(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आत्मानंद

    जगुनीया झाले सारे काही
    आता मागणे काहीच नाही...

    कसले सुख, कसले दुःख
    संवेदना काहीच उरली नाही...

    प्रारब्ध संचिती जन्म लाभला
    भोगायचे काही राहिले नाही...

    उरलेले क्षण आनंदात जगावे
    आता कुणाला दुःखवू नाही...

    लौकिक , भौतिक नश्वर सारे
    सोबत कधीच काही येत नाही...

    आत्मानंद ! केवळ मन:शांती
    याविण दूजे सुंदर सत्य नाही...

    -- वि..सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २३४

    १४/९/२०२२

      October 12, 2022


  • झगडणारे जीवन

    गर्भामधूनी बाहेर पडतां, स्वतंत्र जीवन मिळे ।

    जीवन रस हा शोषित होती, आजवरी त्याची मुळे ।। १

    निघून गेला पदर मायेचा, डोईवरूनी त्याचा ।

    झेप घेयी तो आज एकला, पोकळीत नभाच्या ।। २

    दु:ख क्लेशाचे वार झेलले, कुणीतरी त्याचेसाठीं ।

    आज दुवा नसता सारे पडती पाठी ।। ३

    तेच रक्त परि फिरत होते, शरीरी त्याच्या सारे ।

    वंशाने जे मिळे त्याला, जीवन झगडा देणारे ।।४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      April 25, 2021


  • शृंगार वेलीवर एक वेल बहरावी

    शृंगार वेलीवर एक वेल बहरावी
    हलकेच स्पर्शात तुझ्या सांज मोहरावी
    तप्त ओठांवरी ओठ आल्हाद टेकता
    चुंबनात न्हाले दोन तन एकांत क्षणा
    मिठीत अलवार स्पर्श सोहळे सजले
    साखर चुंबनात ओठ ओठांना भिडले
    वारा ही तेव्हा अवखळ बावरा होता
    पदर वाऱ्यावर उडून लाज डोळ्यांत साठता
    केशर संध्या समयी पाऊल वाटेवर थबकले
    हात हातात अलगद नजर स्पर्श काही बोलले
    धुंद वेळ ती गंधित फुलला मोगरा तेव्हा
    ओल्या सांजवेळी केसात तिच्या रमला केवडा
    नजरेचे बहाणे नजरेच्या चालल्या खुणा
    रातराणीत गंधाळला तिच्या चुंबनाचा लाल विडा
    मलमली भाव मखमली पहाट ती जवळ येता
    चंद्र पाहतो प्रिये तुज लाजू नकोस तू आता
    -- स्वाती ठोंबरे.

      May 28, 2022


  • वाटेवरल्या वाटसरां

    वाटेवरल्या वाटसरां,
    भोवती घनगर्द सावली,
    धरती माय धरे उरापोटी,
    लेकुरे उदंड जाहली,--!!!

    वाटेवरल्या वाटसरां,
    इथे थंडगार पाणी,
    समंजस ते गावकरी,
    अन् सारी पर्यावरणप्रेमी,--!!!

    वाटेवरल्या वाटसरां,
    इथे सगळी हिरवाई,
    प्रवासीही विश्रांती घेई,
    जिथे हरतसे ऊनही,--!!!

    वाटेवरल्या वाटसरां,
    मनसोक्त ताव मारी,
    भूक लागता थोडी,
    विपुल रानमेवा वरी,--!!!

    वाटेवरल्या वाटसरां,
    निवांत या परिसरी,
    ना गोंगाट कुठला,
    ना कुठली गडबडही,--!!!

    वाटेवरल्या वाटसरां,
    प्रदूषण नाही इथे काही,
    शांत प्रशांत वातावरणी,
    निव्वळ निद्रा तू घेई,--!!!

    वाटेवरल्या वाटसरां,
    विस्तीर्ण इथे वृक्षराजी,
    पसरली कंकणाकृती,
    सकल या गावावरी,--!!!

    वाटेवरल्या वाटसरां,
    थंडगार हवा इथली,
    डोंगर पहा संरक्षणी,
    निसर्ग राजाची मेहरबानी,--!!!

    © हिमगौरी कर्वे

      December 31, 2019


  • विचार

    आपलंच मन , आपलेच "विचार" ,
    पण त्याचेही असतात अनेक प्रकार .... आजूबाजूच्या गोष्टींसारखे ...
    वेगवेगळे प्रकार समजून घेत ; त्यातली गंमत अनुभवण्यात मजा असते !!

