बीज - वृक्षाचे चक्र कुणाचे ?
सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार
कोण देई हा आकार ?
तूं तर दिसत नाही कुणाला, घडते मग कसे ?
कोण हे घडवित असे ?
प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष
कोण देई ह्यांत लक्ष ?
त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत
ही किमया असे कुणांत ?
तोच वृक्ष वाढूनी फळे देतो, फळांत असते बीज
फिरवी कोण चक्र सहज ?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 16, 2018
अक्कण ओटा चिक्कण ओटा
अस्सा ओटा सुरेख बाई
ग्रॅनाइटचा असावा
अशा ओट्यावरती बाई
मिक्सर लावावा
अस्सा मिक्सर सुरेख बाई
सुमीतच्या मिक्सरमध्ये
इडली रवा फेटावा
अस्से सुरेख पीठ बाई
फ्रिजमध्ये ठेवावे
अस्सं पीठ थोडं थोडं
इडलीपात्री उकडावं.
अश्शा इडल्या सुरेख बाई
चटणीसवे वाढाव्या
अस्सा बेत सुरेख बाई
कष्टांना वाचवतो
अश्शा पोळ्या द्वाड बाई
टाळाव्या शक्यतो.
October 13, 2018
धागा धागा विणून, केली तयार जाळी
गोलाकार नि बहुकोनी घरे, पडली निर निराळी....१,
स्थिर सुबक घरे, जसा स्थितप्रज्ञ वाटे
सर्व दिशांचा तणाव, न दिसे कुणा कोठे....२,
तुटेल फूटेल तरी, सैलपणा येणे नाही
जर ढिला झालाच तर, जाळी दिसणार नाही....३,
जगे तो अभिमानानें, मान ठेवूनीया ताठ
संसारामधील क्लेश, झेलीत होती त्याची पाठ....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
August 16, 2017
हक्क तुझा,हक्क माझा,
हक्क याचा अन त्याचाही.....
पण मला एक सांगा.....
हक्क कधी हक्काचा आहे का हो...?
एकदा आसच चालत आसतांनी....
रस्त्यानं.....!
अविरत पहात व्हतो....
वेगवेगळे रूपं....
ना निरगुण न ही निराकार....
ते तं होते,
आंकुचित....,
अन संकुचितही.....!
व्याख्याच बदलली व्हती
हक्कानं आपली....
सिस्टीममध्ये व्हायरस घुसुनं
फाईल करप्ट व्हावी
तसा करप्ट झालता हक्क....!
अन मंग काय,
हक्कानं आपलीच संस्थानं तय्यार केली.......
आपल्याच
हक्काची......!!!
स्वतःचीच......
स्वतःसाठी
हक्कानं चालवलेली.....!
हक्कालं वावडं व्हतं....
गरीबाच्या घामाच,
भटक्याच्या पालाचं,
श्रमिकाच्या झोपडीचं
अन विद्रोहाच्या चोपडीचं...!!!
हक्क पोचलाच नाही कधी
रंजल्याजवळ बी आन गांजल्याजवळ बी.....
ना पालात,ना रानात,
नाही झोपडीत.....!
तो तं.....
आरामात राबतोय......
संस्थानिकांच्या महालातं.....
हक्कानं....!!!
©गोडाती बबनराव काळे, हाताळा,हिंगोली
9405807079
November 14, 2023
खरा तो एकची धर्म
जाणा सत्कर्मातले वर्म
करा आपुलाले कर्म
प्रेम करणे स्वधर्म...१
प्रेम करणे स्वधर्म
त्यास निस्वार्थी झालर
आदरार्थी परधर्म
करा त्याचाही आदर
सौ.माणिक शुरजोशी
January 9, 2020

राजा सूर्यदेवा तुला
माझा नमस्कार
तुझ्यामुळे उघडते
दिवसाचे दार
June 26, 2026
1
पाहिजे तेवढं Brain-Storm
पण, How will you avoid a storm
Brexit नावाचं ?
2
Brexitच्या प्रत्येक विकल्पाला
MP म्हणतात, ‘Not OK’.
अन् इकडे, फासावर चढलाय UK.
3
MP बसलेत डोकं खाजवत
UK च्या नांवाला लागतोय् बट्टा.
अरे, Brexit आहे की थट्टा !
