देहाला कां शिणवितां ?

शरीरातील अवयव सारे, यंत्रवत् असती ।

आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती ।।

यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी ।

अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी ।।

शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती ।

त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम होती ।।

खाणें शुद्ध पिणे शुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते ।

संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते ।।

उपास तापास करुनी कांहीं, शिणविती देहाला ।

हट्टयोग साधूनी कित्येक, दमविती शरीराला ।।

देह असे साधन केवळ, प्रभूकडे जाण्याचे ।

साध्य होईल त्याच आधारें, इप्सित जीवनाचे ।।

खाद्यपाणी हे तर इंधन, असे शरीर यंत्राचे ।

अभावी त्याचे कसे चालेल, जीवन मग तुमचे ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author