बाप बाप म्हणजे काय

बाप बाप म्हणजे काय
कसा असतो ठाव नाय !

व्हते मी पाळण्यात जव्हा

देवा घरी गेला तो तव्हा !

शेजारला व्हती मैत्रीण चिऊ

तिचा बाप आणत व्हता खाऊ !

माला वाटे तिचा हेवा

मालाबी बाप हवा !

डोळे माझे पाणावलेले असत
माय कड जाय मी पुसत !

तक्रार एकच व्हती माझी , "का नाय माला बी बाप "?

कुरवाळुनी माय म्हणे
"मीच तुझी माय मीच तुझा बाप!"



बाप बाप म्हणजे काय
कसा असतो ठाव नाय !

व्हते मी पाळण्यात जव्हा

देवा घरी गेला तो तव्हा !

शेजारला व्हती मैत्रीण चिऊ

तिचा बाप आणत व्हता खाऊ !

माला वाटे तिचा हेवा

मालाबी बाप हवा !

डोळे माझे पाणावलेले असत
माय कड जाय मी पुसत !

तक्रार एकच व्हती माझी , “का नाय माला बी बाप “?

कुरवाळुनी माय म्हणे
मीच तुझी माय मीच तुझा बाप!”

Author