    काही विचार “पिंपळपाना” सारखे ..
    मनाच्या पुस्तकात वर्षानुवर्षे जपून ठेवत ; त्याची जाळी करण्यात मजा असते !!

    काही विचार “फुलपाखरा” सारखे ..
    वेळीच कोषातून बाहेर काढत ; मुक्तपणे व्यक्त करण्यात मजा असते !!

    काही विचार “नो एंट्री” सारखे ..
    चुकीचं आहे याची कल्पना असूनही ; “कधीतरी” हळूच जाण्यात मजा असते !!

    काही विचार “वाळवी” सारखे ..
    मनाला पोखरून काढायच्या आत ; ताबडतोब नष्ट करण्यात मजा असते !!

    काही विचार “छोट्याश्या रोपट्या” सारखे ..
    छान खतपाणी घालून संगोपन करत ; हळूहळू फुलवण्यात मजा असते !!

    काही विचार “फुग्या” सारखे ..
    उगाच फुगवता फुगवता फाटकन फुटून ; भानावर येण्यात मजा असते !!

    काही विचार “उतू जाणाऱ्या दुधा” सारखे ..
    कितीही लक्ष ठेवलं तरी शेवटच्या क्षणी ; धावत जाऊन गॅस बंद करण्यात मजा असते !!

    काही विचार “पहाटेच्या कोंबड्या” सारखे ..
    झाकून ठेवले कितीही तरी ; शेवटी आरवण्यातच मजा असते !!

    काही विचार “पहिल्या पावसा” सारखे ..
    सोबत छत्री असूनही ; चिंब भिजण्यात मजा असते !!

    काही विचार “समुद्राच्या लाटे” सारखे ..
    आपली ईच्छा असो वा नसो ; उसळत्या प्रवाहासोबत ढकलले जाण्यात मजा असते !!

    काही विचार “चकव्या” सारखे ..
    कितीही दूर गेलो तरी ; पुन्हा पुन्हा तिथेच गुरफटण्यात मजा असते !!

    काही विचार “हिमानगा” सारखे ..
    इतरांना फक्त टोक दाखवत ; आपल्या अंतरंगात बरंच काही दडवण्यात मजा असते !!

    काही विचार “फूलटॉस बॉल” सारखे ..
    आल्या आल्या लगेचच ; चेंडू सीमापार करण्यात मजा असते !!

    काही विचार “डोंबाऱ्यांच्या खेळा” सारखे ..
    तारेवरची कसरत करत कसंबसं ; सावकाशपणे निभावून नेण्यात मजा असते !!

    काही विचार “वातकुक्कुट यंत्रा” सारखे ..
    ज्या दिशेला वारा वाहील ; त्या दिशेला भरकटण्यात मजा असते !!

    काही विचार “झाडांच्या मुळा” सारखे ..
    आली संकटं कितीही तरी न डगमगता ; ठाम ठेवण्यात मजा असते !!

    काही विचार “ऋतूं” सारखे ..
    वेगवेगळ्या परिस्थितीनुसार रंग बदलत ; निसर्गचक्र सुरळीत ठेवण्यात मजा असते !!

    काही विचार “सिग्नल” सारखे ..
    थोडं थांबून योग्य मार्ग निवडत ; पुढचा प्रवास करण्यात मजा असते !!

    काही विचार “कापरा” सारखे ..
    कितीही आपल्याच जवळ ठेवावेसे वाटले ; तरी उडून दरवळण्यात मजा असते !!

    काही विचार या “वरच्या प्रकरांच्या यादी” सारखे ..
    एकापुढे एक कितीही सुचत असले ; तरी योग्य वेळी थांबण्यात मजा असते !!

    आपलंच मन , आपलेच "विचार" ,
    पण त्याचेही असतात अनेक प्रकार .... आजूबाजूच्या गोष्टींसारखे ...
    वेगवेगळे प्रकार समजून घेत ; त्यातली गंमत अनुभवण्यात मजा असते !!

    ©️ क्षितिज दाते , ठाणे
    आवडल्यास शेअर करायला माझी काहीच हरकत नाही ..

