वंदू तुजला गणराया !

हे मयुरेश्वर, श्रीसिद्धिविनायक

हेरंभ, लंबोधर शुभाय

प्रगटलास विविध रुपा धरणीवर ह्या

तुझ्या कृपेचा आशीर्वाद द्याया

वंदू तुजला प्रथपुजीताय !

बल्लाळेश्वर, वरदविनायक

रूप तुझे मोहक सुंदर

तुंदिल शोभे लंबोधर

तुझीया दर्शना चिंता-कष्ट दूर

वंदू तुजला गणाध्यक्षाय !

चिंतामणी, गिरिजात्मक

आम्हीं तुझी बालके अडाणी

बोबडे बोल, आमुची वाणी

शहाणे करण्या सत्वर येशी

भक्ती-सेवेत आम्हां गुंतवीशी

वंदू तुजला श्रीभक्तकल्याणाय !

श्रीविघनेश्वर, महागणपती

मोदकांवरी प्रीती भारी

एकवीस नैवैद्याते अर्पण सत्वरी

आनंदाने सर्व स्वाहीशी

तृप्तीचे एकवीस ढेकर पिताश्री देती

वंदू तुजला एकदंता, भालचंद्रा !

काय वर्णाव्या तुझ्या लिला

आमच्या अल्पमती बुद्धीच्या पलीकडल्या

करुनिया अल्पश्या गुणसंकीर्तना

ठेवितो तुझ्याया चरणी माथा

वंदू तुजला शूर्पकर्णाय विकटाय !

घेउनी पंचारती, मंजुळ वाजंत्री अनेक

सहर्ष स्वागता आम्हीं सज्ज

मानुनी घे मोदकापरी गोड

भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिस !

जगदीश पटवर्धन



हे मयुरेश्वर, श्रीसिद्धिविनायक

हेरंभ, लंबोधर शुभाय

प्रगटलास विविध रुपा धरणीवर ह्या

तुझ्या कृपेचा आशीर्वाद द्याया

वंदू तुजला प्रथपुजीताय !

बल्लाळेश्वर, वरदविनायक

रूप तुझे मोहक सुंदर

तुंदिल शोभे लंबोधर

तुझीया दर्शना चिंता-कष्ट दूर

वंदू तुजला गणाध्यक्षाय !

चिंतामणी, गिरिजात्मक

आम्हीं तुझी बालके अडाणी

बोबडे बोल, आमुची वाणी

शहाणे करण्या सत्वर येशी

भक्ती-सेवेत आम्हां गुंतवीशी

वंदू तुजला श्रीभक्तकल्याणाय !

श्रीविघनेश्वर, महागणपती

मोदकांवरी प्रीती भारी

एकवीस नैवैद्याते अर्पण सत्वरी

आनंदाने सर्व स्वाहीशी

तृप्तीचे एकवीस ढेकर पिताश्री देती

वंदू तुजला एकदंता, भालचंद्रा !

काय वर्णाव्या तुझ्या लिला

आमच्या अल्पमती बुद्धीच्या पलीकडल्या

करुनिया अल्पश्या गुणसंकीर्तना

ठेवितो तुझ्याया चरणी माथा

वंदू तुजला शूर्पकर्णाय विकटाय !

घेउनी पंचारती, मंजुळ वाजंत्री अनेक

सहर्ष स्वागता आम्हीं सज्ज

मानुनी घे मोदकापरी गोड

भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिस !

जगदीश पटवर्धन

Author