का कुणास ठाऊक
हल्ली काव्य उमलत नाही
शब्दांची पखरण पुन्हा
अलगद मनात बहरत नाही
का कुणास ठाऊक
शब्द हृदयात फुलतं नाही
हरवल्या वाटेवर जुनी
माणसे पुन्हा भेटत नाही
का कुणास ठाऊक
मनाचे मनाला उमगत नाही
निःशब्द शांततेतील भाव
एक दुसऱ्यांना कळत नाही
का कुणास ठाऊक
ओढ तुझी मिटत नाही
अनामिक होते चांद रात
आठवण तुझी लपत नाही
— स्वाती ठोंबरे.
Author
Post Views: 7