      November 3, 2022


  • दयेची बरसात

    समर्थ नाहीं कुणी,जाणून घेण्या प्रभूला
    थोटके पडतो सारे,घेण्यास त्याच्या दयेला

    बरसत असे दया,प्रचंड त्या वेगाने
    दुर्दैवी असूनी आम्हीं,झेलतो फाटक्या झोळीने

    असीम होते कृपा,पात्र नसूनी कुणी
    तो बरसत राही सतत,परि आहे सारे अज्ञानी

    दयेच्या तो प्रवाह,वाहात राही नदीसारखा
    डूबती कांहीं त्यांत,परि न दिसे अनेकां

    नशीब लागते थोर,पेलण्यास दया ती
    जलांत असूनी कांहीं,तहानलेली राहून जाती

    शिवून तुमची झोळी,प्रथम पात्र व्हा सारे
    सदैव उघडी आहेत,कृपेची त्याची द्वारे

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      June 14, 2017


  • आशिर्वाद

    धक्के देऊन आली धरणीकंप करुन
    भावना मनीं चमकली बनेल ही महान ।।१।।

    बालपणाची मुर्ति गोंडस तुझें भाव
    तेज चेहऱ्यावरती घेती मनाचे ठाव ।।२।।

    शाळेतील जीवन दाखवी मार्ग विजयाचे
    सर्वामध्यें चमकून प्रमाण मिळे यशाचे ।।३।।

    एकाग्रचित्त करुनी मिळवलेस तूं यश
    प्रतिष्ठा टिकवूनी असेच जा सावकाश ।।४।।

    विजे सारखी चमकूनी झेप घे नभांत
    प्रकाशमान होऊनी यशस्वी हो जीवनांत ।।५।।

    एका गोष्टीची जाण असावी तुझ्या मनीं
    मिळण्यास हा मान पाठीराखे आहेत इतर कुणी ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      October 27, 2018


  • जगणें अटळ असतां

    वाट कुणाची बघतो आम्हीं, ठावूक असते ते सर्वांना
    मृत्यू हा तर अटळ असूनी, केव्हांही येई अवचित क्षणा....१,

    आगमनाचा काळ तयाचा, कल्पनेनें ठरविला जातो
    अचूक जरी ते शक्य नसले, विचार त्यावरी करिता येतो...२,

    जीवन म्हणती त्या काळाला, जगणे आले मृत्यू येई तो
    जगण्यापुढे पर्याय नसतां, सुसह्य करण्या प्रयत्न होतो...३,

    तन मनाला सुख देवूनी, जीवन काल वाढविती कांहीं
    सद्उपयोग तो केला जावा, हीच इच्छा सदैव राही...४

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      August 12, 2019


  • गझल

    गझल

    • वृत्त :- आनंदकंद

    समजून देव ज्यांना मी पूजले कितीदा
    देवून दु:ख त्यांनी मज रडवले कितीदा

    आलीच ना कधी ती भेटायला मला पण
    स्वप्नातही तिने मज झिडकारले कितीदा

    नादात मी गझलच्या समृद्ध फार झालो
    सौख्यास या अनोख्या उपभोगले कितीदा

    युद्धात सांडलेल्या रक्तास पाहताना
    जिंकूनही स्वतःला धिक्कारले कितीदा

    भेटेल ती उद्याला सोडू नकोस आशा
    या बावऱ्या मनाला समजावले कितीदा

    खाणीत कोळशाच्या नाही हिरा मिळाला
    काळेच हात झाले मी खोदले कितीदा

    देवासमान वैद्या मी मानतो तुला रे
    दुखण्यामधून मोठ्या तू तारले कितीदा

    © जयवंत वानखडे,कोरपना

      October 5, 2018


  • तन्मयतेत’ आनंद – प्रभू

    सतत गुंतलो आहो सारे
    शोध घेण्यास त्या 'आनंदाला'
    युगानूयुगे प्रयत्न होतो
    मिळवण्यासाठींच प्रभूला...१

    बाह्य जगाचे सुख आगळे
    लागले सारे त्याच्या पाठीं
    'देह सुख' अंतीम वाटे,
    खरा 'आनंद' देण्यापोटी...२

    'ज्ञानामध्ये' भरला 'आनंद'
    समजूत झाली ही कांहींना
    लेखक, कवी, साहीत्यिक हे
    पाठ त्याची कांहीं सोडीना...३,

    साधू संत हे थोर महात्मे
    आनंद शोधूती 'विश्रमांत'
    'ध्यान' लावून एक मनानें
    शांत होवूनी डूबती त्यांत...४,

    आनंदची 'मोक्ष' असून
    ध्येय साऱ्यांचे त्याजकडे
    मार्ग सर्वांचे वेगळे असून
    'तन्मयता' खेची प्रभूकडे...५

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 9, 2017