चिमुकल पाखरू
आल माझ्या आगनी
जन्म घेऊन माझ्या घरी
वाढवल मी लाडाणी
शाळा शिकवली मी तिला
गुणवान बनवले न्यानाने,
मुलगी असली तरीही
मुलाची कमी कधी
भासत नाही मला
तिचे हसने ,तिचे खेळने
हाच आधार माझ्या जिवनाला
जानार लग्न करुन
मला सोडुन
घोर लागला या गरीब
बापाच्या मनाला
चिमुकल पाखरु
आल माझ्या अंगनी.
-- आर. एस्. शिरसाठ
https://www.facebook.com/rajendra.shirsath.10
October 26, 2018
May 20, 2011
ओळ लिहिताना मला
तुझा चेहरा दिसतो..
स्तब्ध लेखणीत माझ्या
भाव तुझाच असतो..
शब्दातून व्यक्त व्हावे
माझ्या मनातले कोडे..
तूच जाणून घ्यावेस
शब्दातील भाव थोडे..
तुला पाहिलं दुरून
ओढ लागली मनाला..
शब्द वेडे झुरतात
रोज क्षणा क्षणाला..
एकदाच मला हवी
भेट एकांतात तुझी
कवितेत वाचशील
व्यथा प्रेमळ मनाची..
नको अंतर कसले
पुर्ण करेन कविता..
सागरास मिळताच
पूर्ण होईल सरीता
July 28, 2026
कुठे नाही स्वरूप देवा, बघायला मिळत आम्हा,
काळीज नमते तुज पाहता,
चराचरातील या घटका, ---
निसर्ग मज वाटतो,
तुझेच रुप देवा,
तिथेच आम्ही तुला मानतो,
स्वरूप कोणते का असे बा,
ना तू कुठल्या देवळा,
ना कुठल्या मंदिरी,
प्रत्येकाच्या हृदयी
बसशी,असशी तू हरी,----
प्रेम, माया, ममता,
आपुलकी, जिव्हाळा,
कुठे तू नसशी
फक्त सांग मज गा ,---!!!!
माणुसकी जे जपती,
त्यांच्या मनोमनी तू ,
दया करुणा अहिंसा,
दाखवीत प्रगटशी तू,--!!!.
अनोळखी हात करता,
निरपेक्ष ती सहाय्यता,
बापुड्या दीन -दुबळ्या,
जिवांचा तू रक्षण कर्ता,--!!!
संकटात कोण पुढे येई,
कोण देईल अमोल दिलासा,
कोण आपला हात देई,
असता कुठली अवघड वेळा,--!!!
वैविध्य अन् वैचित्र्य ,
पाहुनी माणूस चकित होई,
कोण नेई शेवटास,
जिंकता जरी कुठली लढाई,--!!!
नीतिमत्तेची चाड नसता,
कोण ओढे फटकारे,
आत्म्यातला परमात्माच दाखवी, आपुले अस्तित्व बरे,--!!!!
© हिमगौरी कर्वे.
March 14, 2020
सोनं येचीतो मातीतं....
सोनं येचतो मातीतं...
संगणीच्या संगतीतं...
मोती घामाचे पिकवितो...
काळी मायच्या कुशीतं....
पशु पक्षी वृक्षवल्ली
काळ्या मायची लेकरं
सार तिच गणगोतं
तिलं सृष्टीचा संसारं....
पिकं शेतात डोलते
पाना फुलांनी सजते
फुले काळीज बळीचं
मनं हारखुन जाते.....
मका पोटुशी पोटुशी...
डोकं जवारी काढते...
गहु मिशांना ताविते...
फुलं सुर्याच डोलते...
पक्षी झाडाशी बोलती,
गाय गोठ्यात हंबरी,
मह्या शेतातली शाळा,
मलं ईथच पंढरी........!!!
