आत्म गुरू

गुरूचा महीमा थोर I उघडूनी जीवनाचे द्वार

सांगूनी आयुष्याचे सार I मार्ग दाखविती तुम्हां १

वाटाड्या बनूनी I भटकणे थांबवूनी

मार्गासी लावूनी I ध्येय दाखवी तुम्हां २

न कळला ईश I न उमगले आयुष्य

दु:ख देती जीवन पाश I बिना गुरू मुळे ३

अंधारातील पाऊल वाट I ठेचाळण्याची शक्यता दाट

प्रकाशाचा किरण झोत I योग्य रस्ता दाखवी ४

तैसा गुरू तुमचा I पडदा फाडी अज्ञानाचा

मार्ग दाखवी जीवनाचा । आनंद मिळण्यासाठी ५

गुरूविना नाही ज्ञान I दूर करी तुमचे अज्ञान

ज्ञान ज्योत देई पेटून । तुमच्या ज्ञानदिपाची ६

ओळखावा आत्माराम I जाणावा ज्ञानराम

समजावे मनोराम I आपल्या देहातील ७

गुरू असता देहमंदिरी I कां फिरतोस दारोदारी

करावी श्रद्धा प्रभूवरी I आत्म गुरूसी जाणोनी ८

गुरू भेटणे कठीण I जाणील त्यासी कोण

जवळी तुमच्या असून I कां शोधतासी ९

तुमचा गुरू अंतर्मनी I महत्व त्याचे जानोणी

घ्यावे त्यास ओळखूनी । हेची तुमचे यश १०

जाणावे आत्मज्ञान I करावे स्वचिंतन

तोच गुरू असून । उद्धारूनी नेई ११

ज्याचा गुरू त्याचे जवळ I मग का दवडसी वेळ

शोधण्यास जाई काळ I निरर्थक १२

आयुष्य आहे थोडे I चित्त द्यावे प्रभूकडे

जीवनाचे उकलेल कोडे I त्याच्या आशिर्वादे १३

जीवनाचे मर्म I जाणावे हा धर्म

त्याचप्रमाणे करावे कर्म I आयुष्य सार्थकी होणेसी १४

गुरूसी करावे वश I समजोनी त्यास ईश

घ्यावा त्याचा उपदेश I जीवनाचा १५

एकदा अंतर गुरू लाभता I उपदेश त्याचा मिळता

मार्गदर्शन सतत होता I तुमच्या जीवनाचे १६

श्रेष्ठ गुरू अंतरीचा I परि विवेक पाहीजे मनाचा

सराव करावा एकाग्रतेचा I उपदेश त्याचा घेण्या १७

अंतरज्ञान मिळे कठीण I करावे लागते बहुत चिंतन

श्रद्धा प्रभूवर ठेवून I ध्यान करावे १८

एकाग्रतेचे चिंतन I लागता प्रभूध्यान

विचार रहीत करावे मन I प्रकाश पडेल अंतरमनी १९

आंतरमनातील प्रकाश I चेतना देईल सावकाश

आनंदी करील आयुष्य I गुरू बनोनी तुमचा २०

रोज करावे ध्यान I मनी एकाग्र भाव आणून

जाता बाह्य जगाला विसरून I नियमाने २१

योगाचे आसते सामर्थ्य I जीवनाचा दाखवी अर्थ

न जाई प्रयत्न व्यर्थ I विश्वास ठेवावा प्रभूवर २२

गुरू तुमच्या अंतरी I शोधता त्यासी बाहेरी

हिच शोकांतिका खरी I तुमच्या जीवनाची २३

सारे जीवन वाया जाई I जीवन तत्व ध्यानी न येई

पश्चातापूनी उपयोग नाही I शेवटचे क्षणी २४

चार दिवसांचे जीवन I सार्थकी लागावे म्हणून

पाया त्याचा आत्मज्ञान I समजोनी घ्यावा २५

संशय मनी न यावा I ध्यानयोग सिद्ध करावा

तोच आपुला गुरू समजावा । अंतरात्मा २६

गुरू नसतो कुणी व्यक्ती I अंतर्मनातील ती शक्ती

आत्मा त्यास संबोधती । विद्वान जन २७

जागृत अंतरात्मा । तोच होय परमात्मा

श्रम न येई कामा । शोधता देहाबाहेरी २८

तुमचा गुरू तुमचेपाशी । परी तुम्ही वाट चुकलासी

जाणोनी घ्यावे गुरूसी । आत्मचिंतनाने २९

प्रत्येक ती व्यक्ती । तिच्यातील सुप्त शक्ती

सूचना देत असती । जिवन मार्गाच्या ३०

जागृती आसवे चित्ती । चेतवावी सुप्त शक्ती

मार्ग तयांना दिसती । ज्ञान प्रकाशाने ३१

एकाग्र ज्याचे मन । न होत चुका त्याचे कडून

संसार सागर जाय पोहून, केव्हांही ३२

असावा आत्मविश्वास । मिळेल त्यासी यश

मदत करी ईश । तयांना

आत्मबल महान । मार्ग त्यासी दिसून

यश करी संपादून । जीवनाचे ३४

इच्छा तेथे मार्ग असती । अंतरगुरू मार्ग दाखविती

श्रद्धा ठेवावी त्याचे वरती । ध्येय गाठण्यासाठी ३५

आपण चुका करिती । दोष प्रभूसी देती

नशीबास नावे ठेवती । अज्ञानामुळे ३६

निर्णयाचे बहूत क्षण । सुख - दु:खे त्यावरी अवलंबून

जीवन होई कठीण । चूक तुमची घडता ३७

चूक होते विचारांची । परिस्थिती जाणण्याची

चाहूल न येती संकटाची । तुम्हांसी ३८

भावना आणि विचार । यांची मर्यादा असणार

नियती तिला न कळणार । हाच आहे निसर्ग ३९

आपण जगतो विचाराने । आपल्यातील भावनेने

परंतु जगावे आत्मज्ञानाने । हाच यशाचा मार्ग ४०

आत्म्याचे सामर्थ्य श्रेष्ठ । त्यास कळे इष्ट

अंश प्रभूचा स्पष्ट । असे तो एक ४१

म्हणून जाणावे आत्मज्ञान । जावे त्यास शरण

अंशात्मक परमात्मा समजून । चिंतन करावे त्याचे ४२

निर्णय कधी न चुकती । जेव्हां तो आत्मा देती

योग्य निर्णय आनंदती । तुम्हां लागी ४३

आत्मज्ञान हाचगुरू । सुप्त शक्ती जागृत करू

निर्णय त्याचे शिरी धरू । हाच करावा संकल्प ४४

एकाग्र होता मन । लागेल तुमचे ध्यान

निर्णय तोच देईन । तुमच्यातील सुप्त शक्ती ४५

प्रसंग येता तुमचे वरी । एकाग्र चित्ती विचारी

आत्मगुरू निर्णय करी । तुमचे साठी ४६

आत्म्त्याचा निर्णय । समाधान देय

चुका न होय । कधीही ४७

जीवानाचे सार । समजता ईश्वर

आत्मज्ञान गुरूवर । विश्वास ठेवावा ४८

आत्मज्ञान गुरू । चिंतन त्याचे करू

मार्ग तोच धरू I जीवन यशासाठी ४९

आत्मज्ञान असे महान II घ्यावे समजोनI सर्वांनी ५०

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

निर्णयाचे बहूत क्षण । सुख – दु:खे त्यावरी अवलंबून

Author