(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चक्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची ४१ वर्षे

    मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर नाझ हे होते. या चित्रपटाची निर्मिती एनएफडीसीच्या वतीने करण्यात आली आहे. मुंबईतील झोपडपट्टीतील जीवन संघर्ष या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे साकारला आहे. या चित्रपटात स्मिता पाटील (अम्माच्या भूमिकेत), नसिरुद्दीन शहा (लूका), कुलभूषण खरबंदा (अण्णा), अंजली पैंजणकर (चैन्ना) तसेच रोहिणी हट्टंगडी, रणजित चौधरी, सलिम घोष इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे अलका कुबलचीही या चित्रपटात भूमिका आहे. तेव्हा ती शाळकरी वयात होती.

      April 17, 2022


  • तू असा, तू कसा,

    तू असा, तू कसा,
    कोसळता धबधबा जसा,
    अखंड जलप्रवाहाची जादू,
    ओघ खळाळता जसा,---!!!
    तू असा, तू कसा,
    वावटळीचे वादळ जसा,
    दाही दिशांना कवेत घेऊ,
    पाहणारे थैमान'च जसा,
    तू असा, तू कसा,
    भडकता ज्वालामुखी संतापाचा डोंह उसळता,
    आगीचा डोंब जसा,--!!!
    तू असा, तू कसा,
    दरीइतका खोल जसा,
    आंत आंत डोकावता,
    गहिरा गहिरा गूढ जसा,
    तू असा, तू कसा,
    उंच पहाडासारखा,
    टक्कर कितीही देता,
    "निश्चल, अचल" असा,
    तू असा, तू कसा,
    "गडगडाटी" मेघासारखा,
    गर्जना करत करत,
    वावरणारा "जलद" कसा,
    तू असा तू कसा,
    कोसळणारा पाऊस जसा,
    अमृत-संजीवनी देऊन,
    भिजवून टाकणारा जसा,
    तू असा, तू कसा ,
    अथांग समुद्रासारखा,
    कधी भरती, कधी ओहोटी,
    कधी शांत प्रशांत जसा,
    तू असा, तू कसा,
    लहानबाळासमरडणारा, मित्रासारखा पण अवखळ,
    भित्रट बालक जसा,
    तू असा, तू कसा,
    कसदार नट जसा ,
    भीतीच्या बहाण्याने,
    जवळ येणारा प्रिय जसा,
    तू असा, तू कसा,
    निष्पाप निरागस बाळ जसा,
    बिनसले कितीही तरी,
    गळाभेटीने सर्वस्व जसा,---!!!!

    हिमगौरी कर्वे©

      February 4, 2019


  • भिकाऱ्याचे पुण्य

    रखरखत्या उन्हांत बसूनी,
    भीक मागतो एक भिकारी,
    जगदंबेचे नाम घेवूनी,
    भजन देवीचे सदैव करी ।।१।।

    नजीक येत्या वाटसरूंना,
    आशीर्वाद तो देत असे,
    ‘प्रभू तुमचे भले करील’
    हेच शब्द उमटत असे ।।२।।

    अन्न न घेता दिवस जाई,
    खात भाकरी एकच वेळां,
    दिवसभरीचे श्रम होऊनी,
    उपवास सदैव घडला ।।३।।

    पूर्व जन्मीच्या कर्मफळाने,
    दीनवाणी जीवन मिळाले,
    आज पुण्याच्या राशि जमवूनी,
    उद्धरू लागला इतर सगळे ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      June 17, 2019


  • दारूबंदी शब्द ऐकुनी भिऊ लागली दारू

    प्रदीप निफाडकरांची गझल

      April 17, 2010


  • राम झालो मी कधी घनश्याम झालो मी

    प्रदीप निफाडकरांची गझल

      April 17, 2010


  • त्या सांज सावल्या किरण सोनेरी

    त्या सांज सावल्या किरण सोनेरी
    एकांत मनास जाईल मोहवूनी
    कितीक आठवणींचा पसारा पसरुनी
    हरवल्या वाटा माखून धूळ वारा धुसरल्या सांजवेळी
    किरणांच्या रांगोळीचा आकाशी सजला सोहळा
    तो रवी अस्त आज अवचित झाकोळला
    निमिष क्षणभर थांबले मेघ भरलेले
    डोळ्यांत अलगद पाणी ओथंबलेले
    वळचणीस सांधले कुड कौलारु काही
    कवडसे प्रकाशले गर्त भाव वेळी
    पागोळीत थेंब पाण्याचे साचले काही
    उमळल्या आठवणी मनात काहूर दाटी
    जीव जिव्हात जिव्हारी लागला
    भाव व्याकुळ घन भरल्या मेघ धारा
    मेघांच्या रिक्त धारेत थेंब एक हरवला
    त्या क्षणी आठवणी स्तब्ध आल्हाद झाल्या
    वाटा काटेरी बोचल्या वाटेवरती
    अलगद पाऊल चालता काही
    गेले गोत आप्त लांब हरवुनी
    रंगले पान परी ओठ शुष्क ओल वेळी
    काव्यांत गूढ अनामिक व्यक्तता दाटली
    आठवणींच्या झुल्यावर एक रेघ उमटली
    निःश्वास सुटले परतून जखमा डोही
    या मनाचे त्या मनाशी गूज साधूंनी
    -- स्वाती ठोंबरे.

      March 6, 2022


  • मनप्रतिबिंब

    कविता! म्हणजे जगणेच असते
    मनाचेच बिलोरी प्रतिबिंब असते
    मनभावनांना, मुक्त व्यक्त करुनी
    जाणीवांना शब्दात माळणे असते

    अलवार, अंतरात झुळझुळणारी
    आत्मरंगी! निर्मल सरिता असते
    मांगल्यमयी, ओढ प्रीतसागराची
    भावशब्दी, पावन गंगोत्री असते

    अविस्मरणीय, आठवांचीच गाथा
    पाझरणारी तृप्त आत्मशांती असते
    मनामनांचे, हितगुज भावस्पर्शी
    शब्दभावनांचीच रिमझिम असते

    शब्द शब्द! वरदान ते भगवंताचे
    क्षणात, वेचुनी अर्पावयाचे असते
    शब्दा,शब्दात, भाव सत्यप्रीतीचे
    कवीतेत, त्या विरघळायचे असते

    भावशब्दी! लडिवाळ स्पर्श रेशमी
    सात्विक! आनंदघनी भरते असते
    कविताच, सर्वश्रेष्ठ साहित्य संपदा
    ब्रह्माण्ड! शब्दांच्याच कवेत असते

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ५७.

    २४ - २ - २०२२.

      March 11, 2022


  • दृष्टी

    व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली वैभव दळवी यांची हि कविता

      December 23, 2023


  • हे कराल का ?

    कशासाठी जगतो आपण,

    विचार तुम्हीं करतां कां ?

    मृत्यू येई तो जगावयाचे,

    हेच धोरण समजतां कां ?

    खाणे – पिणें वंश वाढविणे,

    हेच जीवन असते कां ?

    ऐष आरामी राहूनी तुम्ही,

    देहासाठी सारे, हे मानता का ?

    पाठीं लागूनी धनाच्या त्या,

    बरोबर संपत्ती न्याल कां ?

    पैसा मुलांसाठी ठेवून ही,

    शिव्या त्यांच्या चुकवाल कां ?

    सारे कळूनी वळत नसते,

    तत्व हे जाणून घ्याल कां ?

    उपयोग करूनी ज्ञानाचा,

    जीवन चांगले कराल कां ?

    सारे आहे प्रभूचे समजून,

    शांत चित्ताने जगाल कां ?

    दया क्षमा शांती हे गुण,

    अंगी आपुल्या बाणाल कां ?

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 29, 2020


  • पंढरीचा राणा – ५ : अविरत भक्त करत वारी

    अविरत भक्त करत वारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम्
    अथक जन ज़ात विठूदारीं, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।

    ऊन नि पाउस यांची नाहीं एकाला पर्वा
    ध्यास एकची लागे सर्वां - तो विठ्ठल बरवा
    भारले सारे वारकरी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।

    कठिण शेकडो मैल तुडवती मराठदेशातले
    अखंड नाचत भक्त शेकडो, कुणिही नच दमले
    देइ चैतन्य मनां पंढरी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।

    समान असती विठुमार्गावर सारे वारकरी
    कुणांशी न कोणांस करावी लागे बरोबरी
    सर्वच हर्षद-शेज़ारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।

    वारकर्‍यांच्या वसतो हृदयीं पांडुरंग सांवळा
    उभा विटेवर, हात कटीवर, तुलसीमाळ गळा
    विठूमय झाले नरनारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।

    ज़ातिपातिचें ना बंधन, ना लहानथोर इथें
    शतकांपासुन अशीच वारी पंढरिला निघते
    पाहुनी म्हणतो स्वत: हरी – ‘हॅटस् ऑऽऽफ् टु देम्’ ।।
    - - -
    हॅटस् ऑऽऽफ् टु देम् : Hats Off To Them

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
    Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

      July 6, 2016