©गोडाती बबनराव काळे
लातुर
९४०५८०७०७९
May 11, 2024
कांदा नी भाकर
किती महागली
पोट कसे भरू
गळचेपी झाली
मेथीची जुडाई
पन्नाशीला आली
कोथिंबीर लुप्त
मी घिरट्या घाली
काही भाज्या तर
झाल्या महाराणी
गातात नेहमी
श्रीमंतीची गाणी
राब राबतो रे
शेतकरी शेता
दलाल पदरी
माप काहो घेता
ज्याचा आहे नफा
त्याला द्यानं जरा
फुले सुखी वाफा
दारी तर तरा
महागाई थांब
नको शोषू रक्त
विनवणी माझी
एवढीच फक्त
-- सौ. माणिक (रुबी)
December 2, 2019
कोण लागतात माझे, नाते ते ठावूक नाहीं
देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं....१,
विठ्ठल- रामाचा नाद, गुंजन करितो येथें
पवित्र वातावरण, येण्यानी होवून जाते....२,
देवण घेवण आत्म्याची, आपसामध्यें चालती
शब्द फुलांची गुंफण, त्वरीत होऊन जाती....३,
फूले देऊनी मजला, हार गुफूंन घेतात
दोघे मिळूनी तो हार, प्रभूस अर्पूं सांगतात....४
अदृश्य असले नाते, असावे दोघांमध्ये
भाषा आत्म्याची जाणतां, मन नाचते आनंदे....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 12, 2019
होता एक गरीब बिचारा ।
किडूक मिडूक ते जगण्या चारा ।।
कौलारु जुनी पडवी निवारा ।
जन्म दरिद्री दिसे पसारा ।।१।।
परिस्थितीनें गेला गंजूनी ।
आर्थिक विवंचना पाठी लागूनी ।।
शरीर जर्जर झाले रोगांनी ।
जगण्याची आशा उरे न मनीं ।।२।।
अवचित घटना एके दिनीं ।
धन सापडे जमिनीतूनी ।।
मोहरांचा तो होता रांजण ।
गेले सारे दारिद्य निघूनी ।।३।।
जन्मभर ते त्याने भोगले ।
घरांत लक्ष्मी, परी सोसले ।।
अज्ञानातची हे घडले ।
असून पाण्यांत तरी तहानेले ।।४।।
शोधा ईश्वरी गुप्त धनाचा सांठा ।
लपला आहे अंतर्यामीं मोठा ।।
नसेल तेथे आनंदा तोटा ।
मिळतील सदैव यश वाटा ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 6, 2019
बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं
लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी १
चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे
फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे २
वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले
भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले ३
मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला
स्थिरावली ना दृष्टी तेव्हां, क्षणभर देखील एका बिंदूला ४
दृष्टीला परि पडले बंधन, एका दिशेने बघण्याचे
व्यवहारातील जगामध्ये, पडता पाऊल तारुण्याचे ५
प्रवाही होते जीवन सारे, जगण्यासाठी धडपड लागे
रम्य काय ते मधुर काय ते, विसरु गेली जीवन अंगे ६
राग लोभ आणि प्रेम गुणांचे, दृष्टीमध्ये मिश्रण होते
अहंकाराने ताठर करुनी, प्रेमाने कधी झुकविले होते ७
दुजासाठी मी आहे येथे, विवेक सांगे हे दृष्टीला
शोध सुखाचा घेता घेतां, थकूनी गेलो संसाराला ८
तन मन जेव्हां झाले दुबळे, दूर दृष्टी ही गेली निघूनी
आकाशातूनी क्षितीजावरती, आणि तेथूनी आतां धरणीं ९
वाकूनी गेले शरीर आणि, ह्रदय स्थरावर दृष्टी लागली
दाही दिशांनी धुंडत धुंडत, अखेर देहा भवती वळली १०
फिरली दृष्टी जीवनभर जी, वैचित्र्याला शोधीत असता
डोळे मिटूनी नजीक पहा, सांगे तिजला निसर्ग आता ११
आनंदाचे मुळ गवसले, अंतर्यामी वसले होते
आज पावतो विश्व फिरुनी, मुळ ठिकाणी आले मग ते १२
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 24, 2020
सौख्यसमृद्धीचे रांजण
भोगण्यासही पायबंदी
क्षण विकलांग पांगळे
शब्दभावनां जायबंदी
संसारी सर्वार्थी तृप्तता
धागे भाळी ऋणानुबंधी
सारा फुकाचा विसंवाद
सुसंवाद मात्र भोगवादी
विवेकाने जगती जगावे
दैवयोगे, प्रारब्ध भोगावे
शांतीच्याच आंनद डोही
जीवनी विनासक्त डुंबावे
स्वर्गानंदी, ऐश्वर्यमहाल
दुर्लभ, निर्मळ सौख्यांगण
दुर्बोधीच अर्थ जीवनाचा
व्यर्थ! सौख्यदायी रांजण
-- वि. ग. सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १६५
१५ - ७ - २०२२.
August 10, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti