(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मिठापरी जीवन

    खारेपणा हा अंगी असतां,

    कोण खाईल केवळ मीठ,

    परि पदार्थाला चव येई,

    मिसळत असता तेच नीट ।।१।।

    जीवन सारे खडतर ते,

    भासते मिठासम मजला,

    केवळ जीवन बघता तुम्हीं,

    पेलणें अवघड सर्वाला ।।२।।

    तेच जीवन सुसह्य होई,

    ‘आनंदात’ जेंव्हां मिसळते,

    हर घडीच्या प्रसंगामध्ये,

    समाधानाचे अंकूर फुटते ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      March 17, 2016


  • मैनेचे मातृहृदय

    आम्रवनांतील शोभा बघत, भटकत होतो नदी किनारी

    मैनेची ती ओरड ऐकूनी, नजर लागली फांदीवरती...१

    एक धामण हलके हलके , घरट्याच्या त्या नजीक गेली

    पिल्लावरती नजर तिची, जीभल्या चाटीत सरसावली...२,

    मैनेच्या त्या मातृहृदयाला, पर्वा नव्हती स्वदेहाची

    जगावयाचे जर पिल्लासाठी, भीती न उरी ती मृत्यूची...३

    युक्त्या आणि चपळाईने, तुटून पडली त्या मृत्यूवरी

    रक्त बंबाळ ते केले शरीर, चोंच मारीत धामणीवरी....४

    अखेर धामण वृक्ष सोडते, जखमी होवूनी शरिराने

    पिल्लामध्ये बसूनी मैना, शांत करिते हृदय स्पंदने

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 16, 2021


  • दान दयाघनाचे

    हितगुज तुझिया मनीचे
    मी सारे ओळखून आहे
    छान मधाळ बोलतेस तूं
    मी सारे ओळखून आहे।।

    मी कां? धरु मौन आता
    बावरल्या,काळजात या
    तुझी अव्यक्त भावप्रिती
    मी आज ओळखून आहे।।

    प्रियतमे! नकोस गं लाजु
    प्रीतीच! सार्थक जन्मांचे
    एक अलौकीक सुखानंद
    त्या दयाघनाचे दान आहे।।

    -- विगसातपुते (विगसा)

    9766544908

    रचना क्र २२.

      February 1, 2022


  • सासरीं जाण्याऱ्या मुलीस उपदेश-

    कोणते दुःख तुला छळते
    अकारण कां व्यथित होते ।।धृ।।

    प्रेमळ छत्र पित्याचे असतां
    गेले जीवन तुझे बागडतां
    लाड पुरविले आईने तव
    शिकवीत असतां आनंदी भाव
    आठव सारे याच क्षणीं ते ।।१।। अकारण तूं कां व्यथित होते

    बांधून घेतां राखी हातीं
    आश्वासन तुजला मिळती
    पाठीराखा भाऊ असूनी
    येईल तुजसाठीं धावूनी
    कसली शंका मनांत येते ।।२।। अकारण तूं कां व्यथित होते

    संसार भरला सुख-दुःखानी
    घे शिरावर तुझ्याच समजूनी
    जीवन मार्गी होता बदल
    नको होऊस वेडे चंचल
    सावध असूं दे चित्र तुझे ते ।।३।। अकारण तूं कां व्यथित होते

    नाते गोते वाढवीत जावे
    सर्वामध्यें प्रेमळ व्हावे
    छत्राखालती होती आजवर
    छत्रचि बनावे तूं इतःपर
    संस्काराचे मधूर फळ येते ।।४।। अकारण तूं कां व्यथित होते

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 27, 2016


  • मैत्री

    मैत्री मैत्री असते तरी काय

    स्वार्थ आणि स्वार्थ दुसरे काय

    असली गरज कि आठवतो तो मित्र

    मिळाली मदत कि वाटतो खरा मित्र

    स्वतःला विचारा असा असावा कि नाही मित्र

    पण आपल्या मित्राला पण हव असत काहीतरी हे विसरतो मित्र

    खरच हाथ नाही दिला एकमेका तर काय कामाचा मित्र

    पण मैत्रीमध्ये असावे मात्र निर्मल मैत्री आणि मैत्री

    त्यामध्ये नसावा स्वार्थाचा लवलेश

    असो सुख का दुख ,हवी साथ जीगारीची

    अपेक्ष्यांच्या कक्षेबाहेर असावी मैत्रीची गुंफण

    गुंतावे मात्र मन आणि मन !
    -- संतोष पाटील

      April 3, 2010


  • सोड मागणी

    मागत होता प्रभूला हात जोडूनी कांही
    भक्तिभाव बघूनी त्याचे मिळत ते जाई

    एका मागून एक मिळे मागणी होता त्याची
    निराश करणे न लगे इच्छा होता भक्ताची

    जे जे बघे भोवती घेतले होते मागुनी
    कशांत दडले सुख उमज येईना मनीं

    देरे बुद्धि देवा मजला योग्य मागण्यासाठी
    समाधानी मी होईन तुझ्या कृपे पोटी

    ज्ञान झाले गंमतीचे सांगे सोड मागणे
    न मागतां मिळाले जे आनंदी केले जगणे.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८४०

      October 28, 2019


  • सुखाची मोहमाया

    तप्त लोखंडात, लपली ती आग

    दिसे लाल लाल, जाळी सर्व भाग...१,

    सुंदर फूलात, सुंगध तो छान

    अवती भवती काटे, ते कठीण...२,

    विजेची ती तार, प्रकाशी दिव्याला,

    झटका तो देई, स्पर्श होता तिला..३,

    सुखाच्या पाठीशीं, असे दुःख छाया

    न दिसे ती आम्हा, असे मोह माया...४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      October 13, 2020


  • अंधारलेल्या वाटा

    चालत होते ,चालत होते
    पुढचे काही दिसत नव्हते

    अमानुष हात बाटवत होते
    मन माझे आक्रंदत होते

    मदतीस आक्रोश करीत होते
    कुणी न माझे ऐकत होते

    नशिबाचे फेरे फिरले होते
    नर वर्चस्व मज मातीमोल करीत होते

    क्षणिक हव्यास आयुष्य लोळवित होते
    स्वप्न माझे अग्नित जळत होते

    अंधारलेल्या वाटा ठेचकाळत होते
    मी माझे जीवन संपवत होते

    -- सौ.माणिक शुरजोशी

      December 16, 2019


  • एकदा तुझी नी माझी भेट व्हावी

    एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
    व्यक्त भावनांची वेल सजावी
    एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
    डोळ्यांतल्या अश्रूंची मोट तुला कळावी
    एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
    निःशब्द साथ हळुवार वीण उलगडावी
    एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
    मनातल्या खुणांची एकजूट व्हावी
    एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
    अलगद मोहर तुझी अंतरी फुलावी
    एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
    स्पर्श मधुर तुझा मी मोहक मोहरावी
    एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
    आरक्त अंतरात तुझी आस बहरावी
    एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
    व्याकुळ लोचनात तुझी सय साठावी
    एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
    अलवार तुझ्या मिठीत मी धुंद व्हावी
    -- स्वाती ठोंबरे.

      November 10, 2021


  • अंबेस दाखवी काव्य

    पाटीवरती अंक लिहीले, बागडूं लागला आनंदाने

    पित्याचे ते लक्ष वेधण्या, हनुवटी खेची तो हातानें....१,

    प्रथमापासूनी लक्ष पित्याचे, होते अवखळपणाकडे

    अजाणपणा तो दाखवोनी, दुर्लक्ष करी तो मुलाकडे...२,

    शब्दांची ती गुंफन करूनी, कवितेचा तो संग्रह केला

    तोच संग्रह घेवून चाललो, दाखविण्या माहूरी रेणूकेला...३,

    जगदंबा ही आदी शक्ती, सारे तिजला ज्ञात असते

    अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या जाते...४,

    पाटीवरले अंक बघूनी, हृदय पित्याचे गहीवरले

    रेणूका तर जननी विश्वाची, भाव मनीचे आधीच कळले...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      August 27, 2018