विनम्रता

लीन दिन ती होवून पुढती,
झुकली होती त्यावेळी ।
हात पुढे आणि नजर खालती,
ज्यांत दिसे करूणा सगळी ।।

लाचार बनूनी पोटासाठी,
हिंडे वणवण उन्हांत सारी ।
वादळ वारा आणिक पाऊस,
संगत घेवून फिरे बिचारी ।।

मदतीचा हात दिसे,
जागृत होता भूतदया ।
जनसामान्यात असती
मानवतेतील ही माया ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



लीन दिन ती होवून पुढती,
झुकली होती त्यावेळी ।
हात पुढे आणि नजर खालती,
ज्यांत दिसे करूणा सगळी ।।

लाचार बनूनी पोटासाठी,
हिंडे वणवण उन्हांत सारी ।
वादळ वारा आणिक पाऊस,
संगत घेवून फिरे बिचारी ।।

मदतीचा हात दिसे,
जागृत होता भूतदया ।
जनसामान्यात असती
मानवतेतील ही माया ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author