरता पात्र अंगणीं, कसे जमवाल वर्षा जल ।

    प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी, निघून जाईल वेळ ।। ३

    भरेल भांडे काठोकाठ , केवळ धरता योग्य दिशेने ।

    टिपून घ्या तुम्ही दया प्रभूची, अशीच केवळ शुद्ध मनानें ।। ४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      October 31, 2020


  • सव्वीस नोव्हेंबर

    काळ रात्र ठरे
    ही सव्वीस नोव्हेंबर
    देश रक्षण्या वीर तो मरे//१//

    होता भ्याड हल्ला
    घुसले हो अतिरेकी
    नाहक या ताजवरी डल्ला//२//

    घे बळी नाहक
    क्षण हा कर्दनकाळ
    कुठे फेडती असे पातक//३//

    ठाकले सैनिक
    मावळे हे शुर वीर
    महाराष्ट्राचे हेच पाईक
    //४//

    दोन दिस झाले
    ओलीस ठेवती सारे
    परि नच सैनिक थकले//५//

    शहीद होऊनी
    शत्रूसी पाणी पाजले
    जिंकू वा मरू ब्रीद राखले//६//

    सश्रद्ध होऊनी
    या वीरांना या शुरांना
    विनम्र श्रद्धांजली अर्पुनी//७//

    -- सौ.माणिक शुरजोशी

      November 26, 2019


  • शीर्षक – सूर्य

    तळपतो रात्रंदिन
    कण कण तप्त ज्वाला
    श्वासातही निर्मितीचा
    नवा ध्यास आहे त्याला..

    तेजःपुंज आदित्याचे
    अग्निहोत्र निशी दिन
    रूप रंग उर्जा दान
    सृष्टी नवसंजीवन...

    उगवल्या दाही दिशा
    अंधकार मिटवून...
    झळाळून सोने येते
    प्रभातीस सजवून..

    माथ्यावरी पोहचता
    शीघ्रकोपी प्रभाकर
    सांजवेळी अस्ताला तो
    शीत भासे प्रभाकर..

    नवग्रह अधिपती
    पंचतत्व व्यापकता..
    बुद्धी तेज आशीर्वाद
    वर लाभे अर्घ्य देता

    प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
    हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

    किंमत : रु.८०/-
    सवलत किंमत : रु.५०/-

      July 29, 2026


  • रंगगंधाचा सोहळा

    असा देखणा बहावा डोळे भरूनी पाहावा

      July 12, 2026


  • ईश्वरी इच्छेनेच

    वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन ।
    घटना घडल्या जीवनामध्यें, राही त्यांची आठवण ।।

    चालत असतां पाऊल वाट, जीवन रेषे वरची ।
    स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा, भावी आयुष्याची ।।

    परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें, पुरता गुरफटलो ।
    फिरणाऱ्या त्या वर्तुळातूनी, बाहेर येवूं न शकलो ।।

    कल्पिले होते नियतीनें, तेच घडविले तिनें ।
    भंग पावले स्वप्नचि सारे, तिच्याच लहरीनें ।।

    असेच घडते जीवनीं सदा, अघटीत-अवचित ।
    समजूनी त्यासी ईश्वरी इच्छा, स्वीकारी आनंदात ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 13, 2017


  • भास्करा दिन कालचा काळा

    भास्करा दिन कालचा काळा, प्रेमास फुलत्या तुझ्या माझ्या,
    मध्यभागात येऊन जसा,
    चंद्रमाने आणला अडथळा ,--!!!

    काही काळ दर्शना तुझ्या,
    जीव कासावीस माझा,
    कोलाहल माजतां उरां,
    नुरला कुठलाही आसरा,--!!!

    न्यारी प्रेमाची खुमारी,
    चंद्राने अशी वाढवतां,---
    स्वर्ग दोन बोटे राहिला ,
    जशी ग्रहणाची सांगता,--!!!

    मात देत सकल अंधारा,
    उगवशील माझ्या राजा,
    जरी तु होशी झाकोळतां,
    उणीव नाही तुझ्या तेजां,--!!!

    तारे वारे आणि चंद्रा,
    सांगते रे मी कितीकदा,
    सूर्यदेवाची करते पूजा,
    तो एकमेव माझा त्राता,--!!!

    चांद मध्ये असा डोकावतां,
    खळबळ तनामनां,माजतां, दिनकराच्या किरणा तरसतां,--- आधार सहस्रबाहुंचा मला,--!!!

    काय वर्णू त्याचा महिमा,
    माझ्या राजाच्या वेगळ्या थाटां,
    न कोणी धजावे लावण्यां, हाता,
    महाराणी शोभे सम्राटां,--!

    ग्रहण येवो काही अथवा,
    फिकिर नाही मजला,
    प्रियकर एवढा तेजाळतां,
    अंधाराचीही नाही तमा,--!!!

    © हिमगौरी कर्वे

      January 2, 2020


  • काय गंमत आहे पहा!

    आयुष्याचे कण कण क्षण साठले कुणी कोठल्या पेढीवरती
    व्याज राहो मुद्दलही होई झपाट्याने ती केवळ रिती खालती
    नसे पासबुक नसे स्टेटमेंट तुमच्या आमच्या शिलकीपोटी
    निर्वाणीची निर्वाणनोटीस येते अचानक जेव्हा हाती
    तेव्हाच उमगते (काय फायदा?) नव्हती उरली शिल्लक खाती

    -यतीन सामंत

      July 21, 2022