4
ब्रेक्झिटचा प्रश्न असा आहे गूढ
की, मतदानावर मतदान चाललंय्
पण निघतच नाहीं तोड.
5
ब्रेक्झिट तर हवं
पण Backstopचा लागलाय फास
अन् प्रत्येक विकल्प होतोय्
Parliament मधें नापास.
6
डोकेफोड, उरस्फोड
सगळं सगळं व्यर्थ
‘House’ मधल्या ब्रेक्झिट-चर्चेला
उरला नाही अर्थ.
7
लंडन ते ब्रुसेल्स
किती तंगडतोड !
पण थेरेसा मे चं Deal
कुणालाच लागत नाहीं गोड.
8
‘House’ मधे बोलून बोलून
आवाज बसला
पण MPs घेत नाहींत
निर्णयच कसला!
9
हें ही नको तें ही नको
काय हवें तें मात्र कळेना
Deadlineचा लागला फास
तरी ब्रेक्झिट फळेना.
10
UK आणि EU
कोण रावण कोण सीता ?
मात्र दोघेही हरतील
लक्ष्मणरेषा ओलांडतां.
(- लक्ष्मणरेषा : ब्रेक्झिटसाठीची Deadline)
11
‘Quie..e..e..t’ ओरडून Speaker चा
घसा कोरडा झाला
तरी ब्रेक्झिट-मतदानाचा
पुरता राडा झाला.
12
ब्रिटिश राज्यावरती पूर्वी
सूर्य मावळत नसे
आतां indecisive UK चें
होई जगतीं हसें.
13
अर्धं जग होतं जागत
अन् लंडनकडे होतं बघत
पण Brexit चऽ जहाज
किनार्याला नव्हतं लागत.
14
भाष्यं सतराशेसाठ
अठरापगड गट
सगळे भुईसपाट.
Brexit सकट.
15
‘House’ च्या आंत अन् बाहेर
सगळेच anxious, भावुक
Brexit मध्यें काय हवंय् MPs ना,
तें त्यांनाही नाहीं ठाऊक.
16
Brexit साठी Deal
बनवुन तर आणली नामी
पण पार्लियामेंटचा feel
पडला कमी.
17
UK मध्यें आली ‘जगबुडी’
‘House’ मधील विस्कटली घडी
इकडे तळमळतेय्
Brexit ची कुडी.
18
Brexit च्या दोरावर हिंदकळतेय्
UK ची anxious कुडी
टीका करतायत् धेंड बडी बडी
ते ‘वैद्य’ बनून तपासतायत् UK ची नाडी.
October 22, 2019
March 22, 2022
आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलते साल नवं नवं
राजसा प्रीत पाखरांचे उडवा हो तुम्ही थवं ।।धृ।।
नव्या सालातील नवी सांज ,नटून बसले हो मी।।
अजून सजणा नाही आले,घायाळ हरणी हो मी।।
उगाच कावं उशीर केला,मनास या होती घावं।।
राजसा प्रीत पाखरांचे,उडवा हो तुम्ही थवं।।१।।
साज सरली रात्र झाली, भेटीलागी मी आतुरली।।
विरहणीची व्यथा न्यारी,
अजून तुम्हा ना कळली ।।
उर धडधडे काया थरथरे, नका टाकू डावं
।।
राजसा प्रीत पाखरांचे,उडवा हो तुम्ही थवं।।२।।
रात्र सरली पहाट झाली,एकलीच मी झुरली।।
जडावलेल्या पापणीला,
ओढ तुमचीच लागली।।
नको छळणे प्रीतीत रमणे,नाही तुम्हा का ठावं।।
राजसाप्रीत पाखरांचे उडवा हो तुम्ही थवं ।। ३।।
हुरहुर माझ्या मनी दाटली,प्रियतम हा कुठं
।।
प्रीतीत कुणाच्या अडकला का,प्रश्न मनी या उठं।।
माझ्या प्रीतीचा नजराणा,कमी पडला का हो रावं।।
राजसा प्रीत पाखरांचे,उडवा हो तुम्ही थवं।।४।।
-- सौ.माणिक शुरजोशी
January 4, 2020
ग्रामीण संस्कृती आणि परंपरा या यात्रौत्सवानिमित्त पहायला मिळते.
March 18, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti