भावनेच्या जावूनी आहारीं, नुकसान करतात सारे,
तर्कशुद्धता विसरून जाते, अंगात भरूनी वेडे वारे ..१,
भावनेची लाटच उठता, मती होते एकदम गुंग,
बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२
आपले सारे खरे असावे, हाच होत असे अट्टाहास,
आपण केल्या कर्मावरच, बसतो आपला विश्वास..३
इंद्रीय आणि भावना यांची, जमुनी जात असतां जोडी
तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते केव्हां गोडी...४
काही क्षणाचा काळ जाता, भावना जाई मग निघून
विचार मात्र मिश्कीलतेनें, हसती पश्चाताप बघून...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
August 15, 2015
चल, चांदण्यांची सैर करू,
अंबरी, ढगां-ढगांत विहरू,
कडेकडेने मेघांच्या,जाऊ,
हळूच,मऊ मऊ दुलईत शिरू,-!!
मिचकावून डोळे आपुले,
चांदण्यांची वरातच पाहू,
सुंदर चमचमत्या प्रकाशात,
त्यांची आभा नीट न्याहाळू,--!!
काळ्याशार गालिच्यावर नभांत,
वावरते प्रकाश--झोत पाहू,
इकडून तिकडे हलत्या प्रवासी,
चंद्राचीही धांदल बघू,---!!
कोण त्यांच्यात अधिक सुंदर,
मनी मानसी स्पर्धाच लावू,
चंद्राचा मुखडा लोभसवाणा,
पाहून आपण अचंबित होऊ,--!!
धरेवर ती मजा नाही,
ना कुठली दिसे चांदणी,
नकली नको त्या, असली पाहू,
देखणी, नाजूक त्यांची बांधणी,--!!
पृथेवर का कधी चंद्र दिसे,
तोही इतुका जवळून आढळे,-?
थंडगार त्या वातावरणी,
झोपण्यात केवढी मजा असे,-?
अंतराळाचे सुख निराळे,
दु:खाची मुळी बात नसे,
ताण-तणांवा नसेल जागा,
ताणून द्या हो,शरीर सगळे,--!!
ओढाताण नाही कुठली,
जिवां मिळेल विश्रांती,
मानापमानाची कल्पनाही,
तिथे करायाची नाही,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
April 3, 2019
विपरित वागूनी मन, नाश करीते शरीराचा ।
वासनेतील तफावत, काळ बनतो इंद्रियाचा...१,
उदर भरले असताना, अन्नाला विरोधते पोट ।
परि अतृप्तता जिभेची, घालते आग्रहाचा घाट....२,
मद्य सेवन करीता, झिंग ती येवून जाते ।
मेंदूतील चेतनेसाठीं, यकृत बिघडूनी जाते...३,
नाच गाणे देत असते, सूख नयनां – कर्णाला ।
शरीर वंचित होते, मिळणाऱ्या त्या विश्रांतीला....४
एक इंद्रियाची वासना, असती पूरक दुजाला ।
साध्य करण्यासाठीं हेच, जागृत ठेवावे मनाला...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 15, 2015
झोप घ्या हो शांत, जागृत राहूनी तुम्ही,
विचित्र वाटे ही रित, परि येई तुमचे कामी ...१
विश्रांती लागत असते, गरज म्हणून शरिराला
ती तर मिळत नसते, केव्हांही तुमच्या मनाला ..२
चंचलता हा स्वभाव, आहे आपल्या मनाचा,
शांत करण्या मना, उपाय नसे झोपेचा..३
एकाच दिशेने धावूनी, मिळवते मन विश्रांती
एकाग्र चित्त असणे, उपाय हाच त्यावरती...४
चित्त करूनी एकाग्र, दिशा त्यास या प्रभूसाठीं
मिळेल सारे तुम्हां, जागृत राहण्या पोटी...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५९
July 10, 2020
November 8, 2021
संथ निळेशार पाणी
लाट खोल उसळली...
जीव रंगला तुझ्यात
ओढ अशीही लागली...
थेंब थेंब बरसला
घन ओथंबून आज...
शहारली काया पुन्हा
सागराची आर्त गाज..
देह तुझाच राहिला
मनोमनी दाटे हर्ष..
किरणांची सोनछाया
जाणवितो तुझा स्पर्श..
मनामध्ये उतरावी
छाया आठवांची दाट...
बरसून मेघ आला
पुन्हा पाहण्यास वाट..
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
July 22, 2026
किती रे खोड्या करिशी कृष्णा
यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।।
झोपू दे रे तिजला आतां, ती तर गेली खूप दमूनी
दही दुधांनी भांडी भरली,
काही प्याली, काही वाटली,
काही तर ती उपडी झाली,
पिऊनी सांडूनीच सगळे, नासलेस दही दूध लोणी...१,
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी
गणरायाचे पूजन करितां
मग्न झाली यशोदा माता
लक्ष्य तुझे नैवेद्यीं पडतां
फस्त करशी कांहीं मोदक, ताटामधले तूंच खाऊनी....२,
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,
गोपींच्या तूं फोडल्या घागरी,
पळवी त्यांची वस्त्रे सारी,
दुधा तुपाची केली चोरी,
मौज वाटते गोप-गोपींना, नटखटता तुझी बघूनी...४
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,
खोंड्या नच लीला बघूनी,
प्रेमभावना उचंबळूनी
जाई यशोदा ती बावरूनी
डोळ्यामधले लपवून आश्रू, लटका राग दिसे शब्दानी...५,
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 8, 2017
अविरत भक्त करत वारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम्
अथक जन ज़ात विठूदारीं, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
ऊन नि पाउस यांची नाहीं एकाला पर्वा
ध्यास एकची लागे सर्वां - तो विठ्ठल बरवा
भारले सारे वारकरी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
कठिण शेकडो मैल तुडवती मराठदेशातले
अखंड नाचत भक्त शेकडो, कुणिही नच दमले
देइ चैतन्य मनां पंढरी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
समान असती विठुमार्गावर सारे वारकरी
कुणांशी न कोणांस करावी लागे बरोबरी
सर्वच हर्षद-शेज़ारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
वारकर्यांच्या वसतो हृदयीं पांडुरंग सांवळा
उभा विटेवर, हात कटीवर, तुलसीमाळ गळा
विठूमय झाले नरनारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
ज़ातिपातिचें ना बंधन, ना लहानथोर इथें
शतकांपासुन अशीच वारी पंढरिला निघते
पाहुनी म्हणतो स्वत: हरी – ‘हॅटस् ऑऽऽफ् टु देम्’ ।।
- - -
हॅटस् ऑऽऽफ् टु देम् : Hats Off To Them
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
July 6, 2016
प्रेम हे करत नसतात , ते होत असते
प्रेम हे मागत नसतात, ते मिळत असते
प्रेम हे दिसत नसते, ते जाणून घ्यावे लागते
प्रेम हे बंधन नसते, ते मुक्त करते
प्रेम परिसासारखे असते जे लोखंडाचे सोने करते
प्रेम अमृतासारखे असते जे मेलेल्याला जिवंत करते
प्रेम हे तिचे किंवा त्याचे नसते, ते दोघांचे असते
-- विवेक विजय रणदिवे
October 21, 2021
तप्त लोखंडात, लपली ती आग
दिसे लाल लाल, जाळी सर्व भाग...१,
सुंदर फूलात, सुंगध तो छान
अवती भवती काटे, ते कठीण...२,
विजेची ती तार, प्रकाशी दिव्याला,
झटका तो देई, स्पर्श होता तिला..३,
सुखाच्या पाठीशीं, असे दुःख छाया
न दिसे ती आम्हा, असे मोह माया...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 13, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti