आणखी का …… रे?

नाव आहे गाव आहे ....आणखी का जोडणे रे ?
साम आहे दाम आहे.....आणखी का ओढणे रे ?

माणसांनी माणसाला वाटले आपापल्यापरि
जात आहे , पात आहे.....आणखी का तोडणे रे ?

राहण्याला झोपण्याला पाहिजे जागा किती तर
दोन आहे,चार पाहे......आणखी का लोढणे रे ?

केवढ्या चालीरिती ....चाली दलालांच्या असे या
शाप आहे ,पाप आहे.....आणखी का खोडणे रे ?

देवळे जास्तीच झाली आन मार्गावर नमाजहि
राम आहे,रहिम आहे......आणखी का पूजणे रे ?

#कौशल (श्रीकान्त पेटकर )

व्योमगंगा.....व्रुत्त
गालगागा गालगागा गालगागा गालगागा



नाव आहे गाव आहे ….आणखी का जोडणे रे ?
साम आहे दाम आहे…..आणखी का ओढणे रे ?

माणसांनी माणसाला वाटले आपापल्यापरि
जात आहे , पात आहे…..आणखी का तोडणे रे ?

राहण्याला झोपण्याला पाहिजे जागा किती तर
दोन आहे,चार पाहे……आणखी का लोढणे रे ?

केवढ्या चालीरिती ….चाली दलालांच्या असे या
शाप आहे ,पाप आहे…..आणखी का खोडणे रे ?

देवळे जास्तीच झाली आन मार्गावर नमाजहि
राम आहे,रहिम आहे……आणखी का पूजणे रे ?

#कौशल (श्रीकान्त पेटकर )

व्योमगंगा…..व्रुत्त
गालगागा गालगागा गालगागा गालगागा

Author